________________
नाहीत, स्वार्थासाठी रडतात. म्हणजे हे प्रेमच नाही, ही सर्व तर आसक्ती म्हटली जाते. स्वार्थामुळे आसक्ती उत्पन्न होते. घरात सर्वांसोबत चढउतार नसलेले प्रेम ठेवावे. पण त्यांना मात्र असेच सांगावे की, 'तुमच्याशिवाय आम्हाला करमत नाही?' व्यवहाराने तर बोलावे लागते ना! परंतु प्रेम तर चढ-उतार नसलेले असावे.
या संसारात जर कोणी म्हणेल, ‘की बायकोचे प्रेम हे प्रेम नाही का?' तेव्हा मी त्याला समजावतो की, जे प्रेम कमी-जास्त होत असेल ते प्रेमच नाही. तुम्ही हिऱ्याच्या कुड्या आणून देता त्यादिवशी प्रेम खूप वाढते आणि जर कुड्या आणल्या नाहीत तर प्रेम कमी होते. याला प्रेम म्हटले जात नाही.
प्रश्नकर्ता : खरे प्रेम कमी-जास्त होत नाही, मग त्याचे स्वरूप कसे असते?
दादाश्री : ते कमी-जास्त होत नाही. जेव्हा बघाल तेव्हा प्रेम तसेच्या तसेच दिसते. हे तर तुमचे काम करून देतो तोपर्यंत प्रेम राहते, आणि काम केले नाही की प्रेम तुटते. त्याला प्रेम म्हणूच कसे शकतो?
म्हणून खऱ्या प्रेमाची व्याख्या काय? तर फुल-हार घालणारे आणि शिव्या देणारे, या दोघांवर सारखेच प्रेम असेल, त्याचे नाव प्रेम. बाकी सर्व आसक्ती. म्हणजे ही प्रेमाची डेफिनेशन सांगतो की प्रेम असे असायला हवे. हेच परमात्म प्रेम आहे, आणि जर असे प्रेम उत्पन्न झाले, तर आणखी कशाची गरजच उरणार नाही. प्रेमाचीच किंमत आहे !
मोह असलेले प्रेम, बेकार प्रश्नकर्ता : मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकतो का?
दादाश्री : ज्याच्यावर प्रेम केले त्याने घटस्फोट घेतला, मग तो कसा जगेल? आता का बोलत नाही? बोला ना?
प्रश्नकर्ता : खरे प्रेम असेल तर जगू शकतो? जर मोह असेल तर नाही जगू शकणार?