________________
यात खरे प्रेम कुठे ?
तुमच्यात प्रेम आहे का ?
तुमच्या, मुलावर तुमचे प्रेम आहे ?
प्रश्नकर्ता : प्रेम तर असणारच ना !
प्रेम
दादाश्री : मग त्याला कधी मारता का ? मुलांना कधीच मारले नाही ? रागावलात सुद्धा नाही ?
प्रश्नकर्ता : कधीतरी तर रागवावेच लागते ना ?
दादाश्री : तर प्रेम अशी वस्तू आहे की दोष दिसतच नाही. दोष दिसतात म्हणजे ते प्रेम नव्हतेच. असे वाटते का तुम्हाला ? मला या सर्वांवर प्रेम आहे. आत्तापर्यंत मला कोणाचाही दोष दिसला नाही. मग आपले प्रेम कोणावर आहे ते सांगा ना मला ? तुम्ही म्हणता माझ्याजवळ प्रेमाचा ठेवा आहे, तर तो कुठे आहे ?
खरे प्रेम असते निर्हेतूक
प्रश्नकर्ता : तर मग परमेश्वराप्रति असलेले प्रेम, यालाच प्रेम म्हटले जाईल ना ?
दादाश्री : नाही, तुम्हाला परमेश्वराप्रति सुद्धा प्रेम नाही. प्रेम ही वस्तूच वेगळी आहे. प्रेम कुठल्याही हेतूविना असले पाहिजे. निर्हेतूक असले पाहिजे, परमेश्वराप्रति प्रेम आहे मग इतरांवर प्रेम का नाही करत? त्यांच्याकडे काही काम आहे का तुम्हाला! आईवर प्रेम आहे, कारण तिच्याकडे काही काम आहे. परंतु प्रेम निर्हेतूक असायला हवे. तुमच्यावरही प्रेम आहे आणि या सर्वांवर सुद्धा प्रेम आहे. परंतु यामागे माझा काही हेतू नाही !
मला
नाही स्वार्थ प्रेमात
बाकी, हा तर जगात स्वार्थ आहे. 'मी आहे' असा अहंकार आहे तोपर्यंत स्वार्थ आहे. आणि जिथे स्वार्थ असेल तिथे प्रेम असू शकत नाही.