Book Title: Spirituality in Speech Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/034330/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान प्ररूपित वाणी, व्यवहारात... दुभयसहकार्य सगळेच माझ्या विरुद्ध असतात कधीच सुधारणार नाहीस तू तुम्ही सर्वांची छान काळजी घेता, तर काही नाही तुला अक्कल आहेच कुठे ? सारेच भ्रष्ट आहेत नीति आहेच कुठे आज ? मारे धर्म आहेत तुला काही समजतच नाही खरे गुरु आता राहिलेच कुठे? संस्कारच भ्रष्ट आहे नही मेहनत केलीस तर पुढे जाशील नेहमी सकारात्मक राहावे आहे तू तर असाच राहणार कायमची सुख-शांती हवी असेल तर ज्ञानींना शोधा कुणाचेही वाईट पाहू नये काही भान आहे की नाही? पये मला सर्वांना मदतरूप व्हायचे आहे मोक्षाच्या गोष्टी जाऊ द्या तू भयंकर आळशी आहेस तुझी सिन्सियारीटी खूपच चांगली आहे ही आहेत तू तर खोट्या नाण्यासारखा आहेस W Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ SO PAN दादा भगवान कथित वाणी, व्यवहारात... मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबहन अमीन अनुवाद : महात्मागण Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक : श्री अजित सी. पटेल दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079) 39830100 © All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights. प्रथम आवृत्ति : 5,000 अगस्त 2017 भाव मूल्य : 'परम विनय' आणि 'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : 25 रूपये मुद्रक : अंबा ऑफसेट B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341 Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र વર્તમાન તીર્થકર શ્રીર્સમંધર રથમાં नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवझायाणं नमो लोए सव्वसाहूर्ण एसो पंच नमुखारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं, पढ़म हवड़ मंगलम् ॥१॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥२॥ ॐ नमः शिवाय ॥३॥ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ ; (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी १. भोगतो त्याची चूक १३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार २. एडजस्ट एवरीव्हेर १४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ३. जे घडले तोच न्याय १५. मानव धर्म ४. संघर्ष टाळा १६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर ५. मी कोण आहे ? १७. सेवा-परोपकार क्रोध १८. दान चिंता १९. त्रिमंत्र प्रतिक्रमण २०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी ९. भावना सुधारे जन्मोजन्म २१. चमत्कार १०. कर्माचे विज्ञान २२. सत्य-असत्याचे रहस्य ११. पाप-पुण्य २३. वाणी, व्यवहारात १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार २४. पैशांचा व्यवहार हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम २. सर्व दुःखों से मुक्ति २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ३. कर्म का सिद्धांत २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य ४. आत्मबोध २३.दान ५. मैं कौन हूँ? २४. मानव धर्म ६. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार ७. भुगते उसी की भूल २६. मृत्यु समय, पहले और पश्चात ८. एडजस्ट एवरीव्हेयर २७. निजदोष दर्शन से... निर्दोष टकराव टालिए २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय २९. क्लेश रहित जीवन ११. चिंता ३०. गुरु-शिष्य १२. क्रोध ३१. अहिंसा प्रतिक्रमण ३२. सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन ? ३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार ३४. पाप-पुण्य १६. अंतःकरण का स्वरूप ३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन ? ३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र ३७. आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे. Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण ? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. रेल्वेच्या प्लेटफॉर्म नंबर तीनच्या बाकावर बसलेल्या श्री अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरुपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण ? भगवंत कोण ? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय ? मुक्ती कशाला म्हणतात ? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशाप्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातच्या चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना प्राप्ती झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट ! ते स्वतः प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण ?' ह्याबद्द्लची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए. एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रकट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर 'चौदालोक'चे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत ! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत ! माझ्या आत प्रकट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो. ' " व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही, कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवित असत. 5 Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तीची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना ? दादाश्री परम पूज्य दादाश्री गावोगावी, देशविदेश परिभ्रमण करून मुमुक्षूंना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करवित होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरूमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूंना सत्संग व आत्मज्ञानप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूंना आत्मज्ञानप्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरूमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञानप्राप्ती नंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव घेत आहेत. - पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्राप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आजसुद्धा मोकळा आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करू शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करूनच स्वतःचा आत्मा जागृत होऊ शकतो. 6 Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल. प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदंडावर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींच्या गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करून वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतुने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रूटींसाठी आपली क्षमा प्रार्थितो. वाचकांना... * ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळतः 'वाणी, व्यवहारमां' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. जिथे जिथे 'चंदुभाऊ' या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे. __ पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेले काही गुजराती शब्द जसेच्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत. Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचा वाणीचा व्यवहार अविरतपणे चालतच असतो. अरे! कित्येक जण तर झोपेत सुद्धा बडबडत असतात!! वाणीचा व्यवहार दोन प्रकारे परिणमीत होत असतो, कडू नाहीतर गोड! गोड तर आरामात गळ्याखाली उतरते, परंतु कडू गळ्याखाली उतरत नाही! कडू-गोड दोन्हींमध्ये समभाव राहील, दोन्ही सारख्याच पद्धतिने उतरावे याची समज ज्ञानी देतच असतात! या काळाला साजेसे व्यवहारातील वाणीविषयी सर्व स्पष्टीकरण पूज्य दादाश्रींनी दिले आहे. त्यांना लाखो प्रश्न विचारले गेले आहेत, सर्व प्रकारचे, स्थूलतमपासून ते सूक्ष्मतमपर्यंतचे, उलट-सुलट सर्वच प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत पण तरीही ते त्याचक्षणी, सचोटीने व संपूर्ण समाधानकारक उत्तरे देत असत. दादाश्रींच्या वाणीत प्रेम, करूणा आणि खरेपणाचा संगम झळकताना दिसतो! परम पूज्य दादाश्री नेहमी सर्वांनाच प्रेमाने सांगायचे. 'विचारा, विचारा, तुमच्या सर्व प्रश्नांचे खुलासे करून घ्या, (मोक्षाचे) काम काढून घ्या.' तुम्हाला समजले नाही तर पुन्हा-पुन्हा विचारा, जोपर्यंत पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत विचारत रहा. संकोच न करता विचारा! आणि तुम्हाला जर समजले नाही तर त्यात तुमची चूक नाही, समजवणाऱ्याची अपूर्णता, कमतरता आहे! ही अतिसूक्ष्म गोष्ट आहे, 'तुम्हाला नाही समजणार' असे सांगून तुमच्या प्रश्नाला उडवून द्यायचे नसते. असे केले तर ते कपट केले म्हटले जाईल! स्वतः जवळ उत्तर नसेल, तर समोरच्याची समजून घेण्याची कमतरता आहे, असे म्हणून उडवून देणे हे साफ चुकीचे आहे ! दादाजींची वाणी ज्यांनी ऐकली असेल किंवा सूक्ष्मतेने वाणीचे वाचन केले असेल त्यांच्यावर, मन-वचन-कायेची एकता असलेल्या, आणि कथनीसोबत करणी असलेल्या खऱ्या ज्ञानींची इमेज(प्रभाव) पडल्याशिवाय राहणार नाही! त्यांना मग दुसऱ्या सर्व जागी नकली इमेज आहे हे सुद्धा जाणिवेत आल्याशिवाय राहणार नाही! प्रस्तुत 'वाणी व्यवहारात' या पुस्तकात वाणीने उत्पन्न होणारे संघर्ष आणि त्या संघर्षावर कशा प्रकारे समाधानकारक Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ तोडगा काढावा, तसेच स्वत:ची कटू वाणी, आघात करणारी वाणी असेल, तर त्यात कुठल्या प्रकारची समज वापरून बदल करावा? कोणाबद्दल अपशब्द, नकारात्मक शब्द बोललो, तर त्याच्या रिअॅक्शनमुळे स्वत:वर काय परिणाम होईल? वाणीमुळे झिडकारले जाते, तेव्हा ती वाणीच कशाप्रकारे फिरवायची की जेणे करून झिडकारल्यामुळे लागलेले घाव भरून निघतील. वाणीच्या अतिशय सूक्ष्म सिद्धांतिक स्पष्टीकरणासहित दैनंदिन व्यावहारिक जीवनात पति-पत्नीमध्ये, आई-वडील-मुलांमध्ये, मालक-नोकरामध्ये, जी वाणी बोलली जाते ती कशी सम्यक् प्रकारे असावी, त्याची पॅक्टिकल उदाहरणे देऊन सुंदर समाधान दादांनी 'वाणी व्यवहारात' या ग्रंथात केले आहे, ही उदाहरणे जणू काही आपल्याच जीवनाचा आरसा आहे असेच वाटते, हृदयात सामावून मुक्त करवते. यथार्थ ज्ञानींना ओळखणे अतिशय कठीण आहे. जसे हिऱ्याला पारखण्यासाठी रत्नपारखीची दृष्टी पाहिजे, तसेच दादांना ओळखण्यासाठी खऱ्या मुमुक्षुची दृष्टी विकसित करणे गरजेचे आहे ! केवळ आत्मार्थासाठीच निघालेली अशी ज्ञानींची स्याद्वाद वाणी युगा-युगांपर्यंत मोक्षमार्गाला प्रकाशित करीतच राहील. अशी ही जबरदस्त वचनबळ असलेली, निश्चय-व्यवहार दोन्हींना प्रतिपादीत करणारी वाणी प्रवाहीत झाली आहे, ज्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यावर स्वरुपाची प्राप्ती नक्कीच होऊ शकते, एका तासातच! - डॉ. नीरूबहन अमीन Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ अनुक्रमणिका 1. दुःखदायी वाणीचे स्वरुप 2. वाणीने झिडकारणे-अंतराय 3. शब्दांनी सर्जित अध्यवसन... 4. दुःखदायी वाणीच्यावेळी, समाधान ! 5. वाणी, आहेच टेपरेकॉर्ड 6. वाणीचे संयोग, पर-पराधीन 7. सत्य-असत्यामध्ये वापरली वाणी 8. दुःखदायी वाणीचे करावे प्रतिक्रमण 9. विग्रह, पति-पत्नीमधील 10. वाढवा 'रोपटी' अशाप्रकारे बागेत... 11. थट्टा-मस्करीची जोखीमदारी... 12. सुमधुर वाणीच्या कारणांचे असे करा सेवन 10 Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... [1] दुःखदायी वाणीचे स्वरुप प्रश्नकर्ता : ही जीभ अशी आहे की, घटक्यात असे बोलून टाकते, घटक्यात तसे बोलून टाकते. दादाश्री : त्याचे असे आहे, या जीभेत असा कोणताही दोष नाही. ही जीभ तर आत जे बत्तीस दात आहेत ना, त्यांच्यासोबत राहते, रात्रंदिवस काम करते परंतु भांडत नाही, झगडत नाही. म्हणजे जीभ तर खूप चांगली आहे पण आपण वाकडे आहोत. आपण ऑर्गनाइजर (व्यवस्थापक) वाकडे आहोत. चूक आपलीच आहे. जीभ तर खूप चांगली आहे, या बत्तीस दातांमध्ये राहते तरी ती कधी चावली जाते का? ती केव्हा चावली जाते? तर जेवतांना आपले चित्त दुसरीकडे गेले असेल तेव्हा जरा चावली जाते. आणि जर आपण थोडेसे वाकडे असू तरच चित्त दुसरीकडे जाते. नाहीतर चित्त दुसरीकडे जात नाही, आणि जीभ तर खूप छान काम करते. ऑर्गनाइजरने असे जरा तिरके पाहिले की जीभ दातात चावली गेली समजा. प्रश्नकर्ता : जीभेवर माझा ताबा राहील असे करा ना! कारण मी जास्त बोलतो. दादाश्री : तसे तर मी सुद्धा दिवसभर बोलतच असतो. तुमच्या बोलण्यात असे काही वाक्य तर येत नाही ना, की ज्यामुळे कोणी दुखावले जाईल? तोपर्यंत बोलणे वाईट म्हटले जात नाही. प्रश्नकर्ता : पण या शब्दांमुळे खूप भांडणे होतात. Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... दादाश्री : शब्दांमुळेच तर जग निर्माण झाले आहे. जेव्हा शब्द बंद होतील, तेव्हा जग बंद होऊन जाईल. __या जगात जी सर्व भांडणे झालेली आहेत ती शब्दांमुळेच झालेली आहेत. शब्द गोड असावेत, आणि जर शब्द गोड नसतील तर बोलूच नका. अरे, आपल्याशी कोणी भांडले असेल, त्याच्यासोबतही आपण जर गोड बोललो ना, तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एक होऊन जाऊ. समोर कोणी ज्येष्ठ व्यक्ति असेल, तरी त्याला म्हणेल 'तुम्हाला अक्कल नाही.' म्हणजे त्यांची अक्कल मापायला निघाले! असे बोलावे का? मग तर भांडणच होणार ना! आपण असे बोलू नये. 'तुम्हाला अक्कल नाही' असे बोलल्यावर समोरच्याला दुःख होईल म्हणून असे बोलू नये. सामान्य माणूस तर त्याला समज नसल्यामुळे असे बोलून जबाबदारी स्वीकारतो. पण जो समंजस आहे, तो तर अशी जबाबदारी घेणारच नाही ना! समज नसलेला जरी उलट बोलला, तरी स्वतः मात्र सुलट बोलतो. समोरचा तर अज्ञानतेमुळे वाटेल ते विचारेल पण आपण उलट बोलायला नको. जबाबदारी स्वतःची आहे. समोरच्या व्यक्तिला 'तुम्हाला समजणार नाही' असे म्हणणे, हे तर खूपच मोठे ज्ञानावरण कर्म आहे. 'तुम्हाला समजणार नाही' असे आपण बोलू नये, पण 'तुम्हाला समजावून सांगतो' असे बोलावे. 'तुम्हाला समजणार नाही' असे बोललो तर समोरच्याच्या काळजाला घाव पडतात. आपण आरामात बसलेलो असू आणि कुणीतरी येऊन म्हणेल की, 'तुम्हाला अक्कल नाही.' इतकेच जरी बोलला, की झाले, संपले! आता यात काय त्यांनी दगड मारला? शब्दांचाच परिणाम आहे या जगात. जर कोणाच्याही हृदयावर घाव लागला, तर तो शंभर-शंभर जन्मांपर्यंत सुद्धा भरत नाही. तो म्हणेल की, 'तुम्ही असे बोलले होते की ज्यामुळे माझ्या हृदयाला घाव लागला आहे. हे सर्व परिणामच आहेत! हे जग शब्दांच्या परिणामामुळेच उभे राहिले आहे. Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... कित्येक भगिनी मला सांगतात, 'माझ्या नवऱ्याने मला असे म्हटले होते की ज्यामुळे माझ्या हृदयाला घाव लागला आहे. तो मी पंचवीस वर्षे झाली तरीही विसरु शकत नाही.' म्हणजे त्यावेळी वाणीने कसा दगड मारला असेल?! ते घाव मग भरु शकत नाहीत, म्हणून असे घाव देऊ नयेत. आपले लोक घरात काठीने मारतात? काठीने किंवा हाताने नाही मारत? खालच्या जातीत हाताने किंवा काठीने मारामारी करतात. उच्च जातीत काठीने मारत नाहीत, परंतु शब्दांचे बाण, वचनबाणच मारत राहतात. एखाद्यास काही शब्द बोललो आणि त्याला आपल्या बोलण्याने जर वाईट वाटले, तर त्या शब्दास अपशब्द म्हणतात. असेच, सहजच जरी अपशब्द बोलला असाल ना, तरी त्यात जोखिम आहे. आणि चांगले शब्द जरी सहज, विनाकारण बोलत असाल तरीही ते हितकारी आहे. पण वाईट शब्द, अपशब्द जर विनाकारण बोलत असाल, तरी ते अहितकारी आहे. कारण कोणत्या शब्दांना अपशब्द म्हटले जाते? दुसऱ्यांना काही बोललात, आणि त्याला दुःख झाले त्या सर्व शब्दांनाच अपशब्द म्हटले जाते. बाहेर पोलिसांना तर कोणी काही बोलत नाही पण घरात मात्र बोलतात ना! पोलिसांना अपशब्द बोलणारा असा बहादुर(!) मी पाहिला नाही. पोलिस तर आपल्याला चांगलाच धडा शिकवतात. घरात कोण धडा शिकवणार? आपण नवीन धडा तर शिकायला हवा ना?! प्रश्नकर्ता : व्यापार करत असताना समोर जो कोणी व्यापारी असेल, त्याला समजत नसल्यामुळे आपल्याकडून क्रोध केला जातो, तर तेव्हा काय करावे? दादाश्री : व्यापाऱ्यासोबत तर समजा व्यापारासाठी आहे, तेथे तर बोलावे लागते. तसे तर तिथे सुद्धा 'न' बोलण्याची कला आहे. तिथे न बोलता सर्व कामे होतील असे आहे. पण ही कला लवकर अवगत होईल अशी नाही, ही कला फार उच्च आहे. म्हणून मग तेथे भांडा, आणि नंतर जो फायदा(!) होईल तो बघून घ्यायचा, तो मग जमा करून टाकावा, भांडल्यानंतर जो फायदा(!) होईल ना, तो वहीखात्यात जमा करून Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... टाकावा. बाकी, घरात मात्र बिलकूल रागवायचे नाही. घरातली माणसे तर आपलीच असतात. _ 'न बोलण्याची' कला, ही सर्वांनाच जमेल अशी नाही. खूपच अवघड आहे ही कला. ह्या कलेत तर काय करावे लागेल? तर 'ती व्यक्ति समोर येईल, त्या आधिच त्याच्या शुद्धात्म्याशी आपले बोलणे झाले पाहिजे, आणि त्याला शांत केले पाहिजे, आणि त्यानंतर आपण काहीही बोलायचे नाही. त्यामुळे आपले सर्व काम होऊन जाईल.' हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगत आहे. बाकी खूपच सूक्ष्म आहे ही कला. कोणाला कडक शब्दांत सुनावले तर, त्याचे फळ म्हणून बऱ्याच वेळेपर्यंत तुम्हाला त्यांच्या स्पंदनांचा परिणाम होत राहतो. एकही अपशब्द आपल्या तोंडून निघता कामा नये. सुशब्द असावेत. पण अपशब्द मात्र असू नयेत. आणि जर चुकीचा शब्द निघाला म्हणजे स्वत:च्या आत भावहिंसा झाली, हीच आत्महिंसा मानली जाते. आता लोक इथेच चुकत असतात आणि दिवसभर क्लेश करत राहतात. हे जे शब्द निघतात ना, ते शब्द दोन प्रकारचे असतात, या जगात शब्द जे आहेत त्यांची क्वॉलिटी (गुणवत्ता) दोन प्रकारची आहे. चांगले शब्द शरीरास निरोगी बनवतात आणि खराब शब्द शरीरास रोगी बनवतात. म्हणून एक सुद्धा वाईट शब्द निघायला नको. 