________________
बाप नाही.' जर खरे प्रेम असेल तर ते नेहमीसाठी जसेच्या तसेच राहील. मग शिव्या देवो की भांडण करो. याशिवायच्या प्रेमास खरे प्रेम कसे म्हणता येईल? स्वार्थ असलेले प्रेम त्यासच आसक्ती म्हटली जाते. ते म्हणजे व्यापारी आणि ग्राहकासारखे प्रेम आहे, सौदेबाजी आहे. जगातील प्रेमास आसक्ती म्हटली जाते. प्रेम तर त्यास म्हटले जाते की नेहमी सोबतच रहावेसे वाटते. त्याच्या सर्व गोष्टी चांगल्याच वाटतात. त्यात अॅक्शन आणि रिअॅक्शन नसतात. प्रेमाचा प्रवाह एक सारखाच वाहत असतो. कमी-जास्त होत नाही, पूरण-गलन होत नाही. आसक्ती पूरणगलन स्वभावाची असते.
एखादा मुलगा जर बिनअक्क्लेची गोष्ट करेल की, 'दादाजी, आपल्याला तर मी कधी जेवायला सुद्धा बोलवणार नाही आणि पाणी सुद्धा पाजणार नाही.' तरी पण 'दादाजीं' चे प्रेम कमी होणार नाही आणि नेहमीच चांगले भोजन खाऊ घातले तरी सुद्धा 'दादाजी' चे प्रेम वाढणार नाही, याला प्रेम म्हणतात. म्हणजे जेवायला बोलवले तरी प्रेम आणि नाही बोलवले तरी सुद्धा प्रेम, शिव्या दिल्या तरी प्रेम आणि शिव्या दिल्या नाहीत तरी प्रेम, सर्वत्र प्रेमच दिसेल. म्हणूनच खरे प्रेम तर आमचे म्हटले जाते. प्रेम जसेच्या तसेच आहे ना? पहिल्या दिवशी जसे होते तसेच्या तसेच आजही आहे ना? अरे, तुम्ही मला वीस वर्षांनी भेटाल ना, तरी सुद्धा प्रेम कमी-जास्त होणार नाही, प्रेम जसेच्या तसेच दिसेल.
स्वार्थाशिवायचा स्नेह नाही संसारात प्रश्नकर्ता : व्यवहारात आईचे प्रेम अधिक चांगले मानले जाते. दादाश्री : मग दुसऱ्या नंबरवर? प्रश्नकर्ता : दुसरे कोणतेही नाही. दुसरे सर्व स्वार्थाचेच प्रेम आहे.
दादाश्री : असे होय? भाऊ-बीऊ सर्व स्वार्थ ? नाही, तुम्ही प्रयोग करून पाहिले नसेल?
प्रश्नकर्ता : सर्व अनुभव आहेत. दादाश्री : आणि हे लोक रडतात ना, ते सर्व खऱ्या प्रेमासाठी रडत