Book Title: Pure Love Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 23
________________ १४ प्रेम प्रेम करेल ना? तसे तुम्हाला परमेश्वर कुठे आणि कसा गोड लागला, ते मला सांगा ना ! प्रश्नकर्ता : कारण हा जीव अंतिम क्षणी जेव्हा देह सोडतो तेव्हा सुद्धा परमेश्वराचे नाव घेऊ शकत नाही. दादाश्री : पण परमेश्वराचे नाव कसे घेऊ शकेल? त्याला ज्यात रुची असेल त्याचे नाव तो घेऊ शकेल. जिथे रुची असते तिथे त्याची रमणता असते. परमेश्वरात रुचीच नाही म्हणून परमेश्वरात रमणता देखील नाही. जेव्हा भीती वाटते तेव्हा परमेश्वराची आठवण येते. प्रश्नकर्ता : परमेश्वरामध्ये रुची तर असते. पण तरी काही आवरणं अशी बांधली जातात की ज्यामुळे परमेश्वराचे नाव घेऊ शकत नसतील. दादाश्री : पण परमेश्वरावर प्रेम बसल्याशिवाय तो नाव कसे घेणार ? परमेश्वरावर प्रेम बसायला हवे ना ? आणि परमेश्वरावर अधिक प्रेम केले तर त्याचा काय फायदा ? मला असे म्हणायचे आहे की, आंबा जर गोड असेल तर प्रेम होते आणि कडू किंवा आंबट लागला तर? तसेच परमेश्वर तुम्हाला कुठे गोड लागला की तुमचे त्याच्यावर प्रेम बसेल ? असे आहे, जीवमात्रात परमेश्वर बसलेले आहेत. चैतन्यरुपात आहेत, की जे चैतन्य जगाच्या जाणीवेतही नाही आणि जे चैतन्य नाही, त्यालाच चैतन्य मानतात. या शरीरात जो भाग चैतन्य नाही त्याला चैतन्य मानतात आणि जे चैतन्य आहे ते त्याच्या जाणीवेतच नाही, त्याचे भानच नाही. आता तो शुद्ध चैतन्य अर्थात शुद्धात्मा आणि तोच परमेश्वर आहे, त्याचे नाव केव्हा स्मरणात येईल ? तर जेव्हा आपल्याला त्यांच्याकडून काही लाभ झाला असेल तरच त्यांच्यावर प्रेम बसेल. ज्याच्यावर प्रेम बसते ना, त्याची आठवण झाली तर त्याचे नाव घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला प्रेम वाटेल असे जर कोणी भेटले तर ते नेहमीच आपल्या आठवणीत राहतात. तुम्हाला 'दादा' आठवतात ? प्रश्नकर्ता : होय. दादाश्री : हो. त्यांचे प्रेम आहे तुमच्यावर म्हणून आठवतात. आता

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76