'एय...नालायका.' आता यात 'एय' शब्द नुकसान करणारा नाही. पण 'नालायक' शब्द खूपच नुकसान करणारा आहे. 'तुला अक्कल नाही' असे बायकोला बोललात, तर हा शब्द समोरच्याला दुःख देणारा आहे आणि स्वत:मध्ये रोग उत्पन्न करणारा आहे. त्यावर ती म्हणते 'तुमच्यात तरी कुठे बरकत आहे !' म्हणून मग दोघांमध्ये रोग उत्पन्न होतो. हे तर ती त्याची बरकत शोधते आणि हा तिची अक्कल शोधतो. अशीच सर्व दशा आहे ! म्हणून आपण स्त्रियांशी भांडण करू नये. आणि स्त्रियांनी पुरुषांशी Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... भांडण करू नये. कारण ते बंधनकर्ता आहेत, म्हणूनच समाधान आणले पाहिजे. एका भगिनीस तर मी विचारले, 'नवऱ्यासोबत वादविवाद-भांडणे वगैरे होतात का? क्लेश होतो का?' तेव्हा ती म्हणाली, 'नाही, कधीच नाही.' मी विचारले, 'वर्षभरात एकदाही भांडण झाले नाही?' तेव्हा ती म्हणाली, 'नाही.' मी तर हे ऐकून आश्चर्यचकीतच झालो की हिंदुस्तानात अशीही घरं आहेत! पण ती ताई मात्र अशी होती. नंतर मी पुढे विचारले की, 'काहीतरी तर होत असेल ना. नवरा आहे म्हटल्यावर काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही.' तेव्हा ती म्हणाली, 'नाही, कधीतरी टोमणे मारतात.' गाढवाला काठीने मारायचे आणि बायकांना टोमण्यांनी मारायचे. स्त्रिला काठीने मारु शकत नाही पण टोमण्यांनी मारतात. टोमणे तुम्ही पाहिलेत ना? टोमणे मारतात ते! तेव्हा मी म्हणालो. 'तो टोमणे मारतो, तेव्हा तुम्ही काय करता?' त्यावर ती ताई म्हणाली, तेव्हा, 'मी त्यांना सांगते की तुम्ही आणि मी, आपण दोघे कर्माच्या उदयामुळे एकत्र आलो आहोत, कर्माच्या उदयाने आपले लग्न झाले, तुमचे कर्म तुम्हाला भोगायचे आणि माझे कर्म मला भोगायाचे. मी म्हणालो, 'धन्य आहात ताई तुम्ही!' आपल्या हिंदुस्तानात अशा आर्य स्त्रिया अजूनही आहेत. यांना सती म्हणतात. हे सर्व एकत्र कशामुळे आले? आपल्याला आवडत नसतानाही का एकत्र राहावे लागते? तर हे सर्व कर्म करवून घेते. पुरुषांना आवडत नसेल तरी जाणार कुठे? पण त्यांनी समजून जावे की, 'माझ्या कर्मांचा उदय आहे.' असे मानून शांतता राखली पाहिजे. पत्नीचा दोष काढू नये. दोष काढून करायचे तरी काय? दोष काढून कुणी सुखी झाला का? कुणी सुखी होऊ शकतो का? आणि मन ओरडते की 'कितीतरी बोलून गेली, किती सर्व झाले,' तेव्हा म्हणावे, ‘झोपून जा ना, हे घाव तर लगेच भरुन जातील' असे म्हणावे. आणि घाव भरतातही लगेचच.... हो ना, खांदे थोपटून द्यावे म्हणजे झोपेल. प्रश्नकर्ता : वाणीचा अपव्यय आणि दुर्व्यय हे समजवा. Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ur दादाश्री : अपव्यय म्हणजे वाणीचा चुकीचा वापर करणे आणि दुर्व्यय म्हणजे व्यय (वापर) न करण्यासारख्या जागेवर व्यय करणे. उगाचच बोंबलत राहणे, त्यास दुर्व्यय म्हणतात. तुम्ही पाहिलेत का? विनाकारण बोंबलत राहतात असे असतात ना लोक? त्यास दुर्व्यय म्हणतात. जेथे जशी वाणी बोलली पाहिजे तिथे दुसरीच वाणी बोलणे, याला अपव्यय म्हणतात. जिथे जे योग्य बसत असेल, तसे ज्ञान न बोलता दुसऱ्याच प्रकारे बोललो, तर त्यास अपव्यय म्हणतात. खोटे बोलणे, कावेबाजी करणे, हा सर्व वाणीचा अपव्यय म्हटला जातो. वाणीचा दुर्व्यय आणि अपव्यय या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. अपव्यय म्हणजे सर्व प्रकारे नालायक, सर्व प्रकारे दुरुपयोग करतो. वकील दोन रुपयांसाठी खोटे बोलतात की 'हो, याला मी ओळखतो.' त्यास अपव्यय म्हणतात. आज तर लोक तुमची टीका सुद्धा करतात. स्वतः काय करत आहे त्याचे भान नाही बिचाऱ्याला, म्हणून असे करतो. दुःखी माणूसच दुसऱ्याची टीका करतो, दुःखीच दुसऱ्याला त्रास देतो. सुखी माणूस कोणाची टीका करत नाही. 'आपली टीका करण्याचा लोकांना अधिकार आहे. आपल्याला कोणाची टीका करण्याचा अधिकार नाही.' (आप्तसूत्र) तर निंदा आणि टीका यात फरक आहे? टीका म्हणजे एखाद्याचे प्रत्यक्ष दिसणारे दोष उघड करणे, त्यास टीका म्हणतात, आणि निंदा म्हणजे दिसणारे-न दिसणारे सर्व दोष गात राहणे, सारखे त्याचे वाईटच बोलत राहणे, त्यास निंदा म्हणतात. 'कोणाची थोडीफार पण टीका करणे केवळज्ञानाला बाधक आहे, अरे, आत्मज्ञानालाही बाधक आहे, समकित होण्यासाठीही बाधक आहे.' (आप्तसूत्र) प्रश्नकर्ता : कोणाची निंदा करणे, हे कशात गणले जाते? Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... दादाश्री : निंदा, ही विराधना गणली जाते. पण प्रतिक्रमण केले तर ती निघून जाते. ते अवर्णवादासारखे आहे. म्हणून तर आपण म्हणत असतो की कोणाची निंदा करू नका, तरीही लोक मागून निंदा करतात. म्हणजे कोणाच्याही निंदेत पडू नये. कमाई केली नाही, किर्तन केले नाही तरी हरकत नाही, पण निंदेत मात्र पडू नका. मी म्हणतो की निंदा करण्यात आपला काय फायदा? त्यात तर भयंकर नुकसान आहे. या जगात जबरदस्त नुकसान जर कशात असेल तर ते निंदा करण्यात आहे. कोणत्याही माणसाची निंदा करू नये. अरे, सहज सुद्धा काही बोलू नये. तसे केल्याने भयंकर दोष लागतो. आणि त्यातूनही इथे सत्संगात, परमहंसच्या सभेत तर कोणाबद्दलही अजिबात वाईट बोलू नये. एखाद्या वाईट कल्पनेमुळे सुद्धा ज्ञानावर खूप मोठे आवरण येते. तर मग या 'महात्म्यांची' टीका, निंदा केली तर कितीतरी मोठे आवरण येणार. दूधात साखर विरघळते त्याप्रमाणे सत्संगात मिसळून गेले पाहिजे. ही बुद्धिच आत ढवळाढवळ करते. आम्ही सर्वांचे सर्वकाही जाणतो, पण तरीसुद्धा कोणाबद्दलही एक अक्षर सुद्धा बोलत नाही. एक अक्षर जरी वाईट बोलले तरी ज्ञानावर मोठे आवरण येत असते. प्रश्नकर्ता : अवर्णवाद हा जो शब्द आहे ना, त्याचा 'एक्जॅक्ट' (खरा) अर्थ काय आहे? दादाश्री : कसेही करून जसे आहे तसे न सांगता, त्याहून उलटे चित्र रंगवून सांगणे, तोच अवर्णवाद! जसे आहे तसे तर नाही परंतु त्याहून अगदी उलटे. जसे आहे तसे वर्णन करणे म्हणजे वाईटास वाईट बोलणे आणि चांगल्यास चांगले बोलणे, त्यास अवर्णवाद म्हणत नाही. परंतु सर्वच वाईट बोलणे त्यास अवर्णवाद म्हणतात. अवर्णवाद म्हणजे एखाद्या माणसाची बाहेर अब्रू चांगली असेल, प्रतिष्ठा असेल, किर्ती असेल त्यास आपण उलटे बोलून तोडून टाकणे, याला अवर्णवाद म्हणतात. हा अवर्णवाद तर निंदा करण्यापेक्षाही जास्त वाईट आहे. अवर्णवाद म्हणजे एखाद्या विषयी गाढ निंदा करणे. हे लोक Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... निंदा कशी करतात? तर साधारण निंदा करतात. पण गाढ निंदा करणे याला अवर्णवाद म्हणतात. प्रश्नकर्ता : 'हे दादा भगवान !' मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा, प्रत्यक्ष किंवा परोक्ष, जिवंत किंवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचित्मात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा का प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या.' । दादाश्री : आपले कोणी नातेवाईक वारले असतील आणि लोक त्यांची निंदा करत असतील, तर आपण त्यात पडू नये, आणि जर त्यात पडले असू तर नंतर पश्चाताप केला पाहिजे की असे पुन्हा घडू नये. मेलेल्या व्यक्तिची निंदा करणे हा भयंकर मोठा गुन्हा आहे. मेलेल्यालाही सोडत नाहीत, लोक. असे करतात की नाही? असे वागायला नको, एवढेच मी सांगू इच्छितो. यात जोखिम आहे. खूपच मोठी जोखिम आहे. आता रावणाचे वाईट बोलू नये. कारण की अजूनही ते देहधारी आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत 'फोन' पोहोचतो. 'रावण असा होता आणि तसा होता' असे बोललो, तर ते त्याला पोहोचते. त्यावेळी पूर्वीच्या 'ओपिनियन' (अभिप्राया) मुळे असे बोलले जाते. म्हणून ही कलम बोलत जा, त्यामुळे जरी असे बोलले गेले तरी दोष लागणार नाही. एकपण शब्द कडू बोलू नये. कडू बोलल्यामुळेच तर सर्व भांडणं होतात. एकच शब्द 'आंधळ्याचा आंधळा' या शब्दाने तर संपूर्ण महाभारत उभे राहिले. दसरे तर काही विशेष कारण नव्हते. हेच मुख्य कारण होते! द्रौपदीने म्हटले होते ना? टोमणे मारले होते ना? आता त्याचे फळ त्या द्रौपदीला मिळाले. कायमच, एक जरी शब्द कडू बोलला गेला तर त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार का? प्रश्नकर्ता : वाणीतून कठोरता कशी निघेल? Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... दादाश्री : ते तर आपण वाणीला जशी वळवू तशी वळते. परंतु आतापर्यंत आपणच वाणीला कठोर बनविली होती, लोकांना धमकावण्यासाठी, घाबरवण्यासाठी. समोरचा कठोर बोलत असेल तरी आपण मृदु बोलले पाहिजे. कारण आपल्याला सुटायचे आहे. हे दादा, कंठात विराजमान व्हा, असे म्हटल्याने वाणी सुधारेल, येथे गळ्यात दादांचे निदिध्यासन केले तरीही वाणी सुधारेल. प्रश्नकर्ता : तंतीली भाषा म्हणजे काय? दादाश्री : रात्री बायकोसोबत भांडण झाले असेल, तर सकाळी चहा देताना ती चहाचा कप असे आपटून ठेवते. तेव्हा आपण समजून जावे की, 'अरेच्या, रात्री झालेले भांडण अजूनही विसरली नाही!' यालाच तांता म्हणतात. आता कोणीतरी येऊन म्हणेल, 'तुम्ही सगळे बिनअकलेचे येथे येऊन बसले आहात? चला, उठा जेवायला.' तेव्हा बसलेले सर्व लोक म्हणतील, 'अरे, झाले आमचे जेवण! हे जे आत्ता तू खाऊ घातलेस, ते काय कमी आहे ?!' याला दुःस्वर म्हणतात. कित्येक जण तर खिचडी खाऊ घालतात, पण ते असे गोड बोलतात की, 'भाऊ, या जेवायला, तुमचे स्वागत आहे.' असे ऐकल्यावर आपल्याला खिचडी कशी छान लागते. मग जरी फक्त खिचडीच असेल, पण हे सुस्वर आहेत. एका भाऊंनी मला विचारले की, 'तुमच्यासारखी गोड वाणी माझी केव्हा होईल?' तेव्हा मी सांगितले की, 'हे जे सर्व नेगेटिव शब्द आहेत ते जेव्हा बोलण्याचे बंद होतील तेव्हा.' कारण प्रत्येक शब्द हा त्याच्या गुण-पर्यायासोबत असतो. नेहमी पॉजिटिव बोला. आत आत्मा आहे, आत्म्याची हजेरी आहे. त्यासाठी पॉजिटिव बोला. पॉजिटिवमध्ये नेगेटिव बोलू नये. पॉजिटिव झाले, यात नेगेटिव(नकारात्मक) बोलणे हा गुन्हा आहे आणि पॉजिटिवमध्ये नेगेटिव बोलता, म्हणून ह्या सर्व समस्या उभ्या राहतात. 'काहीच बिघडलेले Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... नाही' असे बोलल्याबरोबर लगेचच आत कितीतरी बदल होतो. म्हणून पॉजिटिव बोला. वर्षानुवर्षे निघून गेली, पण माझे मन जरा सुद्धा नेगेटिव झाले नाही. कोणत्याही संयोगांमध्ये जरा सुद्धा नेगेटिव झाले नाही. लोकांचेही मन जर पॉजिटिव झाले, तर ते भगवंतच बनतील. म्हणून लोकांना मी काय सांगत असतो की, समभावाने निकाल करून, ही नेगेटिविटी सोडत जा, त्यानंतर पॉजिटिवनेस आपोआपच राहील. व्यवहारात पॉजिटिव, आणि निश्चयात पॉजिटिवही नाही आणि नेगेटिवही नाही! 2. वाणीने झिडकारणे-अंतराय प्रश्नकर्ता : कित्येक घरे अशी असतात की जिथे वाणीने वादविवाद होत असतात, पण त्यांचे मन आणि हृदय मात्र साफ असते. दादाश्री : आता जर वाणीने क्लेश होत असेल, तर समोरच्या व्यक्तिच्या हृदयावर परिणाम होतो. परंतु ते जर वरकरणी असेल तर हरकत नाही. बाकी असे आहे, की बोलणारा जर हृदयाने आणि मनाने साफ असेल तर तो बोलू शकतो. पण ऐकणाऱ्याला तर ते दगड मारल्यासारखे वाटते, म्हणून मग क्लेश होतोच. जिथे बोल(शब्द) थोडे जरी खराब असतील, विचित्र असतील तिथे क्लेश होतो. ____ बोल तर लक्ष्मी आहे. ते तर मोजून-मापून द्यायला हवेत. लक्ष्मी कोणी मोजल्याशिवाय देतो का? शब्दाचे असे आहे की ते जर सांभाळले गेले तर तिथे सर्वच महाव्रत येऊन जातात. आपल्याकडून कोणालाही जरासुद्धा झिडकारले जाणार नाही, असे आपले जीवन असायला हवे. झिडकारण्यास तुम्ही ओळखता की नाही? चांगलेच ओळखता ना? अगदी बरोबर? तुम्ही झिडकारता का कोणाला? प्रश्नकर्ता : आतून सूक्ष्मरित्या झिडकारले जाते. दादाश्री : सूक्ष्मात झिडकारले त्यास हरकत नाही. सूक्ष्मात झिडकारले, ते तर आपल्यासाठी नुकसानकारक आहे. तसे तर Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... समोरच्यासाठीही विरोधकर्ताच आहे. कारण समोरचा आपल्यासोबत एकता अनुभवू शकत नाही. प्रश्नकर्ता : जर कधी स्थूलपणे झिडकारले गेले असेल तरीसुद्धा लगेच प्रतिक्रमण होऊनच जाते. दादाश्री : हो, झिडकारल्यानंतर त्याचे प्रतिक्रमण करायचे. आणि दुसरे म्हणजे, पुन्हा त्याच्याशी चांगले बोलून गोष्ट वळवून घ्यावी. आम्हाला मागच्या जन्मांचे आत दिसते तेव्हा आश्चर्य वाटते की ओहोहो, झिडकारण्याचे किती भयंकर नुकसान आहे ! म्हणून मजुरांचा सुद्धा तिरस्कार वाटू नये असे आम्ही वागतो. शेवटी साप बनूनही चावेल, तिरस्काराचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. प्रश्नकर्ता : कोणता उपाय करावा की ज्यामुळे झिडकारण्याचा परिणाम भोगण्याची पाळीच येऊ नये? __दादाश्री : यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही, मात्र सतत प्रतिक्रमण करतच राहायचे. जोपर्यंत समोरच्याचे मन बदलत नाही तोपर्यंत प्रतिक्रमण करत राहायचे. आणि तो प्रत्यक्ष भेटल्यावर गोड बोलून त्याची माफी मागावी की, 'भाऊ, माझी तर फार मोठी चूक झाली. मी तर मूर्ख आहे, बेअक्कल आहे.' असे म्हटल्याने समोरच्या व्यक्तिचे घाव भरतात. आपण स्वत:ला कमी लेखले म्हणजे समोरच्याला बरे वाटते, तेव्हा त्याचे घाव भरुन निघतात. प्रश्नकर्ता : पाया पडूनही माफी मागून घ्यावी. दादाश्री : नाही. पाया पडलो तर गुन्हा ठरेल. तसे नाही, दुसऱ्या प्रकारे वाणीने वळवा. वाणीने घाव लागले असेल तर वाणीनेच फिरवा. पाया पडल्यामुळे तो जर माथेफिरु असेल तर परत त्याचा चुकीचा अर्थ घेईल. मला अनेक प्रकारचे लोक भेटतात. पण मी त्यांच्यासोबत एकता तुटू देत नाही. एकता तुटली तर त्याची शक्ति उरत नाही. जोपर्यंत माझी Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... एकता आहे, तोपर्यंत त्याची शक्ति आहे. म्हणून सांभाळावे लागते. आपण ज्या प्रयोगशाळेत बसलो आहोत, तेथील सर्व प्रयोग पाहावे लागतात ना! प्रश्नकर्ता : हे अंतराय कसे पडतात? दादाश्री : हा भाऊ कोणाला तरी नाश्टा देत असेल, तेव्हा तुम्ही म्हणाल की, 'आता राहू दे ना, उगाच वाया जाईल.' त्यास अंतराय (विघ्न) पाडले असे म्हणतात. कोणी दान देत असेल तेथे तुम्ही म्हणाल की, 'याला कशाला देता? हा तर हडपून टाकेल असा आहे.' तर इथे तुम्ही दान देण्याचे अंतराय पाडले. मग तो दान देईल किंवा नाही देणार, ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही मात्र अंतराय पाडला. त्यामुळे तुम्हाला दुःखातही कोणी दाता मिळणार नाही. ___ तुम्ही ज्या ऑफीसमध्ये नोकरी करत असाल तेथे तुमच्या असिस्टंन्टला 'बेअक्कल' म्हणालात तर तुमच्या अकलेवर अंतराय पडले! बोला, आता या अंतरायात फसत-फसत हा मनुष्य जन्म असाच वाया घालवला आहे! तुम्हाला अधिकारच नाही समोरच्याला बेअक्कल म्हणण्याचा. तुम्ही असे बोलल्यावर समोरचा सुद्धा वाईट बोलतो, म्हणून त्यालाही अंतराय पडतात! सांगा आता, या अंतरायापासून हे जग कसे बरे थांबेल? तुम्ही जर कोणाला नालायक म्हटले, तर तुमच्या लायकी वर अंतराय पडतो. तुम्ही जर त्याचे लगेचच प्रतिक्रमण केले तर अंतराय पडण्याअगोदरच धुतले जातील. प्रश्नकर्ता : वाणीने अंतराय पाडले नसतील, परंतु मनाने अंतराय पाडले असतील तर? दादाश्री : मनाने पाडलेले अंतराय जास्त परिणामकारक असतात, त्याचा परिणाम तर दुसऱ्या जन्मात होतो. आणि हे वाणीने बोललेले तर ह्या जन्मातच परिणाम करते. प्रश्नकर्ता : ज्ञानांतराय, दर्शनांतराय कशामुळे पडतात? दादाश्री : धर्मात उलट-सुलट बोलतात, 'तुम्ही काहीच समजत Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... नाही आणि मीच समजतो.' त्यामुळे ज्ञानांतराय आणि दर्शनांतराय पडतात. किंवा जर कोणी आत्मज्ञान प्राप्त करत असेल, त्यात विघ्न घातले तर त्याला ज्ञानाचा अंतराय पडतो. कोणी म्हणेल की, 'ज्ञानी पुरुष' आले आहेत, तुम्हालाही यायचे असेल तर चला.' तेव्हा जर तुम्ही असे म्हणालात की, 'असे 'ज्ञानीपुरुष' तर पुष्कळ बघितले.' हा पाडला अंतराय! आता मनुष्य आहे, म्हणून बोलल्याशिवाय तर राहणारच नाही ना! तुम्हाला तिथे जाता येत नसेल पण तेव्हा जर तुमच्या मनात असे भाव आले की 'ज्ञानीपुरुष' आले आहेत, पण मी जाऊ शकत नाही, तर त्यामुळे अंतराय तुटतात. अंतराय पाडणारा स्वतःच्या अज्ञानतेमुळे अंतराय पाडत असतो. त्याला त्याची जाणीवच नसते. कितीतरी अंतराय पाडलेले आहेत या जीवाने! हे ज्ञानी पुरुष आहेत, हातात मोक्ष देतात. चिंतारहित स्थिती बनवतात, तरीसुद्धा अंतराय किती आहेत की त्याला 'वस्तू'ची प्राप्तीच होत नाही! कित्येक म्हणतात की, 'असे अक्रम ज्ञान असते का कुठे ? तासाभरात मोक्ष होतो का कधी कुठे?' असे बोलतात म्हणजे त्यांना पडले अंतराय. या जगात काय घडू शकत नाही, हे सांगताच येत नाही. म्हणून बुद्धिने मापण्यासारखे हे जग नाही. कारण की हे घडलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. 