________________
म्हणजे जिथे स्वार्थ असेल तिथे प्रेम असूच शकत नाही, आणि प्रेम असेल तिथे स्वार्थ असू शकत नाही.
___ अर्थात जिथे स्वार्थ नसेल तिथेच शुद्ध प्रेम असते. स्वार्थ केव्हा नसतो? 'तुझे-माझे' नसेल तेव्हाच स्वार्थ नसतो. 'तुझे-माझे' आहे तिथे नक्कीच स्वार्थ आहे. आणि जिथे 'तुझे-माझे' आहे तिथे अज्ञानता आहे. अज्ञानतेमुळे 'तुझे-माझे' झाले. 'तुझे-माझे' होत असल्यामुळे स्वार्थ आहे. आणि जिथे स्वार्थ आहे तिथे प्रेम नसते. 'तुझे-माझे ' केव्हा होत नाही? ज्ञान असेल तरच 'तुझे-माझे' होत नाही. ज्ञानाशिवाय तर तुझे-माझे होतच असते ना? पण तरी पटकन समजेल अशी ही गोष्ट नाही.
जगातील लोक प्रेम म्हणतात ती भ्रांतभाषेची गोष्ट आहे. फसवण्याची गोष्ट आहे. अलौकिक प्रेमाची हुंफ (प्रेमाचा ओलावा)तर फार वेगळीच असते. प्रेम तर सर्वात मोठी वस्तू आहे.
अडीच अक्षर प्रेमाचे म्हणून तर कबीर साहेबांनी म्हटले, 'पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भया न कोई,
ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होई.' प्रेमाचे अडीच अक्षर, एवढेच जरी समजले तरी पुष्कळ झाले. बाकी, पुस्तक वाचणाऱ्यांना तर कबीर साहेबांनी फार कडक शब्दात सांगितले की, ही पुस्तके वाचून-वाचून तर जग मेले, परंतु पंडित कोणीही झाले नाही, फक्त प्रेमाची अडीच अक्षरे समजण्याकरीता, पण तरी अडीच अक्षरे प्राप्त झाली नाहीत आणि भटकत राहिले. म्हणजे फक्त पुस्तकच वाचत बसतात, तर हा सर्व वेडपणाच आहे. परंतु प्रेमाची मात्र अडीच अक्षरे समजला तो पंडित झाला. असे कबीर साहेबांनी सांगितले. तुम्ही कबीर साहेबांच्या गोष्टी ऐकल्या आहेत का?
प्रेम असेल तर कधीही वेगळे होणार नाही. हे सर्व तर मतलबी प्रेम आहे, मतलबी प्रेमाला प्रेम म्हणता येईल का?