________________
प्रेम
प्रेम शब्द अलौकिक भाषेचा प्रश्नकर्ता : वास्तविक रित्या प्रेम म्हणजे काय? मला ते सविस्तरपणे समजून घ्यायचे आहे.
दादाश्री : जगात जे प्रेम बोलले जाते ना, ते प्रेमाला न समजल्यामुळे बोलतात. प्रेमाची काही व्याख्या तर असेल की नाही? प्रेमाची डेफिनेशन काय आहे?
प्रश्नकर्ता : कोणी अटॅचमेंट म्हणेल, कोणी वात्सल्य म्हणेल. बऱ्याच प्रकारचे प्रेम आहेत.
दादाश्री : नाही, पण खरोखर ज्यास प्रेम म्हटले जाते, त्याची काही व्याख्या तर असेलच ना?
प्रश्नकर्ता : मला आपल्याकडून कोणत्याही फळाची आशा नसेल, त्यास आपण खरे प्रेम म्हणू शकतो?
दादाश्री : ते प्रेम नाहीच. प्रेम संसारात नसतेच. ते अलौकिक तत्व आहे. संसारात जेव्हापासून अलौकिक भाषा समजायला लागते, तेव्हापासूनच प्रेमाचे उपादान होते.
प्रश्नकर्ता : जगात जे प्रेमाचे तत्व समजावले आहे ते काय आहे ?
दादाश्री : जगात जो प्रेम शब्द आहे ना, तो अलौकिक भाषेचा शब्द आहे, तो लोकव्यवहारात आलेला आहे. बाकी, आपले लोक प्रेमाला समजतच नाहीत.