'आत्मविज्ञानासाठी' तर हमखास अंतराय पाडलेले असतात. हे सर्वात अंतिम स्टेशन आहे. प्रश्नकर्ता : संसार ही वस्तूच अशी आहे की, जिथे नुसते अंतरायच आहेत. दादाश्री : तुम्ही स्वतःच परमात्मा आहात, पण या पदाचा लाभ मिळत नाही. कारण कितीतरी अंतराय आहेत. 'मी चंदुभाऊ आहे' बोलल्याबरोबर अंतराय पडतात. कारण भगवंत सांगतात की, 'तू मला चंदु म्हणतोस?' हे जरी अज्ञानतेने बोललास तरीसुद्धा अंतराय पडतात. चुकून जरी विस्तवावर हात पडला तरी विस्तव सोडतो का? प्रश्नकर्ता : दोघे जण बोलत असतील आणि आपण मधेच बोललो, Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ १४ वाणी, व्यवहारात... तर यास दखल केली असे म्हटले जाईल का? की मग ते आपले डिस्चार्ज आहे? दादाश्री : दखल केल्यामुळेच ढवळाढवळ होत असते. प्रश्नकर्ता : दखल केल्यामुळे म्हणजे नक्की कशा प्रकारे होते? दादाश्री : ती व्यक्ति जर आपल्याला म्हणाली की, 'तू का मधेच बोललास?' तेव्हा जर आपण म्हणू की, 'आता बोलणार नाही.' तर ती ढवळाढवळ नाही, पण त्याऐवजी आपण असे म्हणालो की 'मी बोललो नाही तर ही गाडी चालणारच नाही, बिघडेल सर्व.' यास ढवळाढवळ केली असे म्हणतात, मधेच बोलले जाते, यास ढवळाढवळ म्हणतात. पण ही ढवळाढवळ सुद्धा डिस्चार्ज आहे. आता या डिस्चार्ज दखलमध्ये सुद्धा नवीन दखल होऊन जाते. ढवळाढवळ करणे, हस्तक्षेप करणे हेच अंतराय आहेत. तुम्ही परमात्मा आहात, आणि परमात्म्याला अंतराय कसे असू शकतात? पण तू तर ढवळाढवळ करतोस की, 'हे असे का केले? असे कर.' अरे, पण तुम्ही असे का करता? कोणाला चुकीचे म्हटले, ते स्वत:च्या आत्म्यावर धूळ टाकल्यासारखे आहे. आपल्याला जसे आवडते तसेच बोलावे. प्रॉजेक्ट असे करा की जे तुम्हाला आवडेल. हे सर्व तुमचेच प्रॉजेक्शन आहे. यात भगवंतांनी हस्तक्षेप केलेला नाही. कोणावर टाकलेली वाणी, ती सर्व शेवटी तुमच्यावरच पडते असते. म्हणून अशी शुद्ध वाणी बोला की ती शुद्ध वाणीच तुमच्यावर पडेल. आम्ही कोणालाही 'तू खोटा आहेस, तुझे चुकीचे आहे' असे म्हणत नाही. चोराला ही खोटे म्हणत नाही. कारण त्याच्या व्हयू पॉइंट ने (दृष्टीकोनाने) तो खरा आहे. हो, आम्ही त्याला चोरी केल्याचे फळ काय मिळेल, ते 'जसे आहे तसे' समजावून सांगतो. Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... 3. शब्दांनी सर्जित अध्यवसन... ही जी तार वाजते ना, तर एकच तार छेडल्यावर आत किती आवाज उत्पन्न होतात? प्रश्नकर्ता : खूप वाजतात. दादाश्री : एक जरी छेडली तरीही? अशाच प्रकारे हा एकच शब्द जरी बोलायचा झाला, तरी त्यामुळे कितीतरी शब्द मनात उभे राहतात. याला भगवंतांनी अध्यवसन असे म्हटले आहे. अध्यवसन म्हणजे बोलायचे नसेल, तरीही ते सर्व उभे राहते. स्वत:ला बोलण्याचा भाव झाला ना, म्हणजे ते शब्द आपोआपच बोलले जातात. जेवढी शक्ति असेल तेवढी सर्व जागृत होते, इच्छा नसली तरीही! अध्यवसन इतके सारे उभे राहतात की ते कधीही मोक्षाला जाऊ देत नाहीत. त्यामुळेच तर आम्ही अक्रम विज्ञान दिले आहे, किती सुंदर अक्रम विज्ञान आहे! कोणताही बुद्धिमान माणूस या कोड्याचा अंत आणू शकेल, असे हे विज्ञान आहे. 'तुम्ही नालायक आहात' असे बोललो, तर हा शब्द ऐकून त्याला तर दःख झालेच, पण त्याचे जे पर्याय उभे होतील, ते तुम्हाला खूप दुःख देतील आणि जर तुम्ही म्हणाल, की तुम्ही खूप चांगले आहात, सज्जन आहात, तर ते शब्द तुम्हाला आत शांती देतील. तुमच्या अशा बोलण्याने त्यालाही शांती वाटते आणि तुम्हालाही शांती. म्हणजे इथेच सावध होण्याची गरज आहे ना! तुम्ही एक शब्द बोलला की 'हा नालायक आहे,' तर 'लायक'चे वजन एक किलो असते आणि 'नालायक'चे वजन चाळीस किलो असते. म्हणून 'लायक' बोलाल तर त्याची स्पंदने खूप कमी होतील आणि 'नालायक' बोललात तर चाळीस किलो स्पंदने निर्माण होतील, हे बोल बोलण्याचे परिणाम! प्रश्नकर्ता : म्हणजे चाळीस किलोचे पेमेन्ट उभे राहिले. दादाश्री : सुटकाच नाही ना! Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : मग त्यावर आम्ही ब्रेक कसा लावायचा? त्यावर उपाय काय? दादाश्री : 'ही वाणी चुकीची आहे' असे जेव्हा वाटेल तेव्हापासून तुमच्यात दिवसेंदिवस परिवर्तन होत जाईल. एका व्यक्तिला तुम्ही म्हणालात की, 'तुम्ही खोटारडे आहात.' आता 'खोटारडे' म्हटल्याबरोबर आत एवढे सारे सायन्स घेरून टाकते, त्यामुळे इतके पर्याय उत्पन्न होतात की तुम्हाला दोन तासांपर्यंत त्याच्यावर प्रेमच उत्पन्न होत नाही. म्हणून असे शब्द न बोलणे हेच उत्तम आणि जर बोलले गेले तर प्रतिक्रमण करा. मन-वचन-कायेचे सर्व लेपायमान भाव, म्हणजे काय? तर ते चेतन भाव नाहीत. ते सर्व प्राकृतिक भाव, जड भाव आहेत. लेपायमान भाव म्हणजे आपल्याला लेपित व्हायचे नसेल तरी लेपायमान करून टाकतात. म्हणून तर आम्ही सांगत असतो ना, की 'मन-वचन-कायेच्या तमाम लेपायमान भावांपासून मी सर्वथा निर्लेपच आहे' या लेपायमान भावांनी संपूर्ण जगाला लेपायमान केले आहे आणि हे लेपायमान भाव फक्त प्रतिध्वनीच आहेत, शिवाय ते निर्जिवही आहेत. म्हणून तुम्ही त्यांचे एकू नका. परंतु ते आपोआप जातील असेही नाहीत. ते बोंबाबोब करीतच राहतील. तेव्हा मग कोणता उपाय कराल? अध्यवसन बंद करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? तर 'ते तर माझे उपकारी आहेत' असे काहीतरी बोलावे लागेल. तुम्ही असे बोलाल तेव्हा ते सर्व वाईट भाव बंद होतील, की हा तर पुन्हा काहीतरी नवीनच, 'उपकारी' आहे असे बोलतोय. म्हणून मग शांत होतील! तुम्ही म्हणालात, की 'येथे नुकसान होईल असे आहे.' असे म्हटल्याबरोबर सर्व लेपायमान भाव तेहेत-हेने बोंबा मारु लागतात, 'असे होऊन जाईल आणि तसे होऊन जाईल.' अरे पण भाऊ, तुम्ही बाहेरच बसा ना आता, मी तर सहजच असे बोललो, पण तुम्ही का बोंबाबोंब Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... करता? म्हणून आपण असे म्हणावे की, 'नाही, नाही. हे तर लाभदायी आहे.' तेव्हा मग हे सर्व भाव शांत होतात. हे टेपरेकॉर्ड आणि ट्रान्समीटर अशी कित्येक साधने आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मोठमोठ्या माणसांना सतत भीती वाटत असते की कोणी काही रेकॉर्ड करून घेतले तर? आता या टेपरेकॉर्डरमध्ये तर फक्त शब्द टेप होतील इतकेच आहे. पण या मनुष्याचे शरीर-मन हे सर्वच टेप होईल असेच आहे. याची लोकांना जरासुद्धा भीती वाटत नाही. समोरचा जरी झोपेत असेल आणि तुम्ही म्हणाल की 'हा नालायक आहे' तर ते त्याच्या आत टेप होऊन गेले. ते मग त्याला फळ देते. म्हणून कोणी झोपलेला असतानाही बोलू नये, एक अक्षरही बोलू नये. कारण की सर्व टेप होत असते, अशी ही मशीनरी आहे. बोलायचे असेल तर चांगले बोला की 'साहेब, तुम्ही खूप चांगले आहात.' चांगला भाव ठेवा तर त्याचे फळ तुम्हाला सुख मिळेल. पण सहज जरी उलटे बोलाल, अंधारात जरी बोलाल, की एकटे असतानाही बोलाल तरी त्याचे फळ विषासारखे कडू येईल. हे सर्वच टेप होणार आहे म्हणून चांगले टेप होईल असे करा. जेवढे प्रेममय डीलिंग (व्यवहार) होईल तेवढीच वाणी या टेप रेकॉर्डमध्ये परवडेल अशी आहे, त्याचे यश चांगले मिळेल. न्याय-अन्याय बघणारा तर पुष्कळ लोकांना शिव्या देत असतो. हे तर बघण्यासारखेच नाही. न्याय-अन्याय तर एक थर्मामीटर आहे या जगाचे, की एखाद्याचा ताप किती उतरला आणि किती चढला?! जग कधीच न्यायी बनणार नाही आणि अन्यायी सुद्धा होणार नाही. म्हणजे हा गोंधळ असाच चालत राहणार. हे जग जेव्हापासून आहे, तेव्हापासून असेच्या असेच आहे. सत्युगात थोडे कमी बिघडलेले वातावरण असते, परंतु आता तर जास्त बिघडलेले आहे. श्रीरामाच्या काळात जर सीतेचे हरण करणारे होते, तर आता नसतील का? असे तर चालतच राहणार. पूर्वीपासून ही मशीनरी अशीच आहे. आणि त्यांना काही सुचत नाही, स्वत:च्या जबाबदारीचे भान Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ १८ वाणी, व्यवहारात... नाही, म्हणून बेजबाबदारीने बोलू नका. बेजबाबदारीने वागू नका. बेजबाबदारीने काहीच करू नका. सर्वकाही पॉजिटिव घ्या. कोणाचे चांगले करायचे असेल तर करा. पण वाईटामध्ये पडूच नका, वाईट विचारही करू नका, कोणाचे वाईट ऐकूही नका. खूप जोखिमदारी आहे. नाहीतर एवढे मोठे जग, यात मोक्ष तर स्वत:च्या आतच पडलेला आहे, पण स्वतःला सापडत नाही! आणि कित्येक जन्मांपासून भटकतच राहिलो आहोत. घरात पत्नीला दटावतो पण त्याला काय वाटते की हे तर कोणी ऐकलेच नाही ना! हे तर आपसातलेच आहे! लहान मुले असतील तेव्हा त्यांच्या समोर पति-पत्नी वाटेल तसे बोलतात. त्यांना वाटते की ह्या लहान मुलाला काय समजणार आहे ? अरे, पण आत टेप होत आहे, त्याचे काय? मग जेव्हा तो मोठा होईल तेव्हा सर्व बाहेर पडेल! सामान्य व्यवहाराचे बोलण्यास हरकत नाही. पण देहधारींसाठी जर काही उलट-सुलट बोलले गेले तर आत ते टेप होऊन जाते. या जगातील लोकांची टेप उतरवायची असेल तर कितीसा वेळ लागेल? फक्त थोडेसे डिवचले तर समोर प्रतिपक्षी भाव टेप होतच राहतील. तुझ्यात इतकी निर्बलता आहे की डिवचण्या आधीच तू बोलायला लागशील. प्रश्नकर्ता : वाईट बोलायचे तर नाही, पण मनात वाईट भाव सुद्धा येऊ नये ना? दादाश्री : वाईट भाव येऊ नये, ही गोष्ट खरी आहे. पण जे भावात असेल, ते बोलण्यात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून बोलणेच जर बंद झाले ना, तर भाव सुद्धा बंद होतील. भाव हा तर बोलण्या मागचा प्रतिध्वनी आहे. प्रतिपक्षी भाव तर उत्पन्न झाल्याशिवाय राहणारच नाहीत ना! आम्हाला प्रतिपक्षी भाव होतच नाहीत आणि त्या स्थितीपर्यंत तुम्हालाही पोहोचायचे आहे. आपली कमजोरी इतक्या प्रमाणात तर जायलाच हवी की प्रतिपक्षी भाव उत्पन्नच होणार नाहीत. आणि जर कदाचित तसे झाले तर आपल्याजवळ प्रतिक्रमणाचे हत्यार आहे, त्याच्याने पुसून टाकायचे. पाणी Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... १९ कारखान्यात गेले असेल, परंतु जोपर्यंत बर्फ तयार झालेला नाही तोपर्यंत हरकत नाही. बर्फ झाल्यानंतर मात्र हातात काही उरत नाही. प्रश्नकर्ता : वाणी बोलतेवेळी असलेले भाव आणि जागृतीनुसार टेपिंग होत असते का? दादाश्री : नाही. हे टेपिंग वाणी बोलते वेळी होत नाही. मुळात तर हे आधीच टेप झालेले आहे. आणि मग आज काय होते? तर छापल्या प्रमाणेच वाजते. प्रश्नकर्ता : पण आज जेव्हा बोलतो, त्यावेळी जागृती ठेवली तर? दादाश्री : समजा आता तुम्ही एखाद्याला धमकावले, त्यानंतर मनात जर असे वाटले की 'याला धमकावले, ते बरोबरच आहे.' म्हणून पुन्हा तशाच हिशोबाचा कोडवर्ड तयार झाला आणि 'याला धमकावले, ते चुकीचे घडले. असा भाव झाला, तर तुमचा कोडवर्ड नवीन प्रकारचा तयार झाला. 'धमकावले, हेच बरोबर आहे' असे मानले की पुन्हा तसाच कोड तयार झाला आणि त्यामुळे ते जास्त वजनदार होईल आणि 'हे खूप चुकीचे घडले, मी असे बोलायला नको. असे का होते?' असे वाटले तर कोड छोटा झाला. प्रश्नकर्ता : तीर्थंकरांच्या वाणीचे कोड कसे असतात? दादाश्री : त्यांनी कोड असा ठरवलेला असतो की माझ्या वाणीने कोणत्याही जीवाला किंचित्मात्र पण दु:ख होऊ नये. दुःख तर होऊच नये, पण कोणत्याही जीवाचे किंचित्मात्र प्रमाणही दुखावले जाऊ नये. झाडाचेही प्रमाण दुखावले जाऊ नये. असा कोड फक्त तीर्थंकरांचाच बनलेला असतो. प्रश्नकर्ता : ज्याला टेपच करायचे नसेल, त्याच्यासाठी कोणता उपाय आहे? दादाश्री : कोणतेही स्पंदन उभे करू नये. सर्व पाहतच राहायचे. पण हे शक्य नाही ना! हे सुद्धा मशीन आहे आणि पुन्हा पराधीन आहे. Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... म्हणून आम्ही दुसरा मार्ग दाखवतो की टेप झाले की लगेच पुसून टाकायचे, तरीही चालेल. प्रतिक्रमण हे पुसायचे साधन आहे. यामुळे एखाद्या जन्मात फेरबदल होऊन बोलायचे सर्व बंद होऊन जाईल. हा 'सच्चिदानंद' शब्द बोलल्याने खूप इफेक्ट(प्रभाव) होतो. समजल्याशिवाय बोलले तरीही इफेक्ट होतो. जर समजून बोलले तर खूपच फायदा होतो. हे शब्द बोलल्याने स्पंदने उभी होतात आणि आत मंथन होते. हे सर्व सायन्टिफिक आहे. प्रश्नकर्ता : 'काम करायचे नाही' असे बोलले, तर यात काय घडते? दादाश्री : मग आळस येतो. आपोआपच आळस येतो आणि 'करायचे आहे' असे म्हटल्यावर सर्व आळस कुठल्या कुठे पळून जातो. मी 'ज्ञान' होण्या आधीची गोष्ट सांगतो. मी पंचवीस वर्षाचा होतो, तेव्हा जर माझी तब्येत चांगली नसली आणि कुणी विचारले की, 'कशी आहे तुमची तब्येत?' त्यावर मी म्हणायचो की, 'खूप चांगली आहे.' आणि दुसऱ्या कोणाची तब्येत जरी चांगली असली आणि आपण त्याला विचारले की, 'कशी आहे तुमची तब्येत?' तेव्हा म्हणतो, 'ठीक आहे.' अरे बाबा, 'ठीक आहे' असे म्हणतो, म्हणून पुढे जाणार नाही. म्हणून मग मी 'ठीक' शब्दच उडवून टाकला. हा शब्द नुकसान करतो. आत्मा 'ठीक' होऊन जातो मग. त्याऐवजी 'खूप चांगले' म्हटल्यावर आत्मा 'चांगला' होऊन जातो. बाकी, लोकांना वाटते की दादा खोलीत जाऊन निवांत झोपतात. पण ह्या गोष्टीत काही तथ्य नाही. पद्मासन घालून एक तासापर्यंत बसतात आणि ते सुद्धा सत्त्याहत्तराव्या वर्षी पद्मासन घालून बसणे. पाय सुद्धा सहजच वळतात आणि त्यामुळे डोळ्यांची शक्ति, डोळ्यांचा प्रकाश, हे सर्व आज पण सुरक्षित राहिले आहे. कारण मी कधीही प्रकृतिची निंदा केली नाही. तिची तक्रार कधीही केली नाही. अपमान केला नाही. लोक तक्रार करून अपमान Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... करतात. प्रकृती जिवंत आहे, तिचा अपमान कराल तर त्याचा परिणाम होईल. २१ 4. दुःखदायी वाणीच्यावेळी, समाधान! प्रश्नकर्ता : कोणी काही सुनावून गेला तर तेव्हा आपण समाधान कसे ठेवावे ? समभाव कशा प्रकारे ठेवावा ? दादाश्री : आपले ज्ञान काय सांगते ? तुमच्यात कोणीही हस्तक्षेप करू शकेल असे नाहीच. जगात असा कोणी जन्मलाच नाही की जो तुमच्यात दखल करू शकेल. कोणी कोणामध्ये दखल करू शकेल असे नाहीच. तरीपण ही दखल का येते ? तुमच्यात जो दखल करतो, तो तुमच्यासाठी निमित्त आहे. पण यात मूळ हिशोब तुमचाच आहे. कोणी उलट करेल की सुलट करेल, पण यात हिशोब तुमचाच आहे आणि तो मात्र निमित्त बनत असतो. तो हिशोब पूर्ण झाला की मग पुन्हा कोणी दखल करणार नाही. म्हणून निमित्तासोबत भांडण करणे हे व्यर्थच आहे. निमित्ताचा चावा घेतल्याने पुन्हा नवीन गुन्हा उभा होईल. म्हणजे यात करण्यासारखे काही उरत नाही. हे विज्ञान आहे, हे सर्व समजून घेण्याची गरज आहे. प्रश्नकर्ता : कोणी आपल्याला काही ऐकवून जातो, हे पण नैमित्तिकच आहे ना ? आपली चूक नसली तरीही बोलला तर ? दादाश्री : जर तुमचा दोष नसेल तर या जगात कोणालाही असे बोलण्याचा अधिकार नाही. तो बोलत आहे, तर तुमची जी चूक आहे, त्याचा हा मोबदला देत आहे. हो, तुमची मागील जन्माची जी चूक आहे, त्या चुकीचा मोबदला तो माणूस तुम्हाला देत आहे. तो निमित्त आहे आणि चूक तुमची आहे. म्हणूनच तो बोलत आहे. आपली चूक आहे, म्हणूनच तो बोलतो. तो तर आपल्याला त्या चुकीतून मुक्त करत आहे. तेव्हा त्याच्यासाठी भाव बिघडवू नये. आणि आपण काय म्हणायला पाहिजे की, हे प्रभु, त्याला सद्बुद्धी द्या. इतकेच म्हणावे, कारण तो निमित्त आहे. Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... आम्ही काय सांगू इच्छितो, की जे सर्व येते, तो तुमचा हिशोब आहे. तो चुकता होऊ द्या, आणि पुन्हा नव्याने रक्कम उधार देऊ नका. प्रश्नकर्ता : नवीन रक्कम उधार देणे कशास म्हणतात ? २२ दादाश्री : कोणी तुमच्याशी वाईट बोलले तर तुम्हाला मनात असे वाटते की ‘हा मला वाईट का बोलतो ?' म्हणजेच तुम्ही त्याला नवीन रक्कम उधार दिली. तुमचा जो हिशोब होता, तो फेडताना तुम्ही पुन्हा नवीन हिशोबाचे वहीखाते चालू केले. अर्थात् एक शिवी जी तुम्ही उधार दिली होती, ती तो परत करायला आला, तेव्हा ती जमा करून घ्यायची होती, त्याऐवजी तुम्ही नवीन पाच शिव्या उधार दिल्या. ही एक शिवी तर सहन होत नाही, आणि दुसऱ्या पाच उधार दिल्या, म्हणजे तिथे परत नवीन उधारी करतो आणि मग गोंधळत राहतो. अशाप्रकारे नवीन गुंता निर्माण करतो. आता यात मनुष्याची बुद्धी कशी काय पोहोचेल ? तुला जर हा व्यापार परवडत नसेल तर पुन्हा देऊ नकोस, नवीन उधारी करू नकोस, आणि हे जर परवडत असेल तर पुन्हा पाच दे. प्रश्नकर्ता : एकदा जमा केले, दुसऱ्यांदा जमा केले, शंभर वेळा जमा केले, असे प्रत्येकवेळी जमाच करत राहायचे ? दादाश्री : हो, पुन्हा उधार कराल तर पुन्हा वहीखाते चालूच राहील. त्यापेक्षा लाख वेळा तू जमा कर ना, आपण जमा करायचे. आणि त्याचा अंत येईलच. बघाच तुम्ही ! मी सांगितल्याप्रमाणे करा ना ! प्रश्नकर्ता : एवढी वर्षे गेली तरी अजून काही अंत आला नाही. दादाश्री : दुसरा विचार करण्यापेक्षा मी सांगितल्याप्रमाणे करा ना, अंत येईल. आणि मी असे बरेच काही जमा केले आहे, अठ्ठावीस वर्षांपासून आम्ही नवीन उधार देत नाही. म्हणून तर वह्या किती चोख झाल्या! आपल्या शेजाऱ्याला सांगा की, 'सकाळच्या प्रहरी तू मला पाच शिव्या देत जा.' तेव्हा तो काय म्हणेल, 'मी काही रिकामा बसलो आहे ?' Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... म्हणजे हिशोब नाही, तर कोणी शिव्या देणारच नाही ना! आणि हिशोब आहे, तर कोणी सोडणारही नाही. ____ आता आपला इतका पुरुषार्थ शेष उरला आहे की 'हसत मुखाने विष पिऊन टाका.' एखाद्या दिवशी मुलासोबत काही मतभेद झाला, मुलगा विरोध करत असेल, तर मग तो जो 'पेला' देईल, तो प्यावा तर लागेलच ना! रडून रडून सुद्धा प्यावा तर लागेलच ना? तो 'पेला' काय त्याच्या डोक्यावर थोडाच मारु शकतो? प्यावा तर लागेलच ना? प्रश्नकर्ता : बरोबर, प्यावाच लागतो. दादाश्री : जग रडून रडून पीते. आपण हसून प्यावे! बस, एवढेच सांगितले आहे. समोरचा काय बोलला, कठोर बोलला, त्याचे आपण ज्ञाता-दृष्टा. आपण काय बोललो, त्याचेही 'आपण' ज्ञाता-दृष्टा. एखाद्याने तुम्हाला शिवी दिली तर ते काय आहे? त्याने तुमच्यासोबत असलेला व्यवहार पूर्ण केला. समोरचा जे काही करतो, नमस्कार करत असेल, किंवा शिव्या देत असेल, तर ते सर्व तुमचाच, तुमच्यासोबत असलेला व्यवहार तो ओपन(उघडा) करत आहे. अशावेळी व्यवहाराला व्यवहाराने छेदावे. आणि व्यवहार एक्सेप्ट(मान्य) करावा. तेथे तू न्याय शोधू नकोस. न्याय शोधशील तर गुंता वाढवशील. प्रश्नकर्ता : आणि जर आपण कधी शिवी दिलीच नसेल तर? दादाश्री : जर शिवी दिली नसेल तर समोरुन शिवी मिळणार नाही. पण हा तर मागचा पुढचा हिशोब आहे, म्हणून दिल्याशिवाय राहणारच नाही. वहीत जमा असेल तरच समोर यईल. कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला, तो हिशोबाशिवाय होत नाही. परिणाम, हे पेरलेल्या बीजाचे फळ आहे. इफेक्ट (परिणाम)चा हिशोब, तो व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? तर नऊ असेल त्यास नऊने भागावे. नऊला जर बाराने भागले तर व्यवहार कसा चालेल? Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ २४ वाणी, व्यवहारात... न्याय काय म्हणतो? नऊला बाराने भागा, त्यामुळे पुन्हा गोंधळून जातो. न्याय तर काय सांगतो, तो असे-असे बोलला, तर तुम्हालाही असे बोलले पाहिजे. तुम्ही एक वेळा बोलले तर तो दोन वेळा बोलेल. तुम्ही दोन वेळा बोलाल तर समोरचा दहा वेळा बोलेल. ज्या प्रकारच्या व्यवहाराने गुंडाळलेले आहे, त्या प्रकारच्या व्यवहाराने उलगडत जाते. तुम्ही जर मला विचारले की तुम्ही मला रागवत का नाही? तर मी म्हणेन की, तुम्ही तसा व्यवहार आणलेला नाही. जितका व्यवहार तुम्ही आणला होता, तितक्या वेळा तुम्हाला टोकले. त्यापेक्षा जास्त व्यवहार आणला नव्हता. आम्हा ज्ञानी पुरुषांची कठोर वाणीच नसते आणि समोरच्यासाठी कठोर वाणी निघते ते आम्हाला आवडत नाही. आणि तरीही निघाली, म्हणून आम्ही लगेच समजून जातो की, याच्यासोबत आम्ही असाच व्यवहार आणलेला आहे. वाणी ही समोरच्या व्यक्तिच्या व्यवहाराप्रमाणे निघत असते. वीतराग पुरुषांची वाणी निमित्ताच्या आधीन निघत असते. कोणी म्हणेल, ‘ह्या भाऊशी दादा कडक शब्दात का बोलतात?' पण यात दादा तरी काय करतील? त्याने तसाच व्यवहार आणलेला आहे. कित्येक माणसे तर अगदी नालायक असतात तरी सुद्धा दादा आवाज वाढवून बोलले नाहीत, त्यावरूनच हे नाही का कळत की त्याने स्वत:चा व्यवहार किती सुंदर आणला आहे! ज्याने कठोर व्यवहार आणला असेल त्याच्यासाठी आमच्याकडून कठोर वाणी निघते. आता आपल्याकडून जी उलट-सुलट वाणी निघते, ती समोरच्याच्या व्यवहाराला आधीन राहून निघते, परंतु आपल्याला तर मोक्षाला जायचे आहे, म्हणून त्याचे प्रतिक्रमण करून घ्यावे. प्रश्नकर्ता : पण बाण सुटला, त्याचे काय? दादाश्री : ते व्यवहाराधीन आहे. प्रश्नकर्ता : अशी परंपरा राहिली तर वैर वाढेल ना? दादाश्री : नाही, म्हणून तर आपण प्रतिक्रमण करीत असतो. Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रतिक्रमण फक्त मोक्षाला जाण्यासाठीच नाही, पण हे तर वैर थांबवण्यासाठी भगवंताला लावलेला फोन आहे. प्रतिक्रमण करण्यात कमी पडलो तर वैर बांधले जाईल. चूक समजल्यावर ताबडतोब प्रतिक्रमण करून घ्यावे. त्यामुळे वैर बांधले जाणार नाही. समोरच्याला वैर बांधायचे असेल तरीही बांधले जाणार नाही. कारण आपण सरळ समोरच्याच्या आत्म्यालाच फोन लावतो. व्यवहार निरुपाय आहे. जर आपल्याला मोक्षालाच जायचे असेल तर प्रतिक्रमण करा. ज्याला स्वरुपज्ञान नसेल, आणि त्याला व्यवहाराला व्यवहार स्वरुपातच ठेवायचे असेल, तर समोरचा वाईट बोलला तेच करेक्ट आहे असेच मान्य करा. पण जर मोक्षाला जायचे असेल तर त्याचे प्रतिक्रमण करा, नाहीतर वैर बांधले जाईल. वाटेत जाताना कोणी तुम्हाला म्हटले की 'तुम्ही नालायक आहात, चोर आहात, बदमाश आहात' अशी-तशी शिवी दिली आणि जर त्यावेळेस तुम्हाला वीतरागता राहिली तर समजावे की या बाबतीत तुम्ही भगवंत झालात. जितक्या बाबतीत तुम्ही जिंकलात तितक्या बाबतीत तुम्ही भगवंत झालात. आणि तुम्ही जगासोबत जिंकलात म्हणजे पूर्ण भगवंत होऊन गेलात, नंतर कोणासोबतही मतभेद पडणार नाहीत. संघर्ष झाला म्हणजे आपण समजावे की 'असे काय मी बोलून गेलो की हा संघर्ष झाला!' म्हणजे झाले समाधान, मग कोडे सुटले. अन्यथा जोपर्यंत आपण 'समोरच्याची चूक आहे' असे शोधायला गेलो तोपर्यंत हे कोडे सुटणारच नाही. 'आपली चूक आहे' असे मानू तेव्हाच या जगापासून सुटका होईल. दुसरा कोणताही उपाय नाही. दुसरे सर्व उपाय गुंतवणारे आहेत. आणि उपाय करणे हा आपल्या आत दडलेला अहंकार आहे. उपाय कशासाठी शोधता? समोरचा आपली चूक काढत असेल तर आपण असे सांगावे की 'मी तर आधीपासूनच वाकडा आहे.' प्रश्नकर्ता : 'आप्तवाणीत' असे लिहिले आहे की 'दादा चोर आहेत' असे जर कोणी म्हटले तर त्याचे महान उपकार मानावेत. दादाश्री : त्याचे उपकार कशाबद्दल मानले पाहिजेत? कारण असे Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... कोणी म्हणणार नाही. हा प्रतिध्वनी आहे कशाचा तरी. हा माझा स्वत:चाच प्रतिध्वनी आहे. म्हणून उपकार मानतो. हे जग प्रतिध्वनी स्वरुप आहे. काहीही समोर आले तरी ते तुमचेच परिणाम आहेत, याची शंभर टक्के गॅरन्टी लिहून देतो. म्हणून आम्ही उपकारच मानतो. तेव्हा तुम्ही सुद्धा उपकार मानले पाहिजे ना? आणि तरच तुमचे मन खूप चांगले राहील. हो, उपकार नाही मानलेत तर त्यात तुमचा पूर्ण अहंकार वर येऊन द्वेष उत्पन्न होईल. त्यात समोरच्याचे काय नुकसान होणार आहे ? तुम्ही तुमचे दिवाळे काढले. 5. वाणी, आहेच टेपरेकॉर्ड वाणीचीच तर सर्व झंझट आहे. वाणीमुळेच तर ही सर्व भ्रांती जात नाही. म्हणेल ‘हा मला शिव्या देतो.' म्हणून तर वैर संपतच नाही ना! प्रश्नकर्ता : इतकी सर्व भांडणे होतात, शिव्या देतात तरीही लोक मोहामुळे सर्व विसरुन जातात आणि मला तर कोणी दहा वर्षांपूर्वी काही बोलले असेल तरीही लक्षात राहते आणि मग मी त्याच्यासोबत नातंच तोडून टाकतो. दादाश्री : पण मी काही नातं तोडूत टाकत नाही. मी जाणतो की याची नोंद(अत्यंत राग किंवा द्वेषासहित दिर्घकाळापर्यंत आठवणीत ठेवणे. नोंदून ठेवणे) ठेवण्यासारखी नाही. जणू रेडिओ वाजत आहे असेच मला वाटत असते. उलट मनात हसू येते. म्हणून मी उघडपणे संपूर्ण जगाला सांगितले की, ही ओरिजिनल टेपरेकॉर्ड बोलत आहे. हे सर्व रेडिओ आहेत. मला जर कोणी सिद्ध करून दाखवले की 'ही टेपरेकॉर्ड नाही' तर हे सर्व ज्ञानच खोटे आहे. करूणा कशाला म्हणतात? समोरच्याच्या मूर्खपणावर प्रेम राखणे त्यास, आणि मूर्खपणावर वैर ठेवणे, ते तर संपूर्ण जग ठेवतच असते. प्रश्नकर्ता : पण तो जेव्हा बोलत असतो, तेव्हा तर असे वाटत नाही की, तो मूर्खपणा करत आहे. Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... दादाश्री : त्या बिचाऱ्याच्या हातात सत्ताच नाही. टेपरेकॉर्ड वाजत राहते. लगेच आमच्या लक्षात येते की ही टेपरेकॉर्ड वाजत आहे. जोखिमदारी समजली असती तर तो बोललाच नसता ना! आणि टेपरेकॉर्ड पण वाजणार नाही. __कोणी आपल्याला असे शब्द म्हटले की 'तुम्ही गाढव आहात, मूर्ख आहात' तर ते आपल्याला विचलीत करता कामा नये. 'तुम्हाला अक्कल नाही' असे जर कोणी मला म्हटले तर मी म्हणेन की, 'ही गोष्ट तुला कळली, ते चांगलेच झाले. मला तर हे पूर्वीपासूनच माहित आहे. तुला तर आज समजले.' आणि मग मी म्हणतो, चल 'आता दुसरी गोष्ट कर, त्यामुळे मग समाधान होईल की नाही? ह्या अकलेला जर तोलायला बसलो तर तराजू कोठून आणायचा? वजने कोठून आणायची? वकील कोठून आणायचा? त्याऐवजी आम्ही सरळ सांगतो की, 'भाऊ, हो अक्कल नाही, हे तुला तर आज समजले पण आम्ही तर आधीपासूनच हे जाणतो. चल, आता पुढचे बोलूया.' तर याचे निराकरण होईल. समोरच्याची गोष्ट मनात धरुन ठेवण्यासारखी नाही आणि हे सर्व शब्द तर टेपरेकॉर्ड बोलत असते. आणि कारण शोधल्यामुळे काय झाले? हे कारण शोधल्यामुळेच जग उभे राहिले आहे. कशातच कारण शोधू नका. हे तर 'व्यवस्थित' आहे. 'व्यवस्थित शक्ति'च्या बाहेर कोणी काही बोलणार नाही. विनाकारण त्याच्यासाठी तुम्ही जे मनात धरुन बसता, ती तुमची चूक आहे. संपूर्ण जग निर्दोष आहे. निर्दोष पाहून मी तुम्हाला सांगत आहे की निर्दोष आहे. कशामुळे निर्दोष आहे जग? शुद्धात्मा निर्दोष आहे की नाही? तेव्हा दोषित कोण वाटतो? हा पुद्गल. आता पुद्गल उदय कर्माच्या आधीन आहे, आयुष्यभरासाठी. म्हणून उदयकर्मात जसे असेल तसे तो बोलतो, यात तुम्ही काय कराल?! पाहा तरी, दादाजींनी किती सुंदर विज्ञान दिले आहे की कधी भांडणच होणार नाही. Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ २८ वाणी, व्यवहारात... वाणी जड आहे, रेकॉर्डच आहे. ही टेपरेकॉर्ड वाजते, त्यापूर्वी टेपमध्ये पट्टी भरते की नाही? त्याचप्रमाणे ह्या वाणीची सुद्धा पूर्ण पट्टी भरलेली आहे. आणि त्याला संयोग मिळताच, जशी पीन लागते आणि रेकॉर्ड सुरु होते, तशी वाणी सुरु होते. पुष्कळदा असेही नाही का होत, की तुम्ही दृढ निश्चय केलेला असतो की सासू समोर किंवा नवऱ्या समोर बोलायचे नाही, तरी सुद्धा बोलले जाते की नाही? बोलले जाते. हे काय आहे ? आपली तर इच्छा नव्हती. तेव्हा काय नवऱ्याची इच्छा होती की बायकोने मला शिव्या द्याव्या? मग कोण बोलवतो? तर ही रेकॉर्ड बोलते आणि टेप झालेल्या रेकॉर्डला कोणी बापही बदलू शकत नाही. __ पुष्कळदा कोणी मनात ठाम ठरवून आला असेल की आज तर त्याला असे ऐकवणार आणि तसे सुनवणार. आणि जेव्हा त्याच्याजवळ जातो आणि तिथे दुसऱ्या दोन-पाच जणांना पाहतो, तेव्हा एक अक्षरही न बोलता परत येतो की नाही? अरे, बोलायला जातो पण शब्दच फुटत नाहीत. असे घडते की नाही? वाणी जर तुझ्या सत्तेत असती, तर तू ठरवल्याप्रमाणे वाणी निघेल. पण असे घडते का? कसे घडणार? __ हे विज्ञान असे सुंदर आहे की कोणत्याच प्रकारे बाधक नाही आणि झटपट समाधान आणेल असे आहे. पण जर या विज्ञानाला लक्षात ठेवले की दादाजींनी सांगितले आहे की वाणी म्हणजे फक्त रेकॉर्डच आहे, मग कोणी वाटेल ते बोलत असेल किंवा फौजदार धमकावत असेल तरी पण त्याची वाणी ही रेकॉर्डच आहे, असे फीट होऊन जायला पाहिजे, मग फौजदार धमकावत असेल तरी त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही. कोणताही माणूस खूप बडबड करत असेल तरी आपण समजून जावे की ही रेकॉर्ड बोलली. रेकॉर्डला रेकॉर्ड जाणले तर आपण गडबडून जाणार नाही. नाहीतर तन्मयाकार झालो तर काय होईल? आपल्या ज्ञानात ही 'वाणी रेकॉर्ड आहे', ही एक चावी आहे आणि त्यात काही आपण थापा मारत नाही. ही आहेच रेकॉर्ड. आणि रेकॉर्ड मानून आजपासून आरंभ केला तर? मग आहे का काही दुःख? आपल्या Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... उच्च जातीत लोक काठ्या घेऊन मारामारी करीत नाहीत. तिथे तर सर्व वाणीचेच धमाके! पण आता याला जिंकल्यावर काही उरते का? म्हणून मी असा खुलासा केला की वाणी ही रेकॉर्ड आहे, असे बाहेर खुलासा करण्याचे कारण काय? तर तुमच्या मनातून वाणीची किंमत निघून जाईल. आम्हाला तर कोणी वाटेल ते बोलले ना, तरी त्याची जरा सुद्धा किंमत नाही. मी जाणतो की हा बिचारा कसे काय बोलणार आहे? तो स्वतःच भोवरा आहे ना! आणि ही तर रेकॉर्ड बोलत आहे. तो तर भोवरा आहे, त्याच्यावर दया करण्यासारखी आहे! प्रश्नकर्ता : ‘हा भोवरा आहे' हे त्यावेळी लक्षात राहत नाही. दादाश्री : नाही, सर्व प्रथम तर 'वाणी रेकॉर्ड आहे' असे ठरवा. नंतर 'हा बोलत आहे ते 'व्यवस्थित' आहे. ही फाईल आहे, तिचा समभावे निकाल करायचा आहे.' हे सर्व ज्ञान अगदी त्याचवेळी हजर राहिले ना, तर आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. जे काही बोलत आहे ते 'व्यवस्थित'च आहे ना? आणि रेकॉर्डच बोलत आहे ना? तो स्वतः तर बोलत नाही ना आज? म्हणूनच कोणताही मनुष्य मुळीच जबाबदार नाही आणि भगवंतांना असे दिसले आहे की, कोणताही जीव कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीच. कोणी गुन्हेगारही नाही, हे भगवंतांनी पाहिले होते. या दृष्टीमुळे भगवंत मोक्षाला गेले. आणि लोकांनी गुन्हेगार आहे असे बघितले, त्यामुळे जगात भटकत राहतात. बस एवढाच दृष्टीचा फरक आहे! प्रश्नकर्ता : हो, पण ही जी दृष्टी आहे ती आतमध्ये फीट होऊन जावी, यासाठी काय पुरुषार्थ करावा? दादाश्री : पुरुषार्थ काहीच करायचा नाही. यात तर 'दादाजी'ची ही गोष्ट' एकदम खरी आहे. आणि यावर जसजसा उल्हास येत जातो तसतसे फीट होत जाते आत. म्हणून आता असे ठरवून टाका की दादाजींनी जसे सांगितले आहे तसेच आहे, ही वाणी टेपरेकॉर्डच आहे. आता याचा अनुभव घ्या. तो धमकावत असेल त्यावेळी आपल्याला मनात हसायला येईल, असे काहीतरी करा. कारण की खरेतर वाणी टेपरेकॉर्डच आहे आणि हे आता Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ ३० वाणी, व्यवहारात... तुम्हाला समजलेले आहे. बोलायचे नसेल तरीही बोलले जाते, म्हणून 'ही टेपरेकॉर्डच आहे' हे ज्ञान फीट करून घ्या. __ प्रश्नकर्ता : समजा की, समोरच्याची रेकॉर्ड वाजत असेल त्यावेळी आपण म्हटले की ही रेकॉर्ड वाजत आहे. पण तरीही आत 'हा सांगतो ते खोटे आहे, हे बरोबर नाही, असे का बोलतो?' अशी रिअॅक्शन होत असते. दादाश्री : नाही, पण असे का व्हायला पाहिजे? जर ही रेकॉर्डच वाजत आहे, तुम्ही जर हे जाणून घेतलेले आहे की ही रेकॉर्डच बोलत आहे, तेव्हा मग त्याचा परिणामच होणार नाही ना?! प्रश्नकर्ता : पण स्वतः निश्चितपणे मानतो, शंभर टक्के मानतो की ही रेकॉर्डच आहे, तरीसुद्धा रिअॅक्शन का येते? दादाश्री : असे आहे की ही रेकॉर्डच आहे, रेकॉर्ड आहे असे तुम्ही नक्की सुद्धा केले आहे, पण 'रेकॉर्डच आहे', असे एक्जेक्ट ज्ञान त्यावेळी हजर राहिले पाहिजे. पण तरी ते एकदम रेकॉर्डच आहे असे राहू शकत नाही. कारण आपला अहंकार त्यावेळी उड्या मारतो. म्हणून मग 'त्याला' 'आपण' समजवयाचे की 'भाऊ, ही रेकॉर्ड वाजत आहे, तू कशाला आरडाओरड करतो?' असे आपण म्हटले की मग आत सर्व शांत होते. मी पंचवीस वर्षाचा होतो, तेव्हाची ही गोष्ट आहे. माझ्या घरी एक जण आला होता. त्यावेळी मला रेकॉर्ड विषयी माहित नव्हते. तो मला खूपच वाईट शब्द बोलून गेला. तसा तर तो नातेवाईक होता. नातेवाईकासोबत भांडण करून कसे चालेल? म्हणून मी त्याला सांगितले, 'बसा तुम्ही, बसा ना आता, ती चूक तर झाली असेल. कधीतरी चूक होते ना आपली.' नंतर चहा पाजून त्यांना शांत केले. मग तो मला म्हणाला 'मी निघतो आता.' तेव्हा मी म्हटले, 'तुमचे ते गाठोडे सोबत घेऊन जा. हा जो तुम्ही मला प्रसाद दिला होता, तो मी चाखला नाही. कारण की तो तोललेला नव्हता, त्यामुळे ते माझ्याकडून घेतले जाणार नाही. मला तर तोललेला माल असेल तरच कामाचा. बिनतोललेला माल Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, मी घेत नाही. म्हणून तुमचा माल तुम्ही घेऊन जा. तेव्हा मग ते शांत झाले. व्यवहारात... ३१ शब्द तर शांतीही देतात आणि पेटवूनही टाकतात. म्हणजे इफेक्टिव आहेत. आणि सर्व इफेक्टिव वस्तू निश्चेतन असतात. चेतन इफेक्टिव नसते. विनाशी वस्तू असेल, ती इफेक्टिव असते. आपले 'ज्ञान' मिळाल्यानंतर जरी वाटेल तशी वाणी निघत असली तरी ती इफेक्टिव नसते. तरीही अजून इफेक्ट होत आहे, त्याचे कारण काय ? पूर्वीची अवस्था विसरलेलो नाही. बाकी इफेक्ट होत आहे, त्यास तुम्ही जाणले की समोरच्याची वाणी आहे ती रेकॉर्डस्वरुप आहे आणि तो 'चंदुभाऊला ' बोलतो, 'तुम्हाला' बोलत नाही. म्हणून कुठल्याही प्रकारे तुमच्यावर परिणाम करणार नाही. त्याने असे काही बोलायला नको, हे त्याच्या आवाक्यात नाही. त्याच्या वाटेल त्या शब्दांमुळे आपला संघर्ष होता कामा नये. हा धर्म आहे. हो, शब्द तर वाटेल तसे असू शकतात. यात शब्दांची अशी काही अट आहे का, की तो बोलला तर 'संघर्ष व्हायलाच पाहिजे ?' आणि आपल्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल असे बोलणे, हा तर सर्वात मोठा गुन्हा आहे. उलट असे कोणी बोलले असेल तर ते दाबून टाकले पाहिजे, त्याला माणूस म्हणतात ! वाणी बोलण्यास हरकत नाही. ते तर कोडवर्ड आहेत. ते फुटतात आणि बोलत राहतो, आपण त्याचे रक्षण करू नये. वाणी बोलण्यास हरकत नाही, पण 'आम्ही खरे आहोत' असे त्याचे रक्षण करू नये. स्वतःच्या वाणीचे रक्षण करणे हीच सर्वात मोठी हिंसा आहे. मी सांगतो तेच खरे हे समोरच्याला ठसवणे हीच हिंसा आहे. 'आम्ही खरे आहोत,' यालाच रक्षण करणे असे म्हणतात आणि जर हे रक्षण नसले तर काहीच नाही. गोळे सर्व फुटून जातील आणि कोणालाही जास्त इजा होणार नाही. अहंकाराचे रक्षण करतात, त्यामुळे खूप इजा होते. Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : आंतरिक स्थितीत, म्हणजे अंतर विज्ञानात हे बोलणे कशा प्रकारे बनते आणि बोलण्याचे बंद कशा प्रकारे होते? दादाश्री : सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे हे सर्व. समोरच्याला जेवढे द्यायचे असेल तेवढे आपल्याकडून निघते. आणि जिथे द्यायचे नसेल, तिथे आपले बंद होऊन जाते. मुंबईमध्ये मी एका व्यक्तिला सांगितले होते. तो म्हणतो, 'दादाजींना बदनाम करून टाकीन,' असे म्हणत होता. तो आला तेव्हा मी त्याला म्हणालो, 'बोला ना काही.' पुन्हा मी म्हणालो, 'बोला ना काही.' तेव्हा त्याने स्पष्ट सांगितले 'घश्यापर्यंत येत आहे पण बोलले जात नाही.' घ्या बोला आता?! हे आले बोलणारे !! इथपर्यंत येते पण बोलले जात नाही, असे मला स्पष्ट सांगितले, म्हणून मग मी समजून गेलो. एक अक्षर सुद्धा बोलू शकत नाही, माझा हिशोब पूर्ण झाला आहे. मग तुझी काय बिशाद ? 6. वाणीचे संयोग, पर-पराधीन प्रश्नकर्ता : आपण असे सांगता की, 'स्थूल संयोग सूक्ष्म संयोग, वाणीचे संयोग पर आहेत आणि पराधीन आहेत.' तर हे समजवा. दादाश्री : स्थूल संयोग म्हणजे तुम्हाला चालता-फिरता हवा मिळते, अमके मिळते, मामा भेटतात, काका भेटतात, साप भेटतो, हे सर्व स्थूल संयोग आहेत. कोणी मोठ-मोठ्या शिव्या देणारेही भेटतात. म्हणजे हे जे बाहेरचे संयोग जुळून येतात, ते सर्व स्थूल संयोग आहेत. सूक्ष्म संयोग म्हणजे मनात विचार येतात, विचार वाकडे येतात, उलट-सुलट येतात, वाईट येतात, चांगले येतात किंवा असेही विचार येतात की 'आता एक्सिडेन्ट झाला तर काय होईल?' हे सर्व सूक्ष्म संयोग. आत मनात सर्व येतच राहतात. आणि वाणीचे संयोग म्हणजे आपण बोलत राहतो किंवा कोणी बोलले आणि आपण ऐकतो, हे सर्व वाणीचे संयोग! 'स्थूल संयोग, सूक्ष्म संयोग आणि वाणीचे संयोग पर आहेत आणि पराधीन आहेत.' एवढेच वाक्य स्वत:च्या लक्षात येत असेल, स्वत:च्या Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... जागृतीत राहत असेल तर समोरचा माणूस वाटेल तसे बोलला तरीही आपल्यावर त्याचा जरासुद्धा परिणाम होणार नाही, आणि हे वाक्य कल्पित नाही. जे 'एक्जेक्ट' आहे, तेच सांगतो. मी तुम्हाला असे सांगत नाही की माझ्या शब्दाचा मान ठेवून चला. तंतोतंत असेच आहे. हकीकत न समजल्यामुळे तुम्ही मार खाता. __ प्रश्नकर्ता : समोरचा उलट-सुलट बोलतो तेव्हा आपल्याला ज्ञानामुळे समाधान राहते, पण मुख्य प्रश्न हा राहतो की जेव्हा आमच्याकडून कडवटपणा निघतो, त्यावेळी जर आम्ही या वाक्याचा आधार घेतला तर आम्हाला चुकीचे लाईसन्स मिळते का? दादाश्री : तेव्हा या वाक्याचा आधार घेऊच शकत नाही ना! त्यावेळी तर तुम्हाला प्रतिक्रमणाचा आधार दिलेला आहे. समोरच्याला दु:ख होईल असे बोलले गेले असेल तर प्रतिक्रमण करून घ्यावे. आणि जेव्हा समोरचा वाटेल तसे बोलेल, तेव्हा वाणी पर आहे आणि पराधीन आहे, याचा स्वीकार केला. म्हणून मग तुम्हाला समोरच्याकडून दुःख होणारच नाही ना? आता तुम्ही स्वतः उलट-सुलट बोललात आणि नंतर त्याचे प्रतिक्रमण केले, म्हणून मग तुम्हाला तुमच्या बोलण्याचे दुःख राहिले नाही. म्हणजे अशा प्रकारे सर्व निराकरण होते. प्रश्नकर्ता : बरेचदा बोलायचे नसते तरी बोलले जाते. नंतर पश्चाताप होतो. दादाश्री : वाणीने जे काही बोलले जाते त्याचे आपण 'ज्ञाता-दृष्टा.' परंतु त्यामुळे ज्याला दुःख झाले असेल, त्याचे प्रतिक्रमण 'आपल्याला' 'बोलणाऱ्या'कडून करवून घ्यावे लागते. आम्हाला कोणी शिवी दिली तरी आम्ही जाणतो की हा 'अंबालाल पटेल'ला शिव्या देत आहे. पदगलला शिव्या देत आहे, आत्म्याला तर जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही ना! म्हणून आम्ही स्वीकारत नाही, 'आम्हाला' स्पर्शत नाही. आम्ही वीतराग राहतो. आम्हाला त्याच्यावर राग-द्वेष होत नाही. Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४ वाणी, व्यवहारात... आम्हा 'ज्ञानी'चा प्रयोग कसा असतो की प्रत्येक क्रियेला 'आम्ही' 'पाहतो.' म्हणूनच मी या वाणीला रेकॉर्ड म्हणतो ना! ही रकॉर्ड बोलत आहे, आम्ही ती पाहात असतो की 'रेकॉर्ड कशी वाजत आहे आणि कशी नाही'! आणि जगातील लोक तन्मयाकार होतात. संपूर्ण निर्तन्मयाकार राहिले, त्यास केवळज्ञान म्हटले आहे. जगातील लोक पाहतात तसेच ज्ञानी पण पाहत असतात, परंतु जगातील लोकांचे पाहिलेले उपयोगी पडत नाही. कारण त्यांचा 'बेसमेन्ट'(पाया) अहंकार आहे. मी 'चंदुभाऊ' आहे, हा त्यांचा 'बेसमेन्ट' आहे आणि 'आपला' 'बेसमेन्ट' मी 'शुद्धात्मा आहे' हा आहे. म्हणून आपले पाहिलेले केवळज्ञानाच्या अंशात जाते. जितक्या अंशाने आपण पाहिले, जितक्या अंशाने आपण स्वत:ला वेगळे पाहिले, वाणीला वेगळे पाहिले, हा 'चंदुभाऊ' काय करत आहे ते पाहिले, तितक्या अंशाने केवळज्ञान उत्पन्न झाले. मला जर कोणी शिवी दिली तर ते माझ्या ज्ञानातच असते, 'ही रेकॉर्ड काय बोलते' तेही माझ्या ज्ञानातच असते. रेकॉर्ड चुकीचे बोलली असेल तरी ते माझ्या ज्ञानातच असते. आम्हाला संपूर्ण जागृती राहते. आणि संपूर्ण जागृती हे केवळज्ञान आहे. व्यवहारात लोकांना व्यवहारिक जागृती राहते, ती अहंकारामुळे राहते. पण ही तर शुद्धात्मा झाल्यानंतरची जागृती आहे. ही आंशिक केवळज्ञानाची जागृती आहे आणि तेव्हापासूनच कल्याणकारी आहे. ___ आतल्या मशीनरीला मोकळी सोडायची नाही. आपण तिच्यावर देखरेख ठेवायची की कुठे-कुठे घासली जात आहे, काय होत आहे, कोणाबरोबर कडक वाणी निघाली. बोलले गेले त्याची अडचण नाही, आपण 'पाहत' राहायचे की, 'ओहोहो, चंदुभाऊ कडक बोलले!' प्रश्नकर्ता : परंतु जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत चांगलेच ना? दादाश्री : ‘बोलायचे, किंवा बोलायचे नाही' हे आता आपल्या हातात राहिले नाही. Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... बाहेरचे तर तुम्ही पाहाल ही वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा तुमच्याच आत असलेले सर्व तुम्ही पाहत राहाल, त्यावेळी तुम्ही केवळज्ञान सत्तेत असाल. पण ते अंश केवळज्ञान आहे, सर्वांश नाही. आत वाईट विचार येतात त्यांना पाहावे, चांगले विचार येतात त्यांनाही पाहावे. वाईटावर द्वेष नाही आणि चांगल्यावर राग नाही. आपल्याला चांगले-वाईट पाहण्याची गरज नाही. कारण मुळात ती सत्ताच आपल्या ताब्यात नाही. ____7. सत्य-असत्यामध्ये वापरली वाणी प्रश्नकर्ता : मस्का मारणे, हे सत्य आहे ? हो ला हो मिळवणे, हे सर्व? दादाश्री : त्यास सत्य म्हणता येणार नाही. मस्का मारण्यासारखी वस्तुच नाही. हा तर स्वतःचाच शोध आहे, स्वत:च्या चुकीमुळे तो दुसऱ्याला मस्का मारत राहतो. प्रश्नकर्ता : कोणासोबत गोड बोलले तर त्यात फायदा आहे का? दादाश्री : हो, त्याला सुख वाटते ! प्रश्नकर्ता : पण मग नंतर जेव्हा त्याला माहित पडते तेव्हा तर खूप दुःख होत असेल. कारण काही खूप गोड बोलणारे असतात आणि काही सत्य बोलणारे असतात, तर आपण असे म्हणतो ना, की हा गोड बोलतो पण त्यापेक्षा तो जरी खराब बोलतो पण तो चांगला माणूस आहे. दादाश्री : सत्य बोलणारा कोणास म्हणता येईल? एक भाऊ त्याच्या आईला खरं बोलला, एकदम सत्य बोलला. तो आईला काय म्हणतो? 'तू माझ्या बापाची बायको आहेस' असे म्हणतो, हे सत्य नाही का? तेव्हा आईने काय म्हटले? पुन्हा कधी तुझे तोंड दाखवू नकोस, चालता हो येथून! मला तुझ्या बापाची बायको म्हणतोस. अर्थात सत्य कसे असले पाहिजे? प्रिय वाटेल असे असले पाहिजे. फक्त प्रिय वाटेल असे असले तरी देखील चालणार नाही. तर ते हितकारी सुद्धा असले पाहिजे, एवढ्यानेही भागणार नाही. मी सत्य, प्रिय आणि Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... हितकारीच बोलतो, तरीही मी जर जास्त बोललो ना, तर तुम्ही म्हणाल की 'काका आता बंद करा, आता मला जेवायला जाऊ द्या ना.' म्हणजे ते मित पाहिजे, योग्य प्रमाणात असले पाहिजे. हा काही रेडिओ नाही की बोलतच राहील, काय? म्हणजे असे सत्य-प्रिय-हितकारी आणि मितचा, चारींचा गुणाकार झाला तरच सत्य म्हटले जाईल. नाहीतर केवळ नग्न सत्य बोलले, तर त्याला असत्य म्हटले जाते. वाणी कशी असायला हवी? हित-मित-प्रिय आणि सत्य, या चारींचा गुणाकार असलेली वाणी पाहिजे. इतर सर्व असत्य आहे. व्यवहार वाणीत हा नियम लागू पडतो. यात तर ज्ञानींचेच काम. चारींचा गुणाकार असलेली वाणी फक्त 'ज्ञानीपुरुषां'चीच असते, आणि ते समोरच्याच्या हितासाठीच असते, त्यांची वाणी जरा सुद्धा स्वत:च्या हितासाठी नसते. 'ज्ञानीं'ना पोतापणु-(मी आहे आणि माझे आहे, असे आरोपण, मी पणा.) नसतेच, जर 'पोतापणु' असेल तर ते ज्ञानी नाहीच. सत्य कोणास म्हणतात? कोणत्याही जीवाला वाणीमुळे दुःख होत नसेल, वर्तनाने दु:ख होत नसेल आणि मनाने सुद्धा त्याच्यासाठी वाईट विचार केला जात नसेल. हेच सर्वात मोठे सत्य आहे. सर्वात मोठा सिद्धांत आहे. हे रियल सत्य नाही. हे अंतिम व्यवहार सत्य आहे. प्रश्नकर्ता : माणूस खोटे का बोलतो? दादाश्री : माझ्याशी कोणी खोटे बोलत नाही. माझ्याजवळ तर इथपर्यंतचे बोलतात की, दहा-बारा वर्षाची मुलगी असेल आणि ती आता पन्नास वर्षाची झाली असेल, तर तिने बारा वर्षांपासून ते पन्नास वर्षांपर्यंत काय काय केले ते सर्व मला अगदी स्पष्ट लिहून देते. नाहीतर या जगात असे कधी घडलेच नाही. कोणतीही स्त्री स्वत:चे असे जाहीर करेल असे घडले नाही. अशा हजारो स्त्रिया माझ्याकडे येतात आणि मी त्यांचे पाप धुऊन देतो. प्रश्नकर्ता : विनाकारण मनुष्य खोटे बोलण्यासाठी प्रेरित होतो. त्या मागे कोणते कारण असेल? Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ३७ दादाश्री : क्रोध - मान - माया - लोभामुळे करतो तो. काहीतरी मिळवायचे आहे, एक तर मान मिळवायचा आहे, किंवा लक्ष्मी मिळवायची आहे, काहीतरी हवे आहे. ते प्राप्त करण्यासाठी खोटे बोलतो. किंवा मग भीती आहे, भीतीमुळे तो खोटे बोलतो. आत दडलेली भीती आहे की, 'कोणी मला काय म्हणेल?' अशी काहीतरी भीती असते. नंतर हळूहळू खोटेपणाची सवयच पडते. नंतर भीती नसली तरीही खोटे बोलत राहतो. प्रश्नकर्ता : या समाजात खूप लोक खोटे बोलतात आणि चोरी, लबाडी वगैरे पण करतात, पण तरीही खूप चांगल्या प्रकारे राहतात. आणि जो खरे बोलतो, त्याला सर्व अडचणी येतात. तर आता कोणती लाईन पकडावी ? खोटे बोलून स्वतःला थोडी शांती राहील असे करावे की मग खरे बोलावे ? दादाश्री : असे आहे ना, पूर्वी खोटे बोलले होते त्याचेच तर हे फळ आले आहे, तेच येथे चाखत आहात निवांतपणे ! आणि तो थोडेसे खरे बोलला होता, त्याचे फळ त्याला मिळाले. आणि आता तो खोटे बोलतो, त्याचे फळ त्याला मिळेलच. तुम्ही खरे बोलाल तर त्याचे फळ मिळेल. हे तर फळ चाखतात. न्याय आहे, निव्वळ न्याय आहे. एका माणसाच्या परीक्षेचा आज रिझल्ट आला, तो पास झाला आणि आपण नापास झालो. पास होणारा माणूस आज जरी रखडत असेल, परंतु त्याने परीक्षा देतेवेळी करेक्ट दिली होती. म्हणजे हे सर्व जे येत आहे, ते फळ येत आहे, त्या फळाला शांततेने भोगून घ्यावे, याला म्हणतात पुरुषार्थ. प्रश्नकर्ता: कित्येक जण खोटे बोलतात तरी पण सत्यात मोडते. आणि कित्येक जण खरे बोलतात तरी पण ते असत्यात मोडते. हे काय पझल (कोडे) आहे ? दादाश्री : हे त्याच्या पाप आणि पुण्याच्या आधारे घडत असते. त्याचा जर पापाचा उदय असेल तर तो खरे बोलला तरी देखील खोटे ठरते. आणि जेव्हा पुण्याचा उदय असेल तेव्हा खोटे बोलला तरी देखील लोक त्याचे खरे म्हणून स्वीकारतील. वाटेल तसे खोटे करेल तरीही चालून जाते. Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ ३८ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : तर त्याला काही नुकसान होत नाही? दादाश्री : नुकसान तर आहे, परंतु पुढच्या जन्माचे. या जन्मात तर त्याला मागच्या जन्माचे फळ मिळाले. आणि हे खोटे बोलला, त्याचे फळ त्याला पुढच्या जन्मात मिळेल. आता हे त्याने बी पेरले, बाकी हे काही अनागोंदी कारभार नाही की वाटेल तसे चालून जाईल! प्रश्नकर्ता : जाणून-बुजून चुकीचे केले आणि नंतर प्रतिक्रमण करून घेऊ असे म्हटले, तर ते चालेल? दादाश्री : नाही. जाणून-बुजून तर करू नये. पण त्यातून जर चुकीचे झाले तर प्रतिक्रमण करून घ्यावे. प्रश्नकर्ता : दुसऱ्याच्या भल्यासाठी खोटे बोलणे हे पाप मानले जाईल? दादाश्री : मुळात खोटे बोलणे हेच पाप मानले जाते. तरी दुसऱ्याच्या भल्यासाठी बोललो तर एकीकडे पुण्य बांधले आणि दुसरीकडे पाप बांधले. म्हणजे यात थोडे-फार पाप तर आहे. खोटे बोलल्याने काय नुकसान होत असेल? तर त्यामुळे आपल्या वरचा विश्वास उडतो. आणि विश्वास उडाला म्हणजे माणसाची किंमत खलास! प्रश्नकर्ता : आणि खोटे पकडले जाते तेव्हा काय अवस्था होते? दादाश्री : आपण सांगायचे ना की, 'पकडले गेले आमचे' आणि मी तर तेव्हा सांगूनच टाकतो की 'भाऊ, मी पकडलो गेलो.' त्यात काय अडचण आहे ? नंतर तोही हसेल आणि आपणही हसायचे. त्यामुळे तो समजून जातो की यात काही घेणे-देणे नाही, आणि नुकसान होईल असेही नाही. प्रश्नकर्ता : समजा की आमचे खोटे तुम्ही पकडले, तर तेव्हा तुम्हाला कसे वाटते? Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... दादाश्री : काही सुद्धा वाटत नाही. पुष्कळ वेळा मी खोटे पकडतो. मी जाणतो की हे असेच असते. याहून जास्त आशा आम्ही कशी ठेवू शकतो? अनंत जन्मांपासून खोटेच बोलले आहे. खरे बोललेच कुठे? आपण विचारले 'कुठे गेला होता?' तर 'रस्त्यावर फिरायला गेलो होतो' असे सांगतो, आणि गेलेला असतो सिनेमाला. हो, पण मग त्याची माफी मागून घ्यावी. प्रश्नकर्ता : परमार्थासाठी थोडे खोटे बोलले तर त्याचा दोष लागतो का? दादाश्री : परमार्थ म्हणजे आत्म्यासाठी जे काही पण करण्यात येते, त्याचा दोष लागत नाही. आणि देहासाठी जे काही करण्यात येते, चुकीचे करण्यात आले तर दोष लागतो आणि चांगले करण्यात आले तर गुण लागतो. आत्महेतू असेल, त्यासाठी जी जी कार्ये असतील, त्यात काही दोष नाही. पण समोरच्याला आपल्या निमित्ताने दुःख झाले तर त्याचा दोष लागतो! खोटे बोलूनही आत्म्याचे करत असाल तर हरकत नाही आणि खरे बोलूनही देहाचे हित करत असाल तर हरकत आहे. खरे बोलून भौतिक हित कराल तरीही अडचण आहे. पण खोटे बोलून आत्म्यासाठी कराल ना, तरी हितकारी ठरते. प्रश्नकर्ता : कोणाचे चांगले काम करून देण्यासाठी आम्ही खोटे बोललो तर कोणाला दोष लागतो? असे करू शकतो का? दादाश्री : जो खोटे बोलतो त्याला दोष लागतो. प्रश्नकर्ता : खोटे बोलण्यासाठी कोणी दडपण आणले तर? दुसऱ्या कोणाचे चांगले होत आहे त्यासाठी तुम्ही खोटे बोला, असे कोणी दडपण आणले तर? दादाश्री : तर असे म्हणावे की, 'भाऊ, मी तुमच्या दबावामुळे Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... बोलेन, मी तर पोपट आहे. हे तर तुमच्या दडपणामुळे पोपट होऊन बोलेन. बाकी, मी बोलत नाही.' नंतर पोपट बोलतो अशाप्रकारे बोला. तुम्ही स्वतः बोलूच नका, पोपट होऊन बोला. आपण म्हटले 'आया राम' तर पोपट म्हणेल, 'आया राम.' असे बोला. मला 'ज्ञान' झाले नव्हते ना, तेव्हा एकदा कोर्टात जावे लागले होते. साक्ष द्यायची होती. तेव्हा वकील म्हणाला की, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे'. मी म्हटले, 'नाही, भाऊ. मला जेवढे माहित आहे तेवढे बोलेन. मी काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे बोलणार नाही.' तेव्हा तो वकील म्हणतो, 'मला काय हे तुमच्यासाठी उभे केले? असे तर मी खोटा ठरेन. माझी अब्रू जाईल. असे साक्षीदार मिळाले तर आमची संपूर्ण केसच उडून जाईल.' मी विचारले, मग 'यावर उपाय काय?' तेव्हा वकील म्हणाले की, 'आम्ही सांगतो तेवढे बोलायचे.' त्यावर मी सांगितले, 'उद्या विचार करून सांगेन.' नंतर रात्री मला आतून उत्तर मिळाले, की आपण पोपट होऊन जावे. वकीलाने सांगितल्यामुळे मी बोलतो, म्हणजे आत असा भाव राहिला पाहिजे, आणि नंतर बोला. बाकी कोणासाठी चांगले काम करत असाल तर शक्य तोपर्यंत खोटे बोलू नका. कोणाच्या चांगल्यासाठी चोरी करायची नाही. कोणाच्या चांगल्यासाठी हिंसा करायची नाही. संपूर्ण जोखिमदारी आपलीच आहे. खोटे बोलण्याची तुमची इच्छा आहे खरी आत? थोडीतरी? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : आणि तरीसुद्धा बोलले जाते ही हकीकत आहे ना! तर जेव्हा खोटे बोलले गेले आणि तुम्हाला माहित पडले की हे खोटे बोलले गेले की ताबडतोब 'दादां'जवळ माफी मागायची की, 'दादा, मला खोटे बोलायचे नाही, तरी खोटे बोलले गेले. मला माफ करा. आता पुन्हा खोटे बोलणार नाही.' आणि तरीही पुन्हा तसे घडले तर दुःखी होऊ नये. माफी मागतच राहायची. त्यामुळे त्या गुन्हाची तेथे नोंद राहणार नाही. माफी मागितली म्हणजे नोंद राहत नाही. Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : आम्ही दररोज बोलतो, की हे चुकीचे आहे, असे नव्हते बोलायचे, पण तरी असे का होते? करायचे नसेल तरी का केले जाते? दादाश्री : अति शहाणपणा आत भरुन आणलेला आहे म्हणून. आम्ही कधीही कोणाला काहीही सांगितले नाही की असे करू नका. जर सांगितले गेले तर तेव्हाच सावध होतो. प्रश्नकर्ता : आम्ही खोटे बोललो असू, ते सुद्धा कर्म बांधले असेच म्हटले जाईल ना? दादाश्री : अर्थात्च! पण खोटे बोलले असाल, त्याहीपेक्षा खोटे बोलण्याचे जे भाव करता ना, ते त्याहूनही अधिक मोठे कर्म म्हटले जाते. खोटे बोलणे हे तर म्हणा कर्मफळ आहे. खोटे बोलण्याचे भावच, खोटे बोलण्याचा आपला निश्चय, त्यामुळेच कर्मबंधन होत असते. आले का तुमच्या लक्षात? हे वाक्य काही मदत करेल का तुम्हाला? कसे मदत करेल? प्रश्नकर्ता : खोटे बोलणे बंद करायला पाहिजे. दादाश्री : नाही. खोटे बोलण्याचा अभिप्रायच सोडून द्यायला पाहिजे आणि खोटे बोलले गेले तर पश्चाताप केला पाहिजे की 'काय करू? असे खोटे बोलायला नको'. तरी खोटे बोलणे बंद होणार नाही. पण तो अभिप्राय मात्र बंद होईल. 