________________
प्रेम का जडले? कारण 'दादा' नी काहीतरी सुख दिले आहे की ज्यामुळे प्रेम जडले, आणि ते प्रेम जडले की मग कधीच त्यांचा विसर पडत नाही ना! त्यांना कधी आठवावे लागतच नाही.
___ म्हणजे परमेश्वराची आठवण केव्हा येते? तर परमेश्वर जेव्हा आपल्यावर काही कृपा करतील. आपल्याला काहीतरी सुख देतील, तेव्हा त्यांची आठवण येते. एक माणूस मला म्हणतो की, 'मला माझ्या पत्नीशिवाय करमतच नाही.' अरे, असे का? मग पत्नी नसेल तर काय होईल?
तेव्हा तो म्हणाला, 'मग तर मी मरूनच जाईन. अरे पण कशाला?' तेव्हा म्हणतो, 'ही पत्नीच तर मला सुख देते.' आणि जर ती सुख देत नसेल, मार-झोड करत असेल तर?' तरीही त्याला आठवते. अर्थात राग आणि द्वेष दोन्हीत आठवण येत राहते.
पशू-पक्ष्यात देखील प्रेम म्हणजे हे सर्व समजून घ्यावे लागेल ना. तुम्हाला आता असे वाटते की, प्रेमासारखी वस्तू आहे का या संसारात?
प्रश्नकर्ता : आता तर, मुलांवर प्रेम करतो, त्यालाच आम्ही प्रेम मानतो ना!
दादाश्री : असे होय? प्रेम तर या चिमणीचे तिच्या पिल्लांवरही असते. चिमणी जेव्हा बाहेरुन दाणे आणून घरट्यात येते, तेव्हा पिल्ले 'आई आली, आई आली' असे नाचू लागतात. मग चिमणी त्या पिल्लांच्या तोंडात दाणे भरवते. ती स्वत:च्या तोंडात किती दाणे भरून ठेवत असेल? आणि एक-एक दाणा तोंडातून कसा काढत असेल?' या विचारात मी होतो. ती चारही पिल्लांच्या तोंडात एक-एक दाणा भरवते.
प्रश्नकर्ता : पण त्यांच्यात आसक्ती कशी येईल? त्यांच्यात तर बुद्धी नाही ना?
दादाश्री : हो, तेच तर मी म्हणतोय ना? म्हणजे हे तर मी