'आजपासून खोटे बोलणार नाही, खोटे बोलणे हे महापाप आहे, महा दुःखदायी आहे आणि खोटे बोलणे हेच बंधन आहे.' असा जर तुमचा अभिप्राय झाला, तर तुमचे खोटे बोलण्याचे पाप बंद होऊन जाईल. आणि या पूर्वी जोपर्यंत हे भाव बंद केले नव्हते, तोपर्यंतच्या त्याच्या ज्या 'रिअॅक्शन' (प्रतिक्रिया) आहेत, तेवढ्या बाकी राहतील. तेवढा हिशोब तुमच्या समोर येईल. त्यामुळे मग तुम्हाला तेवढे खोटे अनिवार्यपणे बोलावे लागेल, तेव्हा तुम्ही त्याचा पश्चाताप करा. आता जरी पश्चाताप केला, तरीही तुम्ही जे खोटे बोललात, त्या कर्मफळाचेही फळ तर येणारच आणि मग तेही भोगावे तर लागेलच. Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... म्हणजे तुम्ही ज्यांच्याशी खोटे बोलले असाल, ते लोक बाहेर तुमची बदनामी करतील की, 'काय हे चंदुभाऊ, चांगला शिकलेला माणूस, चक्क खोटे बोलला?! हीच काय त्याची लायकी?' अर्थात् बदनामीचे फळही भोगावेच लागेल, जरी पश्चाताप केला असेल तरीही. आणि जर पहिल्यापासूनच ते पाणी बंद केले असेल, 'कॉजेस'च बंद करण्यात आले, तर मग 'कॉजेस'चे फळ आणि त्याचेही पुन्हा फळ, हे येणार नाही. म्हणून मी काय सांगत असतो? जरी खोटे बोलले गेले पण 'असे बोलायला नको' असा तुझा विरोध आहे ना? हो, तर हे खोटे तुला आवडत नाही, हे नक्की झाले, असे म्हटले जाईल. खोटे बोलण्याचा तुझा अभिप्राय नाही ना, मग तुझी जबाबदारी संपली. प्रश्नकर्ता : पण ज्याला खोटे बोलण्याची सवयच असेल, त्याने काय करावे? दादाश्री : त्याने मग त्याचबरोबर प्रतिक्रमण करण्याची सवयही करून घ्यावी लागेल. आणि त्याने जर प्रतिक्रमण केले, तर मग जबाबदारी आमची आहे. म्हणून अभिप्राय बदला! खोटे बोलणे म्हणजे जीवनाचा अंत आणण्यासारखे आहे, जीवनाचा अंत आणणे आणि खोटे बोलणे हे दोन्ही एक समान आहेत, असे 'डिसाइड' (निश्चित) करावे लागते. आणि पुन्हा सत्याचे शेपूट धरुनही बसू नका. प्रश्नकर्ता : बोलण्यात जन्मापासूनच त्रास आहे. दादाश्री : मागच्या जन्मी जीभेने लढाई केली होती ना! जिथे-तिथे सर्वांना शिव्या दिल्या, त्यामुळे मग त्याची जीभ (वाचा) जाते. मग काय होईल? बोलण्यात काही बाकी ठेवतो का? कर्म कमी असतील तर पुन्हा वाचा फुटेलही. असे काही नाही, पाच-सात वर्षानंतरही वाचा फुटेल. चुकीची वाणी बोलल्यामुळेच तर जीभ गेली होती ना! जीभेचा जेवढा दुरुपयोग कराल तितकी जीभ जाते. Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ___४३ प्रश्नकर्ता : माझा स्वभाव, माझी वाणी कठोर आहे. कोणाच्याही मनाला लागेल, दु:ख वाटेल अशी आहे. माझ्या मनात असे नसते की मी त्याला दुःख देण्यासाठी बोलत आहे. दादाश्री : कोणाला दु:ख होईल असे बोलू नये. कोणत्याही जीवाला दु:ख होईल, अशी वाणी बोलणे, हा खूप मोठा अपराध आहे. प्रश्नकर्ता : अशी वाणी असण्याचे कारण काय? दादाश्री : रुबाब दाखवण्यासाठी! दुसऱ्यांवर रुबाब पडावा यासाठी. प्रश्नकर्ता : आम्ही रुबाब दाखवण्यासाठी कडक बोलतो आणि समोरचा मनुष्य ते सहन करून घेतो. तर तो कशामुळे सहन करतो? दादाश्री : एक तर, त्याला गरज असते, गरजू सहन करतो, आणि दुसरे, क्लेश होऊ नये म्हणून सहन करतो. तिसरे, अब्रू जाऊ नये म्हणून सहन करतो. कुत्रा भुंकेल पण आपण भुंकायचे नाही, अशा कोणत्यातरी कारणामुळे लोक चालवून घेतात, निभावून घेतात. 8. दुःखदायी वाणीचे करावे प्रतिक्रमण भगवंताकडे सत्य आणि असत्य, ह्या दोन्ही गोष्टी नसतातच. ही तर समाज व्यवस्था आहे. हिंदुचे सत्य, ते मुस्लिमांसाठी असत्य ठरते आणि मुसलमानांचे सत्य, ते हिंदुसाठी असत्य ठरते. ही सर्व समाज व्यवस्था आहे. भगवंतांजवळ_खरे-खोटे असे काहीच नसते. भगवंत तर इतकेच सांगतात की, 'कोणालाही दुःख झाले तर आपण प्रतिक्रमण करावे. आपल्याकडून दुःख व्हायला नको. तुम्ही 'चंदुभाऊ' होते, ते इथे ह्या जगात सत्य आहे. बाकी, भगवंतांच्या येथे तर तो 'चंदुभाऊ'च नाही. हे सत्य भगवंताकडे असत्य आहे. संसार चालेल, संसार स्पर्शणार नाही, नडणार नाही आणि (मोक्षाचे) काम होईल, असे आहे. फक्त आमच्या आज्ञेचे आराधन करायचे आहे. 'चंदुभाऊ' खोटे बोलेल, त्याचीही आपल्याकडे अडचण नाही. खोटे बोललात त्यामुळे समोरच्याचे नुकसान झाले. म्हणून आपण Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ XX वाणी, व्यवहारात... 'चंदुभाऊ'ला सांगावे, 'प्रतिक्रमण करून घ्या' खोटे बोलणे हा प्रकृति गुण आहे, म्हणून बोलल्याशिवाय राहणार नाही. खोटे बोलण्यासाठी मी विरोध करत नाही, खोटे बोलल्यानंतर जर प्रतिक्रमण केले नाही, तर मात्र मी विरोध करतो. खोटे बोललो आणि प्रतिक्रमणाचे भाव झाले, त्यावेळी जे ध्यान वर्तत असते, ते धर्मध्यान आहे. लोक धर्मध्यान म्हणजे काय, हे शोधत असतात. खोटे बोलले गेले, तर तेव्हा 'दादां 'जवळ माफी मागून घ्यावी आणि पुन्हा खोटे बोलले जावू नये, यासाठी शक्ति मागावी. प्रश्नकर्ता : समजा जीभेने मी काही बोललो, तर त्याला माझ्याकडून तर दुःख झाले, असेच म्हटले जाईल ना? दादाश्री : हो, पण ते दु:ख तर आपल्या इच्छेविरुद्ध झाले आहे ना, म्हणून आपण प्रतिक्रमण केले पाहिजे. हाच त्याचा हिशोब असेल, जो फेडला गेला. प्रश्नकर्ता : आपण काही बोललो तर त्याला मनात खूप वाईट सुद्धा वाटते ना? दादाश्री : हो, वाईट तर वाटते. चुकीचे झाले असेल तर वाईट वाटेलच ना. हिशोब फेडावा लागतो, तो तर फेडावाच लागतो ना, त्यातून सुटकाच नाही ना! प्रश्नकर्ता : अंकुश राहत नाही म्हणून वाणीद्वारे निघून जाते. दादाश्री : हो. ते निघून जाते. पण निघून गेल्यावर त्याचे आपण प्रतिक्रमण करावे, बस, दुसरे काही नाही. पश्चाताप करावा आणि 'पुन्हा असे करणार नाही' असा निश्चय सुद्धा केला पाहिजे. नंतर रिकाम्या वेळी त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रतिक्रमण करतच राहायचे. म्हणजे मग सर्व नरम पडते. ज्या ज्या कठिण फाईली आहेत, तेवढ्याच नरम करायच्या आहेत, तशा दोन-चार फाईलीच कठिण असतात, जास्त नसतात ना! Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : आपली इच्छा नसूनही क्लेश होतो, वाणी खराब निघते तर काय करावे? दादाश्री : ते शेवटच्या टप्प्यावर आहे. जेव्हा रस्ता संपत आला असेल ना, तेव्हा आपले भाव नसूनही चुकीचे घडते. तर तिथे आपण काय केले पाहिजे, तर पश्चाताप केला पाहिजे, तेव्हा मग पुसले जाईल, बस. चुकीचे घडले तर हा इतकाच उपाय आहे. दुसरा कोणताही उपाय नाही. ते सुद्धा जेव्हा ते कार्य पूर्ण होत आले असेल तेव्हा मनात खराब करण्याचा भाव तर नसतो तरी देखील खराब कार्य घडते. आणि जर ते कार्य अजून अपूर्ण असेल, तर आपल्याला वाईट करण्याचा भावही होतो आणि वाईट कार्य सुद्धा केले जाते, दोन्हीही होते. प्रश्नकर्ता : हेतू चांगला आहे तर मग प्रतिक्रमण का करायचे? दादाश्री : प्रतिक्रमण तर करावे लागते, कारण समोरच्याला दुःख झाले ना. आणि व्यवहारात लोक म्हणतील ना, बघा ही बाई, नवऱ्याला कशी धमकावते. त्यावर मग प्रतिक्रमण करावे लागते. जे डोळ्यांनी दिसते, त्याचे प्रतिक्रमण केले पाहिजे. जरी आत तुमचा हेतू सोन्यासारखा असेल, पण तो काय कामाचा? तो हेतू चालणार नाही. हेतू जरी शुद्ध सोन्यासारखा असला तरी देखील आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते. चूक झाली की प्रतिक्रमण करावे लागते. ह्या सर्वच महात्म्यांची इच्छा आहे, आता जगत कल्याण करण्याची भावना आहे. हेतू चांगला आहे, पण तरीही चालणार नाही. प्रतिक्रमण तर सर्वात पहिले करावे लागेल. कपड्यावर डाग पडला तर लगेच धुवून टाकता ना? तसे हे कपड्यावरचे डाग आहेत. ही 'आमची' टेपरेकॉर्ड वाजते, त्यात काही चुकभूल झाली तर आम्हाला लगेचच त्याचा पश्चाताप करावा लागतो. त्याशिवाय चालत नाही. टेपरेकॉर्डप्रमाणे निघते, म्हणून आमची वाणी बिनमालकीची आहे, पण तरी सुद्धा आमच्यावर जबाबदारी येते. लोक तर असेच म्हणतील ना, ‘पण साहेब, टेप तर तुमचीच आहे ना?' असे म्हणतील की नाही? ही काय दुसऱ्याची टेप होती? म्हणून हे शब्द आम्हाला धुवावे लागतात. वाईट शब्द बोलू शकत नाही. Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६ वाणी, व्यवहारात... प्रतिक्रमण तर अगदी अंतिम सायन्स आहे. म्हणून जर माझ्याकडून तुम्हाला कडक बोलले गेले असेल, तुम्हाला जरी त्याचे जास्त दु:ख झाले नसेल तरी मला हे समजले पाहिजे की मी असे कडक बोलायलाच नको होते. या ज्ञानामुळे स्वतःची चूक लक्षात येते. म्हणून मला तुमच्या नावाचे प्रतिक्रमण करावे लागते. प्रश्नकर्ता : म्हणजे वाणी बोलतेवेळी, आपल्याला आपला व्हयू पॉइंट करेक्ट वाटत असेल, पण समोरच्याला त्याच्या व्हयू पॉइंटने करेक्ट वाटत नसेल तर? दादाश्री : ती सर्व वाणी अगदी चुकीची आहे. समोरच्याला फीट (अनुकूल) झाली, तीच करेक्ट वाणी! समोरच्याला फीट होईल अशी वाणी आपण बोलली पाहिजे. प्रश्नकर्ता : आम्ही समोरच्याला काही सांगितले, आमच्या मनात तर तसे काही नसते, पण तरी आम्ही सांगितल्यावर त्याला असे वाटते की 'हा बरोबर बोलत नाही, चुकीचे आहे.' तर त्यास अतिक्रमण म्हटले जाते का? दादाश्री : त्याला दुःख वाटत असेल तर आपण प्रतिक्रमण करून घ्यावे. त्यात काय आपल्याला कष्ट पडणार आहेत? कोणाला दु:ख देऊन आपण सुखी होऊ शकत नाही. प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुकीचे करत असेल, तर त्याला टोकावे लागते. तर ते करायचे की नाही? दादाश्री : व्यवहारात टोकावे लागते, पण ते अहंकारासहित होत असते. म्हणून त्याचे प्रतिक्रमण केले पाहिजे. प्रश्नकर्ता : टोकले नाही तर तो डोक्यावर चढतो? दादाश्री : टोकावे तर लागते, पण सांगता आले पाहिजे, सांगता येत नाही, व्यवहार येत नाही, त्यामुळे अहंकारासहित टोकले जाते. म्हणून टोकल्यानंतर त्याचे प्रतिक्रमण करून घ्यायचे. तुम्ही समोरच्याला टोकले Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ४७ म्हणून त्याला वाईट तर वाटेल, पण त्याचे सतत प्रतिक्रमण करत राहाल तर सहा महिन्यानंतर, बारा महिन्यानंतर तुमची वाणी अशी निघेल की समोरच्याला गोड वाटेल. प्रश्नकर्ता : आम्हाला कित्येकदा समोरच्याला त्याच्या हितासाठी टोकावे लागते, थांबवावे लागते. त्यावेळी त्याला दु:ख झाले तर? दादाश्री : हो. सांगण्याचा अधिकार आहे. पण सांगायला जमले पाहिजे. हा भाऊ आला, की त्याला पाहताच म्हणेल की 'तू असा आहेस आणि तू तसा आहेस' तेव्हा ते अतिक्रमण म्हटले जाते. समोरच्याला दुःख होईल असे जर घडले तर आपण सांगावे, 'हे चंदुभाऊ, प्रतिक्रमण करा, अतिक्रमण का केले? पुन्हा असे बोलणार नाही आणि हे बोललो त्याचा मी पश्चाताप करतो.' इतकेच प्रतिक्रमण करावे लागते. प्रश्नकर्ता : पण ते चुकीचे बोलत असतील किंवा चुकीचे करत असतील तरीही आपण काहीही बोलू नये? दादाश्री : बोलावे. 'असे केले नाही तर बरे, हे असे नाही झाले तर उत्तम.' असे सांगू शकतो. पण आपण त्याचे बॉस (वरिष्ठ) आहोत, अशा प्रकारे बोलत असतो ना, म्हणून वाईट वाटते. कडक शब्द असतील, ते विनयपूर्वक सांगायला हवेत. प्रश्नकर्ता : कडक शब्द बोलताना विनय ठेऊ शकतो? दादाश्री : ठेऊ शकतो, यालाच तर विज्ञान म्हणतात. कारण 'ड्रामेटिक'(नाटकीय) आहे ना! असतो लक्ष्मीचंद आणि म्हणतो, 'मी भतृहरि राजा आहे, या राणीचा नवरा आहे, नंतर भिक्षा दे ना मैया पिंगळा.' असे बोलून डोळ्यांमधून अश्रू काढतो. तेव्हा, 'अरे, तू तर लक्ष्मीचंद आहेस ना? तू खरं रडतोस? तेव्हा म्हणेल, 'मी कशाला खरं रडू? मला हा अभिनय करावाच लागतो. नाहीतर माझा पगार कापून घेतील.' असा अभिनय करायचा आहे. ज्ञान प्राप्तिनंतर हे तर नाटक आहे. प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण करायचे, ते मनाने करायचे की वाचून किंवा बोलून करायचे? Page #59 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... कसेही करा, दादाश्री : नाही. मनानेच. मनाने करा, बोलून करा, की माझा त्याच्या प्रति जो दोष झाला आहे, त्याची क्षमा मागतो. हे मनात बोलले तरी चालेल. मानसिक अॅटॅक झाला म्हणून त्याचे प्रतिक्रमण करायचे, बस. ४८ प्रश्नकर्ता : एखादा वाईट प्रसंग आला असेल, समोरची व्यक्ति तुमच्यासाठी वाईट बोलत असेल किंवा वाईट करत असेल, तर त्याच्या रिॲक्शनने मनात आम्हाला जो राग येतो, त्यामुळे जीभेने शब्द बाहेर निघतात, पण मन आतून सांगत असते की, हे चुकीचे होत आहे. तर हे जे बोलले जाते त्याचा दोष अधिक आहे की मनाने केलेल्याचा दोष अधिक आहे ? दादाश्री : जीभेने करतो ना, ते भांडण तिथल्या तिथे, लगेचच हिशोब फेडून पूर्ण होतो आणि मनाने केलेले भांडण पुढे चालत राहते. जीभेने भांडतो, ते तर आपण समोरच्याला सुनावले, म्हणजे तो लगेच आपल्याला परत करतो. ताबडतोब त्याचे फळ मिळून जाते. आणि मनाने केले त्याचे फळ नंतर परिपक्व होईल. हे आत्ता त्याचे बीज पेरले गेले. म्हणजे त्यास कॉजेस म्हणतात. म्हणूनच कॉजेस पडणार नाहीत, यासाठी मनाने होऊन गेले असेल तर मनाने प्रतिक्रमण करायला पाहिजे. 9. विग्रह, पति - पत्नीमधील मनुष्य होऊन प्राप्त संसारात दखल ( ढवळाढवळ) केली नाही, तर संसार अगदी सरळ आणि सुरळीत चालत राहील. पण हा तर प्राप्त संसारात दखलच करीत असतो. उठल्यापासून नुसती दखल. आणि बायको सुद्धा उठल्यापासून दखलच करत राहते, की या बाळाला जरा झोका पण देत नाहीत, बघा तरी, हा केव्हाचा रडत आहे ! त्यावर परत नवरा म्हणेल, 'तुझ्या पोटात होता तेव्हा काय मी झोका द्यायला आलो होतो! तुझ्या पोटातून बाहेर निघाला तर आता तूच सांभाळ. ' असे म्हणतो. ती सरळ वागत नसेल तर काय करेल ? प्रश्नकर्ता: दखल करू नका असे सांगितले ना तुम्ही, तर हे Page #60 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ४९ सर्व जसे आहे तसेच राहू द्यायचे का? घरात पुष्कळ माणसे असली तरी? दादाश्री : तसेच राहू द्यायचेही नाही आणि दखल सुद्धा करायची नाही. प्रश्नकर्ता : हे कसे शक्य आहे ? दादाश्री : दखल करायची असते का कधी? दखल म्हणजे अहंकाराचा वेडेपणा! प्रश्नकर्ता : घरात काही काम असेल तर सांगू शकतो की हे जरा इतके करा? दादाश्री : पण सांगण्या-सांगण्यात फरक असतो. प्रश्नकर्ता : इमोशन शिवाय सांगायचे. इमोशनल झाल्याशिवाय सांगायचे, असे? दादाश्री : तशी तर किती गोड वाणी बोलता की बोलण्यापूर्वीच ती समजून जाते! प्रश्नकर्ता : कडक वाणी-कर्कश वाणी असेल, तर तिथे काय करावे? दादाश्री : कर्कश वाणी, तेव्हाच तर दखल होते ना! कर्कश वाणी असेल तर त्यात एवढे शब्द जोडावे लागतील की 'मी विनंती करतो, जरा इतके करा ना.' 'मी विनंती...' एवढे शब्द जोडून बोला. प्रश्नकर्ता : म्हणजे आपण जर असे बोललो की, 'एय हे ताट इथून उचल' आणि आपण हळूवार बोललो 'तू हे ताट इथून उचल ना.' म्हणजे हे जे बोलण्याचे प्रेशर आहे... दादाश्री : त्यास दखल नाही म्हणत. पण जर त्याच्यावर रुबाब केला तर ती दखल म्हटली जाते. प्रश्नकर्ता : म्हणजे हळूवारपणे बोलावे. Page #61 -------------------------------------------------------------------------- ________________ ५० वाणी, व्यवहारात... दादाश्री : नाही, हळूवारपणे बोलले तरी चालेल. पण हा तर हळूवार बोलला तरी दखल करून टाकतो. म्हणून तुम्ही असे म्हणायचे की, 'मी विनंती करतो, तू इतके कर ना!' त्यात शब्द जोडावा लागतो. प्रश्नकर्ता : कित्येकदा घरात मोठे भांडण होते तर तेव्हा काय करावे? दादाश्री : समंजस माणूस असेल ना, तर लाख रुपये दिले तरी भांडण करणार नाही! आणि हे तर बिन पैश्याचे भांडण करतात, तर ते अनाडी नाहीत तर आणखी काय? भगवान महावीरांना कर्म खपविण्यासाठी साठ मैल चालून अनाडी क्षेत्रात जावे लागले होते आणि आजचे लोक तर पुण्यवान आहेत की घरातच अनाडी क्षेत्र आहे ! किती भाग्यवान ! कर्म खपण्यासाठी तर हे अत्यंत लाभदायी आहे, जर सरळ राहिलात तर. __घरात कोणी विचारे ल, सल्ला मागेल तरच उत्तर द्यावे. विचारल्याशिवाय सल्ला देणे त्यास भगवंतांनी अहंकार म्हटले आहे. नवरा विचारेल, 'हा पेला कुठे ठेवायचा?' तर बायको उत्तर देते की, 'अमक्या जागी ठेवा.' तर आपण तेथे ठेवून द्यावे. त्याऐवजी तो म्हणेल की, 'तुला अक्कल नाही, इथे कुठे ठेवायला सांगतेस तू?' त्यावर मग बायको म्हणेल की, 'अक्कल नाही म्हणून तर मी तुम्हाला असे सांगितले, मग आता तुमच्या अकलेने ठेवा.' आता याचा कधी अंत येईल? हे संयोगांचे संघर्षच आहेत फक्त! प्रश्नकर्ता : पण सर्वांची बुद्धी एकसारखी कुठे असते, दादा! एकसारखे विचार नसतात. आपण चांगले केले तरी देखील कोणी समजत नाही, त्याचे काय करावे? दादाश्री : असे काहीच नाही. विचार सर्व समजतात. पण सर्वजण स्वतःला असे मानतात की माझे विचार खरे आहेत आणि बाकी सर्वांचे विचार खोटे आहेत. विचार करता येत नाही. भानच नाही तर. माणसासारखे भान पण नाही. हे तर मनात मानून बसले आहेत की मी बी.ए. झालो आणि ग्रेज्युएट झालो. पण माणूस म्हणून भान असेल तर क्लेश होणारच Page #62 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ___ ५१ नाहीत. सर्व ठिकाणी स्वतः एडजेस्टेबल होत राहील. ही दारे आपटली तेही आपल्याला आवडत नाही. वाऱ्यामुळे दरवाजे आपटतात, ते तुम्हाला आवडते का? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : मग माणसं भांडतील ते कसे आवडेल? कुत्री भांडत असतील तरीही आवडत नाही आपल्याला. हे तर कर्माच्या उदयाने भांडणे चालत राहतील, पण जीभेने वाईट बोलण्याचे मात्र बंद करा. गोष्टींना पोटातच ठेवा, घरात किंवा बाहेर बोलायचे बंद करा. बऱ्याच स्त्रिया म्हणतात, 'दोन थोबाडीत माराल ते चालेल, पण तुम्ही जे शब्द बोलता त्याने माझ्या हृदयाला घाव लागतो!' घ्या आता! स्पर्श सुद्धा करत नाही आणि तरीही घाव लागतात ! स्वतः वाकडा आहे. आता रस्त्यात छपरावरुन एक एवढासा दगडाचा तुकडा पडला, आणि रक्त निघाले तर तेथे का बोलत नाही? हे तर जाणून-बुजून तिच्यावर रुबाब दाखवायचा आहे. अशाप्रकारे नवरेपणा दाखवयाचा आहे. मग म्हातारपणी ती तुम्हाला चांगलेच(!) देणार. पतीने जर काही मागितले तर ती म्हणेल 'उगाच अशी कटकट का करता, चूपचाप झोपा ना' म्हणून मग गपचूप पडून राहावे लागते, म्हणजे अब्रूच जाते ना. त्याऐवजी मर्यादेत राहा. घरात भांडण का करता. लोकांना सांगा, समजवा की घरात भांडण करू नका. बाहेर जाऊन करा, आणि भगिनींनो तुम्ही पण करू नका हं! प्रश्नकर्ता : वाणीने काहीही क्लेश होत नसेल. पण मनात क्लेश उत्पन्न झाला असेल, म्हणजे वाणीने म्हटले नसेल, पण मनात बरेच काही साठलेले असेल, तर त्यास क्लेशरहित घर म्हणायचे का? दादाश्री : त्यास तर अधिक क्लेश म्हणतात. मन बेचैनी अनुभवते त्यावेळी क्लेश असतोच आणि नंतर आपल्याला सांगेल, 'मला चैन पडत नाही.' हीच क्लेशाची निशाणी. हलक्या प्रकारचे असेल किंवा उग्र प्रकारचे असेल. उग्र प्रकारची भांडणं तर अशी असतात की हार्ट सुद्धा फेल होऊन Page #63 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... जाते. कित्येक तर असे शब्द बोलतात की हार्ट लगेचच रिकामे होऊन जाते. समोरच्याला घर खालीच करावे लागते, घरमालक येतो, मग!! प्रश्नकर्ता : कोणी जाणून-बुजून वस्तू फेकून दिली तर तिथे एडजस्टमेन्ट कशा प्रकारे घ्यायची? दादाश्री : हे तर फेकून दिले, पण मुलगा जरी फेकून दिला तरी सुद्धा आपण 'पाहत' राहायचे. बापाने मुलाला फेकून दिले तरी आपण पाहात राहायचे. नाहीतर काय आपण नवऱ्याला फेकून द्यायचे? एकाला तर हॉस्पिटलमध्ये भरती केले. आता परत दोघांना हॉस्पिटलमध्ये पाठवायचे आहे का?! आणि नंतर जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो आपल्याला पछाडून टाकेल. मग तिसऱ्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. प्रश्नकर्ता : तर मग काही सांगू नये का? दादाश्री : सांगावे, पण सम्यक्पणे सांगावे, जर बोलता येत असेल तर. नाहीतर कुत्र्यासारखे भुंकत राहण्यात काय अर्थ आहे ? म्हणून सम्यक् बोलावे. प्रश्नकर्ता : सम्यक् म्हणजे कशा प्रकारे? दादाश्री : ओहोहो! तुम्ही या बाळाला का फेकले? त्याचे काय कारण? तेव्हा तो म्हणेल की मी काय मुद्दाम फेकेल? तो माझ्या हातून निसटला आणि पडला. प्रश्नकर्ता : हे तर तो खोटे बोलला ना? दादाश्री : तो खोटे बोलला हे आपण पाहायचे नाही. खोटे बोलेल की खरे बोलेल ते त्याच्यावर अवलंबून आहे. हे आपल्यावर अवलंबून नाही. तो त्याच्या मनात जसे येईल तसे करेल. त्याला खोटे बोलायचे असेल किंवा आपल्याला मारून टाकायचे असेल हे त्याच्या ताब्यात आहे. रात्री आपल्या माठात विष टाकून आला तर आपण तर मरूनच जाऊ ना! म्हणून जे आपल्या हातात नाही ते आपल्याला पाहायचे नाही. सम्यक् बोलता आले तर ते कामाचे की, 'भाऊ, यात तुम्हाला काय फायदा Page #64 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ५३ झाला?' तर तो स्वत:हून कबूल करेल. असे सम्यक् बोलत नाही, आणि तुम्ही पाच शेर द्याल तर तो दहा शेर परत करेल.' प्रश्नकर्ता : सांगता येत नसेल तर मग काय करावे? गप्प राहायचे? दादाश्री : मौन राहायचे आणि पाहत राहायचे की ‘क्या होता है?' चित्रपटात मुलांना आपटतात, तेव्हा आपण काय करतो? सांगण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण क्लेश वाढणार नाही अशा प्रकारे सांगण्याचा अधिकार आहे, बाकी सांगितल्यामुळे जर भांडण वाढत असेल तर तो मूर्खपणाच आहे. प्रश्नकर्ता : अबोला धरुन गोष्टीला टाळल्याने त्याचा निकाल होऊ शकेल? दादाश्री : नाही होऊ शकणार. तो जर आपल्याला समोर भेटला तर कसे आहात? कसे नाही? अशी विचारपूस केली पाहिजे. त्याने जर आरडाओरडा केला तर आपण जरा शांत राहून 'समभावाने निकाल' करावा. कधी ना कधी तर त्याचा निकाल करावाच लागेल ना? अबोला धरल्याने काय त्याचा निकाल झाला? निकाल होत नाही, म्हणून तर अबोला धरतात. अबोला म्हणजे ओझे, ज्याचा निकाल झाला नाही त्याचे ओझे. आपण तर लगेच त्याला थांबवून सांगायचे 'थांबा ना जरा, माझी काही चूक झाली असेल तर मला सांगा, माझ्या खूप चुका होतात. तुम्ही तर खूप हुशार आहात, सुशिक्षीत आहात म्हणून तुमची चूक होत नाही पण मी कमी शिकलेला, म्हणून माझ्या तर खूप चुका होतात.' असे म्हटले की तो खुष होऊन जाईल. प्रश्नकर्ता : असे म्हटल्यानेही तो नरम पडला नाही, तर काय करावे? दादाश्री : नरम पडला नाही तर आपण काय करावे? आपण सांगून मोकळे व्हावे. मग दुसरा काय उपाय? कधी ना कधी तर नरम पडेल, ओरडून नरम करायला गेलो तर तो काही नरम होणार नाही. आज नरम दिसेल, पण तो मनात नोंद करून ठेवतो आणि जेव्हा आम्ही नरम Page #65 -------------------------------------------------------------------------- ________________ ५४ वाणी, व्यवहारात... पडू तेव्हा मग तो सर्व उकरून काढतो. म्हणजे हे जग वैऱ्यांचे आहे. निसर्गाचा नियम असा आहे की प्रत्येक जीव आत वैर भाव ठेवतातच. आत परमाणू साठवून ठेवतात. म्हणून त्या केसचा आपण पूर्णपणे निकाल लावला पाहिजे. प्रश्नकर्ता : आपण समोरच्याला अबोला तोडण्यासाठी जर असे म्हटले की माझी चूक झाली, आता मी माफी मागतो, तरीही तो आखडून बसला असेल तर काय करावे? दादाश्री : तर आपण सांगणे सोडावे. त्याचा स्वभाव वाकडा आहे असे समजून आपण बंद करायचे. त्याला असे काही चुकीचे ज्ञान प्राप्त झाले असेल की 'बहुत नमे नादान' तिथे मग दूरच राहिले पाहिजे. नंतर जो हिशोब होईल, तो खरा. पण जी माणसं सरळ असतील ना, तिथे तर समाधान आणून टाकावे. घरात कोण कोण सरळ आहेत आणि कोण कोण वाकडे आहेत, हे आपल्याला समजत नाही का? प्रश्नकर्ता : समोरचा सरळ नसेल तर आपण त्याच्याशी व्यवहार तोडून टाकावा? दादाश्री : तोडू नये. व्यवहार तोडल्याने तुटत नाही. व्यवहार तोडल्याने तुटेल असे नाहीच. म्हणून आपण तेथे मौन राहावे की एखाद्या दिवशी तो चिडेल म्हणजे आपला हिशोब संपेल, आपण मौन राहिलो की मग एखाद्या दिवशी तो चिडेल आणि तो स्वत:च बोलेल की 'तुम्ही बोलत का नाही, किती दिवसांपासून मुके फिरत आहात!' असा चिडला म्हणजे मग आपला हिशोब संपला. आणखी काय मग? हे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंड असतात, आम्ही सर्वांना ओळखतो. कित्येकांना खूप गरम केले तर वळतात. कित्येकांना भट्टीत ठेवावे लागते, नंतर पटकन दोन हातोडे मारल्याबरोबर सरळ होतात. हे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंड आहेत! यात आत्मा हा आत्मा आहे, परमात्मा आहे आणि लोखंड हे लोखंड आहे, हे सर्व दुसरे धातू आहेत. __ तुम्ही एकदा तरी सांगून पाहा की 'देवी' आज तर तुम्ही खूप छान जेवू घातले,' इतके बोलून तर बघा. Page #66 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : खुष, खुष! दादाश्री : खुष, खुष होऊन जाईल. पण असे तर बोलतच नाहीत. जणू काही वाणी विकत आणावी लागते व असे वागतात! वाणी विकत आणावी लागते का? प्रश्नकर्ता : नाही, पण मग नवरेपणा राहणार नाही ना तिथे. दादाश्री : म्हणे नवरेपणा राहणार नाही, नवरेपणा!! ओहोहो! मोठा नवरा होऊन बसलाय!! आणि तेही परत अनसर्टिफाईड नवरा, सर्टिफीकेट घेऊन आला असता तर ठीक आहे !! ___ पत्नी आणि तिचा पती, दोघेही जेव्हा शेजाऱ्यांशी भांडतात तेव्हा कसे अभेद होऊन भांडतात? दोघे मिळून असे हात करून भांडतात की, 'तुम्ही असे आणि तुम्ही तसे.' दोघे एक होऊन असे असे हात करतात. तेव्हा तर आपल्याला वाटते की ओहोहो! या दोघांमध्ये केवढी एकता!! हे कॉर्पोरेशन तर अभेद आहे, असे वाटते. आणि नंतर जेव्हा घरात शिरल्यावर दोघे भांडतात तेव्हा काय म्हणतील? घरी ते भांडतात की नाही भांडत? कधीतरी तर भांडतात ना? हे कॉर्पोरेशन आपसात जेव्हा भांडतात ना, 'तू अशी आणि तुम्ही असे, तू अशी आणि तुम्ही असे....' मग घरात भांडण जुंपते तेव्हा म्हणतो, 'तू जा इथून, माहेरी जा, मला तू नकोच.' असे म्हणेल! आता ही चुकीची समज नाही का? तुम्हाला काय वाटते? ते दोघेही अभेद होते ती अभेदता तुटली आणि भेद उत्पन्न झाला म्हणून पत्नीसोबतही 'माझे-तुझे' होऊन जाते 'तू अशी आहेस आणि तू तशी आहेस!' तेव्हा तीही म्हणेल, 'तुम्ही तरी कुठे सरळ आहात?' म्हणजे घरात सुद्धा 'मी आणि तू' असे होत असते. कुटुंबातील सदस्याचा जर असा हात लागला तर आपण त्यांच्याशी भांडतो का? नाही. एक फॅमिली प्रमाणे राहावे. बनावट करायची नाही. हे तर बनावट करतात लोक. असे करू नये. एक फॅमिली... तुझ्याशिवाय मला करमत नाही असे सांगावे, ती जरी आपल्यावर रागावली ना तरी सुद्धा, नंतर थोड्यावेळाने तिला सांगावे 'तू वाटेल तेवढी रागावलीस पण Page #67 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... तरी तुझ्याशिवाय मला करमत नाही.' असे सांगायचे. एवढा गुरुमंत्र बोलावा. असे तर कधी बोलतच नाही, असे बोलायला काय हरकत आहे तुम्हाला? मनात तर प्रेम असतेच, पण ते थोडे व्यक्त पण करावे. म्हणजे, आमचा सर्व ड्रामा (नाटक)च असतो. हीराबा (दादाश्रींच्या धर्मपत्नी) ७३ वर्षांच्या, तरी देखील त्या मला म्हणतात, 'तुम्ही लवकर परत या.' तेव्हा मी म्हणतो, मला सुद्धा तुमच्या शिवाय करमत नाही! असा ड्रामा केला तर त्यांना किती आनंद होईल. 'लवकर या, लवकर या' असे त्या सांगतात. ही त्यांची भावना आहे म्हणूनच सांगतात ना! म्हणून आम्ही सुद्धा असे बोलतो. बोलणे हितकारी असले पाहिजे. बोललेले शब्द जर समोरच्यासाठी हितकारी नसतील तर आपण बोललेले काय कामाचे? एक तास जरी नोकराला, मुलाला किंवा बायकोला दटावले तर ते मग नवरा बनून किंवा सासू बनून तुम्हाला आयुष्यभर तुडवत राहतील! न्याय तर हवा की नको? यालाच भोगणे म्हणतात. तुम्ही जर कोणाला दुःख दिले तर तो आयुष्यभरासाठी तुम्हाला दुःख देईल. एकच तास दुःख दिले तरी त्याचे फळ आयुष्यभर मिळेल. मग ओरडत राहा की 'बायको माझ्याशी अशी का वागते?' बायकोला असे वाटते की, 'ह्या नवऱ्यासोबत माझ्याकडून असे का वागले जाते?' तिला पण दुःख होते, पण काय करणार? नंतर मी त्यांना विचारले की, 'बायकोने तुम्हाला शोधून आणले होते की तुम्ही बायकोला शोधून आणले होते!' तेव्हा तो म्हणतो की, 'मी शोधून आणले होते.' तेव्हा त्या बिचारीचा काय दोष? घेऊन आल्यानंतर खराब निघाले, त्यात ती काय करेल, कुठे जाणार मग? जगात कोणाला काहीही, एक अक्षरही सांगण्यासारखे नाही. सांगणे, हा रोग आहे एक प्रकारचा! सांगायचे झाले ना तर तो सर्वात मोठा रोग आहे! सर्व आपापला हिशोब घेऊन आलेले आहेत. मग ही दखल करायची गरजच काय? एक अक्षर सुद्धा बोलण्याचे बंद करून टाका. आणि म्हणूनच आम्ही हे 'व्यवस्थित शक्ति'चे ज्ञान दिले आहे. म्हणजे जगात एकच गोष्ट करण्यासारखी आहे. कोणालाही काही Page #68 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात.... बोलायचे नाही. जे काही असेल ते निवांतपणे खाऊन घ्यायचे आणि निघून जावे आपापल्या कामावर, काम करीत राहायचे. बोलायचे वगैरे नाही. तू काही बोलत तर नाही ना मुलांना, नवऱ्याला ? बोलायचे कमी केलेले चांगले. कुणाला काहीही सांगण्यासारखे नाही, सांगितल्याने जास्त बिघडते. त्याला सांगितले की, 'गाडीवर लवकर पोहोच, तर तो उशीरा जाणार आणि काही सांगितले नाही तर वेळेवर जाणार. आपण नसलो तरी सर्वकाही चालेल असे आहे. हा तर स्वत:चा खोटा अहंकार आहे. ज्या दिवसापासून तुम्ही मुलांसोबत कटकट करायची बंद कराल त्या दिवसापासून मुले सुधारतील. तुमचे शब्द चांगले निघत नाहीत, त्यामुळे समोरचा घुसमटतो. तुमचे बोल तो स्वीकारत नाही, उलट ते शब्द परत येतात. आपण तर मुलांना चांगले खायला, प्यायला सर्व बनवून द्यायचे आणि आपले कर्तव्य बजावायचे, दुसरे काही बोलण्यासारखे नाही. सांगण्यात फायदा नाही, असा निष्कर्ष तुम्ही काढला आहे ? प्रश्नकर्ता : मुले त्यांची जबाबदारी समजून वागत नाहीत. दादाश्री : जबाबदारी ' व्यवस्थित शक्ति'ची आहे, तो तर त्याची जबाबदारी समजूनच आहे. त्याच्याशी बोलणे तुम्हाला जमत नाही. त्यामुळे ढवळाढवळ होते. समोरचा ऐकेल तेव्हाच आपल्या सांगण्याला अर्थ आहे. हे तर आई-वडील वेड्यासारखे बोलतात, मग मुले पण वेडेपणा करतात. प्रश्नकर्ता: मुले उद्धटपणे बोलतात. दादाश्री : हो, पण हे तुम्ही कसे थांबविणार ? हे तर जेव्हा समोरासमोर बंद होईल तेव्हा सर्वांचे चांगले होईल. एकदा जर का मनात विरोधी भाव निर्माण झाला की मग त्याची लिंक चालू होते, मनात मग त्याच्यासाठी ग्रह बांधला जातो की हा माणूस असाच आहे. तेव्हा आपण मौन राहून समोरच्याला विश्वासात घेतले पाहिजे. बोलत राहिल्याने कुणाचेही सुधारत नाही! सुधारायचे असेल तर 'ज्ञानी पुरुषा'च्या वाणीने सुधारेल. मुलांसाठी तर आई - वडिलांची जोखिमदारी आहे. आपण बोललो नाही तर चालणार नाही का ? चालेल. Page #69 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... म्हणून भगवंतांनी सांगितले आहे की जिवंतपणीच मेल्यासारखे राहा. बिघडलेले सुधारु शकतो. बिघडलेल्याला सुधारणे हे 'आमच्याने' होऊ शकते, तुम्ही ते करायचे नाही. तुम्हाला आमच्या आज्ञेनुसार चालायचे. जो स्वतः सुधारला असेल तोच दुसऱ्यांना सुधारु शकेल. स्वत:च सुधारलेला नसेल तो दुसऱ्याला कसा सुधारु शकेल? प्रश्नकर्ता : सुधारलेल्याची व्याख्या काय? दादाश्री : समोरच्या व्यक्तिला तुम्ही रागावले तरी त्याला त्यात प्रेम दिसून येईल. तुम्ही ठपका दिला तरी त्याला तुमच्यात प्रेम दिसेल की 'ओहोहो! माझ्या वडिलांचे माझ्यावर केवढे प्रेम आहे !' ठपका द्या, पण प्रेमाने द्या, तर सुधारेल. या कॉलेजात जर प्रोफेसर ठपका द्यायला गेले तर प्रोफेसरांना सगळे मारतील! समोरचा सुधारावा यासाठी आपले प्रयत्न असायला पाहिजेत, पण जे प्रयत्न 'रिअॅक्शनरी' असतील अशा प्रयत्नात पडू नये. आपण त्याला रागावले आणि त्याला वाईट वाटले त्यास प्रयत्न म्हणत नाही. प्रयत्न आतून करायला हवेत. सूक्ष्मरित्या ! स्थूलरित्या जर आपल्याला जमत नसेल तर सूक्ष्मरित्या प्रयत्न करायला हवेत. जास्त ठपका द्यायचा नसेल तर थोडक्यात सांगायचे की, 'आपल्याला हे शोभत नाही.' बस इतकेच सांगून बंद करावे. सांगावे तर लागते पण सांगण्याची पद्धत असते. स्वतः सुधारले नाही आणि लोकांना सुधारण्यास गेले, त्यामुळे तर लोक उलट बिघडले. सुधारण्यास गेलो की बिघडतातच. स्वतःच बिघडलेला असेल तर काय होईल? स्वतः सुधारणे अगदीच सोपे आहे. आपण स्वतः सुधारलेले नसू आणि दुसऱ्याला सुधारण्यास गेलो तर हे निरर्थक आहे. रागावल्यामुळे माणूस खरे सांगत नाही आणि कपट करतो. हे सर्व कपट रागावल्यामुळेच जगात उभे राहिले आहे. रागावणे हा सर्वात मोठा अहंकार आहे, वेडा अहंकार आहे. रागावणे केव्हा उपयोगी ठरेल? पूर्वग्रह न ठेवता रागावले तेव्हाच. Page #70 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात.... कुठेतरी चांगली वाणी बोलत असाल ना ? की नाही बोलत ? कोठे बोलत असाल? तर ज्यांना बॉस (मालक) मानता, त्या बॉसबरोबर चांगली वाणी बोलता आणि अन्डरहॅन्डला ( नोकराला) झिडकारता. दिवसभर 'तू असे केले, तू तसे केले', असेच ओरडत राहता. तर यात वाणी संपूर्णपणे बिघडून जाते. अहंकार आहे त्याच्या मागे. या जगात काहीच बोलण्यासारखे नाही. आपण जे बोलत असतो, तो अहंकार आहे. संपूर्ण जग नियंत्रणवाले आहे. ५९ 10. वाढवा 'रोपटी' अशाप्रकारे बागेत..... एका बँकेचे मॅनेजर मला सांगत होते, दादाजी, मी तर कधीही बायकोला, मुलाला किंवा मुलीला एक अक्षरही बोललो नाही. वाटेल त्या चुका केल्या असतील, वाटेल तसे वागत असतील तरीही मी त्यांना काहीच बोलत नाही. त्याला असे वाटले की दादाजी मला छान पगडी घालतील! तो काय आशा ठेवत होता, हे तुम्हाला समजले ना ?! पण मला तर त्याच्यावर खूप राग आला की तुम्हाला कोणी बँकेचे मॅनेजर बनवले? तुम्हाला मुलांना सांभाळता येत नाही आणि बायकोलाही सांभाळता येत नाही ! तो तर घाबरुनच गेला बिचारा. मी त्याला सांगितले, 'तुम्ही अगदीच टोकाचे बेकार माणूस आहात. या जगात तुम्ही काहीच कामाचे नाहीत.' त्या माणसाला तर असे वाटलेले की असे सांगितल्यावर 'दादा' मला मोठे बक्षीस देतील. अरे! वेड्या, याचे बक्षीस असते का ? मुलगा चुकीचे वागत असेल, तेव्हा त्याला आपण 'का असे केले ? आता असे करू नकोस.' असे नाटकीय बोलावे. नाहीतर मुलगा असेच समजेल की तो जे काही करत आहे ते ‘करेक्टच' आहे. कारण की बापाने 'एक्सेप्ट' (मान्य) केले आहे. पुष्कळ लोक मुलांना म्हणतात, 'मी सांगितलेले तू ऐकत नाहीस.' मी म्हटले, 'त्याला तुमची वाणी आवडत नाही. आवडली असती तर त्याचा परिणाम झालाच असता.' आणि तो बाप म्हणतो, 'तू माझे सांगितलेले ऐकत नाहीस.' अरे मूर्खा, तुला बाप होता आले नाही. या Page #71 -------------------------------------------------------------------------- ________________ ६० वाणी, व्यवहारात... कलियुगात हाल तर बघा लोकांचे! नाहीतर सत्युगात तर कसे आई-वडील होते! एक माणूस मला एकोणीसशे बावन्नपासून असे सांगत होता की 'हे गवर्मेन्ट खराब आहे आणि ते जायलाच पाहिजे.' असे एकोणीसशे बावन्नपासून ते बासष्ठपर्यंत बोलत राहिला. मग एकदा मी त्यांना सांगितले की, 'रोज तुम्ही मला ही गोष्ट सांगता, पण तेथे काही बदल होतो का? हे तुमचे बोललेले तेथे काही फळते का? तेव्हा तो म्हणतो, 'नाही. फळले तर नाही.' तेव्हा मी सांगितले, 'मग कशासाठी बोलत राहता? तुमच्यापेक्षा तर रेडिओ बरा.' आपण बोललेले फळत नसेल तर आपण गप्प राहायला पाहिजे. आपणच मूर्ख आहोत, आपल्याला बोलता येत नाही, म्हणून गप्प बसायला पाहिजे. आपले बोललेले फळत नाही आणि उलट आपले मन बिघडते, आपला आत्मा बिघडतो. असे कोण करेल? प्रश्नकर्ता : मुलगा वडिलांचे ऐकत नसेल तर काय करावे? दादाश्री : 'आपली चूक आहे' असे समजून सोडून द्यायचे! आपली चूक असेल तेव्हाच ऐकत नाही ना! ज्याला बाप होता आले, त्याचा मुलगा त्याचे ऐकणार नाही असे कधी होईल का?! पण बाप होता येतच नाही ना! प्रश्नकर्ता : एकदा बाप झाल्यानंतर पिल्ले त्याला सोडतील का? दादाश्री : सोडतील का? पिल्लं तर आयुष्यभर डॉग आणि डॉगिनला, (कुत्रा आणि कुत्रीला) दोघांना बघतच राहतात, की हा भुंकत राहतो आणि ही चावा घेत राहते. कुत्रा भुंकल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी दोष तर त्या कुत्र्याचाच निघतो. मुले तर आईचीच बाजू घेतात. म्हणून मी एका माणसाला सांगितले होते, 'ही मुले मोठी झाल्यावर तुला मारतील. म्हणून तू बायकोशी नीट वाग!' ही मुले तर त्यावेळी बघतच राहतात, जोपर्यंत त्यांचे पाय पोहचत नाहीत तोपर्यंत, आणि एकदा का त्यांचे पाय पोहोचले की मग खोलीत कोंडून मारतील. असे घडलेही आहे Page #72 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात.... ६१ लोकांसोबत! मुलांनी त्या दिवसापासून नियाणां - (स्वतःचे सर्व पुण्य लावून एखाद्या वस्तुची कामना करणे) केलेला असतो की मोठा झाल्यावर मी बापाला मारेन ! माझे सर्वस्व जावो पण हे कार्य व्हावे, यास म्हणतात नियाणां. हेही समजण्यासारखे आहे ना ? प्रश्नकर्ता : म्हणजे सर्व दोष बापाचाच ? दादाश्री : बापाचाच! बापाचाच दोष आहे. बापात बाप व्हायची लायकी नसेल तेव्हा बायको त्याच्या विरुद्ध होते. बापात लायकी नसेल तेव्हाच तर असे घडते ना ! मारुन - ठोकून गाडी खेचतो. कुठपर्यंत समाजाला घाबरत राहणार. ही मुले आरसा आहेत. मुलांवरुन कळते की आपल्यात किती चुका आहेत ! प्रश्नकर्ता : मौनव्रत घेतले तर कसे ? मौन धारण केले तर, बोलायचेच नाही. दादाश्री : पण ते मौन आपल्या हातची गोष्ट नाही ना. मौन राहणे आपल्या आवाक्यात नाही. मौन राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुकीचे वागत असेल तर त्याला टोकावे लागते. ज्यामुळे त्याला दु:खही होते. तर त्याचा निकाल कसा करावा ? दादाश्री : टोकण्यास हरकत नाही, पण ते आपल्याला जमले पाहिजे. सांगता तर आले पाहिजे ना, काय ? प्रश्नकर्ता : ते कशा प्रकारे ? दादाश्री : मुलाला म्हटले, की 'तुला अक्कल नाही, गाढव आहेस.' असे बोलले तर काय होईल ! त्यालाही अहंकार तर असतो की नाही ? तुम्हालाच तुमच्या बॉसने म्हटले की 'तुम्हाला अक्क्ल नाही, गाढव आहात तुम्ही.' असे म्हटले तर काय होईल ? असे म्हणू नये. टोकता आले पाहिजे. Page #73 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : कशा प्रकारे टोकायचे? दादाश्री : त्याला बसवावे. मग म्हणावे, आपण हिंदस्तानातील लोक, आर्य प्रजा आहे आपली, आपण अनाडी नाही आहोत, आपण असे वागू नये. असे तसे सर्व समजावून प्रेमाने सांगायचे, तेव्हा मग तो मार्गावर येईल. नाहीतर तुम्ही मारपीट करून, लेफ्ट एन्ड राइट, लेफ्ट एन्ड राइट घ्याल, तर ते चालेल का? प्रश्नकर्ता : येथील मुले वादविवाद खूप करतात. आर्युमेन्ट खूप करतात. हे तुम्ही कसले लेक्चर देत आहात, असे म्हणतात? दादाश्री : वादविवाद खूप करतात, पण तरीही प्रेमाने शिकवाल तर वादविवाद कमी होत जातील. वादविवाद हे तुमचे रिअॅक्शन आहे. आतापर्यंत तुम्ही त्याला तुमच्या धाकात ठेवले आहे ना, ते अजून त्याच्या डोक्यातून जात नाही, पुसलेच जात नाही. म्हणून तो असा वादविवाद करतो. माझ्यासोबत एकही मुलगा वादविवाद करत नाही. कारण मी खऱ्या प्रेमाने तुम्हा सर्वांसोबत बोलत असतो. ___ माझा आवाज सत्तावादी नसतो. म्हणजे सत्ता नसावी. मुलांना जेव्हा तुम्ही काही सांगता तेव्हा सत्तावादी आवाज नसावा. म्हणून तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे थोडा प्रयोग करा ना. प्रश्नकर्ता : कसा करावा? दादाश्री : प्रेमाने बोला ना.. प्रश्नकर्ता : त्याला माहितच आहे की माझे त्याच्यावर प्रेम आहे. दादाश्री : असे प्रेम कामाचे नाही. कारण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा कलेक्टर सारखे बोलता. 'तुम्ही असे करा, तुमच्यात अक्कल नाही, असे-तसे.' असेही म्हणता ना? नेहमी, प्रेमानेच जग सुधारते. त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. जर धाकाने सुधारत असेल, तर हे सरकार लोकशाही उडवून टाकेल आणि जो कुणी गुन्हा करेल त्याला तुरुंगात टाकून फाशी देईल. Page #74 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : तरीसुद्धा मुले उद्धटपणे वागत असतील तर काय करावे? दादाश्री : मुले चुकीच्या मार्गावर गेली, तरीही आपण त्यांना पाहात राहायचे आणि जाणत राहायचे. आणि मनात भाव नक्की करावा, आणि परमेश्वराला प्रार्थना करावी की याच्यावर कृपा करा. ____ 'रिलेटिव' समजून औपचारिक राहायचे! मुलांना तर नऊ महिने पोटात ठेवायचे. नंतर चालवायचे, फिरवायचे, लहान असतील तोपर्यंत. नंतर सोडून द्यायचे. ह्या गायी-म्हशी सुद्धा सोडूनच देतात ना? मुलाला पाच वर्षापर्यंत टोकावे लागते, नंतर टोकायचेही नाही आणि वीस वर्षानंतर तर त्याची बायकोच त्याला सुधारेल. आपण सुधारायचे नसते. प्रश्नकर्ता : मुलांना काही सांगण्यासारखे वाटले तर मी त्यांच्यावर रागावतो, त्यामुळे त्यांना दु:ख पण होते तर काय करावे? दादाश्री : नंतर आपण मनात माफी मागून घ्यावी. ह्या मुलीला काही जास्तीचे बोलले गेले असेल आणि तिला दु:ख झाले असेल तर तुम्ही तिला म्हणायचे की, मी माफी मागतो. आणि जर असे सांगण्यासारखे नसेल तर अतिक्रमण केले म्हणजे आतून तुम्ही प्रतिक्रमण करा. प्रश्नकर्ता : मुलांबरोबर मुल होऊन जायचे आणि त्याप्रमाणे वागायचे तर ते कशा प्रकारे? दादाश्री : सध्या तुम्ही मुलांबरोबर मुलांसारखे वागता का? आपण मोठे असू तर त्याला त्याची भीती वाटत राहते. तेव्हा भीती वाटणार नाही अशा प्रकारे आपण वागायला हवे. आपण त्याला समजावून त्याचा दोष काढला पाहिजे, भीती दाखवून दोष काढायचा नाही. भीती दाखवल्याने काम होत नाही. तुम्ही वयाने मोठे, तो वयाने लहान, घाबरुन जातो बिचारा! पण त्यामुळे दोष काही जात नाही, दोष तर आत वाढतच राहतो. पण जर तो दोष समजावून काढला तर जातो, अन्यथा जातच नाही. प्रश्नकर्ता : असेच घडते, हा तर माझा स्वत:चाच अनुभव आहे Page #75 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४ वाणी, व्यवहारात... तोच मी सांगतो, माझा जो प्रश्न आहे तीच ही गोष्ट आहे. हा माझा स्वतःचाच प्रश्न आहे आणि पुन्हा पुन्हा माझ्याकडून असेच घडते. दादाश्री : हो, म्हणूनच मी हे उदाहरण देतो की, तुमचा मुलगा बारा वर्षाचा असेल, तुम्ही त्याच्याशी सर्वकाही बोलता, पण त्या सर्व बोलण्यात काही गोष्टी त्याला समजतील आणि काही गोष्टी समजणार नाहीत. तुम्ही काय सांगू इच्छिता ते त्याला समजत नाही. तुमचा व्हयू पॉइंट (दृष्टीकोन) काय आहे ते त्याला समजत नाही, म्हणून तुम्ही शांतपणे हळूवार सांगायचे की, माझा हेतू असा आहे, माझा व्हयू पॉइंट असा आहे. मी असे सांगू इच्छितो. हे तुला समजले की नाही ते तू मला सांग. आणि जर तुझी गोष्ट मला नाही समजली, तर मी ते समजण्याचा प्रयत्न करीन, असे त्याला सांगावे. म्हणून तर आपल्या लोकांनी सांगितले, की भाऊ, काही वर्षांनंतर, सोळा वर्षांनंतर मुलांना मित्र म्हणून स्वीकारा, असे सांगितले आहे, नाही का? फ्रेंडली टोनमध्ये असेल तर आपला टोन चांगला निघतो. नाहीतर रोज बाप व्हायला गेलो, तर काही भलं होत नाही. मुलगा चाळीस वर्षांचा झाला असेल आणि आपण बाप बनून फिरलो, तर काय होईल? प्रश्नकर्ता : मुलगा वाईट शब्द बोलला असेल, आपल्या समोर ताठ झाला असेल, ते जर मनात नोंदून ठेवले, तर त्या अभिप्रायामुळे लौकिक वर्तनात गाठ पडते. तर त्यामुळे सामान्य व्यवहारात गुंतागुंत नाही का होणार? दादाश्री : नोंदच या दुनियेत व्यर्थ आहे. नोंदीमुळेच या जगात नुकसान होते. आपल्याला कोणी खूप मान दिला त्याची नोंद ठेवायची नाही आणि कोणी शिव्या दिल्या, की 'तुम्ही नालायक आहात, अनफीट आहात.' असे ऐकल्यावर सुद्धा नोंद ठेवायची नाही. त्यांना नोंद ठेवायची असेल तर ठेवू द्या. पण आपण हा मनस्ताप का करून घ्यावा? वही-खाते बनवून परत नोंदी ठेवत राहतो!! सुनेला वाटते की सासरे दुसऱ्या खोलीत बसले आहेत. म्हणून सून Page #76 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात.... ६५ दुसऱ्यांसोबत बोलताना सांगते, 'सासऱ्यात जरा अक्कल कमी आहे.' आता त्यावेळी आपण तेथे उभे असू आणि ते जर आपण ऐकले, तर आपल्या आत तो रोग शिरला. म्हणून तेथे आपण असा हिशोब काढायचा, की जर आपण दुसऱ्या खोलीत बसलो असतो तर काय झाले असते ? तर कोणताच रोग उत्पन्न झाला नसता. म्हणजे येथे आलो तीच आपली चूक, त्याचाच हा रोग आहे! आपण ती चूक संपवून टाकायची. तुम्ही असे समजा ना की, मी दुसऱ्या खोलीतच बसलो होतो, आणि हे मी ऐकलेच नाही असे करून ती चूक संपवून टाकावी. आपला मुलगा मोठा झाला असेल आणि आपल्याला उलट उत्तर देत असेल तर समजायचे की हे आपले 'थर्मामीटर' आहे. तुमच्यात धर्म किती परिणमित झाला आहे, हे जाणण्यासाठी 'थर्मामीटर' कोठून आणायचे? घरातच ' थर्मामीटर' मिळाले तर बाहेरुन विकत आणायला जावे लागत नाही ! मुलाने आपल्याला थोबाडीत मारली, तरीही आपल्याला कषाय उत्पन्न होत नसेल, तेव्हा समजायचे की आता आम्ही मोक्षाला जाणार आहोत. दोन-तीन थोबाडीत मारल्या तरीही कषाय उत्पन्न होत नसतील, तेव्हा समजून जायचे की हा मुलगाच आपला थर्मामीटर आहे. असे दुसरे थर्मामीटर आणायचे तरी कुठून ? दुसरा तर कोणी मारत नाही. म्हणून हाच थर्मामीटर आहे आपला. हे तर नाटक आहे! नाटकात बायका-मुलांना नेहमीसाठी स्वतःचे करून घेतले तर चालेल का ? नाटकात बोलतो तसे बोलण्यास हरकत नाही, की 'हा माझा मोठा मुलगा, शतायु हो !' पण सर्व वरकरणी, 'सुपरफ्लुअस', नाटकीय. ह्या सर्वांना खरे मानले त्याचेच प्रतिक्रमण करावे लागते. खरे मानले नसते तर प्रतिक्रमण करावे लागले नसते. जिथे सत्य आहे असे मानण्यात आले तिथे राग आणि द्वेष सुरु होऊन जातात आणि प्रतिक्रमणानेच मोक्ष आहे. 'दादा' दाखवतात त्या आलोचना - प्रतिक्रमणप्रत्याख्यानाने मोक्ष आहे. एकदा एका माणसासोबत माझे डोके जरा तापले होते, रस्त्यात मी Page #77 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... त्याला रागवत होतो. तेव्हा लोक तर मला टोकणारच ना, की अशा भर बाजारात तुमच्याकडून भांडण कसे होऊ शकते? म्हणून मी तर थंड पडलो की माझी काय चूक झाली? तो तिरसटपणे बोलला म्हणून मी रागावलो यात काय मोठी चूक झाली? मग मी त्यांना सांगितले की हा वाईट बोलत होता त्यामुळे मला थोडे रागवावे लागले. त्यावर ते म्हणाले की तो जरी वाईट बोलला तरी सुद्धा तुम्ही रागवायला नको. ह्या संडासातून दुर्गंध येत असेल म्हणून संडासाच्या दरवाज्याला लाथा मारत राहिल्याने ते कधी सुगंधी बनेल का? यात कोणाचे नुकसान झाले? त्याचा स्वभावच दुर्गंध पसरवण्याचा आहे. त्या दिवशी मला ज्ञान झालेले नव्हते. त्या भाऊने मला असे सांगितले, तेव्हा मी तर कानच पकडले. मला छान उदाहरण दिले की संडास कधी सुधारेल का? __ 11. थट्टा-मस्करीची जोखिमदारी... प्रश्नकर्ता : वचनबळ कशा प्रकारे उत्पन्न होते? दादाश्री : एक पण शब्द थट्टा-मस्करीसाठी वापरला नसेल, एक शब्द पण खोट्या स्वार्थासाठी किंवा हिसकावून घेण्यासाठी वापरलेला नसेल, शब्दाचा दुरुपयोग केला नसेल, स्वतःचा मान वाढेल यासाठी वाणी वापरली नसेल, तेव्हा वचनबळ उत्पन्न होते. ___प्रश्नकर्ता : स्वत:च्या मानासाठी आणि स्वार्थासाठी हे बरोबर आहे परंतु थट्टा-मस्करी केली, तर त्यात काय हरकत आहे? दादाश्री : थट्टा-मस्करी करणे खूप चुकीचे आहे. त्या ऐवजी त्याला मान दिलेला चांगला! मस्करी तर भगवंताची झाली असे म्हटले जाईल! तुम्हाला असे वाटते की हा माणूस गाढवासारखा आहे 'आफ्टर ऑल' तो काय आहे, याचा शोध घ्या!! 'आफ्टर ऑल' तर तो भगवंतच आहे ना! मला मस्करीची खूप सवय होती. मस्करी म्हणजे कशी की जास्त नुकसान करणारी नाही, पण तरी समोरच्या व्यक्तिच्या मनावर परिणाम तर होतोच ना! आपली बुद्धी जास्त वाढलेली असेल, त्याचा दुरुपयोग Page #78 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात... ___६७ कशात होतो? कमी बुद्धी असलेल्याची मस्करी करण्यात! हे जोखिम जेव्हापासून मला समजले, तेव्हापासून मस्करी करणे बंद झाले. मस्करी करायची असते का? मस्करी हे तर भयंकर जोखिम आहे, गुन्हा आहे! मस्करी तर कोणाचीही करू नये. पण तरी अशी मस्करी करण्यास हरकत नाही की ज्यामुळे कोणाला दु:ख होणार नाही आणि सर्वांना आनंद होईल. त्याला निर्दोष गंमत म्हटली जाते. तशी मस्करी तर आम्ही आजसुद्धा करत असतो, कारण मूळ जात नाही ना! पण त्यात मात्र निर्दोषताच असते! आम्ही 'जोक' (विनोद) करतो, पण निर्दोष 'जोक' करतो. आम्ही त्याचा रोग काढतो आणि त्याला शक्तिवंत बनविण्यासाठी 'जोक' करतो, थोडी गंमत वाटते, आनंद होतो, आणि तो पुढे प्रगतिही करत जातो. बाकी तो 'जोक' कोणाला दुःख देत नाही. अशी गंमत हवी की नको? तो देखील समजतो की हे गंमत करत आहेत, मस्करी नाही. आता आम्ही जर कोणाची गंमत केली, तर त्याचेही आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते. आम्हाला सुद्धा प्रतिक्रमण केल्याशिवाय चालेल असे नाही. बाकी, मी तर सर्व प्रकारची मस्करी केली होती. सर्व प्रकारची मस्करी कोण करतो? ज्याचा खूप टाईट ब्रेन असेल तो करतो. मी तर लहरीने मस्करी करीत होतो सर्वांचीच, चांगल्या चांगल्या माणसांची, मोठ-मोठ्या वकिलांची, डॉक्टरांची मस्करी करायचो. आता हा अहंकार तर चुकीचाच आहे ना! हा आपल्या बुद्धिचा दुरुपयोग केला ना! मस्करी करणे ही बुद्धिची निशाणी आहे. प्रश्नकर्ता : मला तर अजूनही मस्करी करण्याचे मन होते. दादाश्री : मस्करी करण्यात खूप जोखिम आहे. बुद्धिमुळे मस्करी करण्याची शक्ति असतेच आणि त्याची जोखिमही तेवढी असते. म्हणजे आम्ही संपूर्ण जीवन जोखिम ओढवून घेतलेली, जोखिमच ओढवून घेत होतो. Page #79 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८ वाणी, व्यवहारात... प्रश्नकर्ता : मस्करी करण्यात कोणकोणत्या जोखिम आहेत? कोणत्या प्रकारचे जोखिम आहेत? दादाश्री : असे आहे ना, की कोणाला चापट मारली आणि त्याचे जे जोखिम असते त्याहीपेक्षा या मस्करीत अनंत पटीने जोखिम आहे. त्याला बुद्धी कमी आहे म्हणून तुम्ही तुमच्या लाईटने (अधिक बुद्धिने) त्याला ताब्यात घेतले. तेव्हा मग तेथे भगवंत म्हणतील, 'याला बुद्धी नाही, त्याचा हा फायदा घेतो?' तेथे प्रत्यक्ष भगवंतालाच तुम्ही प्रतिपक्षी बनवले. तुम्ही त्याच्या थोबाडीत मारले तर ते त्याला समजले असते म्हणून तो स्वतःच मालक झाला असता. पण ही तर त्याची बुद्धी पोहचतच नाही, म्हणून आपण त्याची मस्करी करतो, तेव्हा तो स्वतः मालक होत नाही. परंतु भगवंत ओळखतात की 'ओहोहो, ह्याला बुद्धी कमी आहे, म्हणून तू तावडीत घेतोस?! तर घे आता.' त्याच्या जागी मग भगवंतच प्रतिपक्षी बनतात, तेव्हा मग तुम्ही खूप अडचणीत याल.. 12. सुमधुर वाणीच्या कारणांचे असे करा सेवन प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्यानंतर आमची वाणी खूपच चांगली होईल का, याच जन्मात? दादाश्री : त्यानंतर तर काही वेगळ्याच प्रकारची असेल. आमची वाणी सर्वोत्कृष्ट श्रेणीची निघते, त्याचे कारणच प्रतिक्रमण आहे. व्यवहार शुद्धीशिवाय स्यावाद वाणी निघत नाही. आधी व्यवहार-शुद्धी झाली पाहिजे. प्रश्नकर्ता : वाणी बोलताना कशी जागृती ठेवली पाहिजे? दादाश्री : जागृती अशी ठेवायची की ही वाणी बोलताना कोणा कोणाचे प्रमाण कशा प्रकारे खंडित होत आहे, हे पाहायचे. प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तिबरोबर बोलताना कोणती काळजी घ्यायला हवी? दादाश्री : एकतर 'त्यांच्या बरोबर बोलायचे असेल तर तुम्हाला Page #80 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात.... त्यांच्या ‘शुद्धात्म्याची' परवानगी घ्यावी लागते की त्यांना अनुकूल येईल अशी वाणी बोलण्याची मला परम शक्ति द्या. नंतर तुम्हाला दादांची परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी घेऊन बोलाल तर साधी-सरळ वाणी निघेल. असेच फटकळ बोलत राहिलात तर सरळ वाणी कशी निघेल ? ६९ प्रश्नकर्ता : असे प्रत्येक वेळी कुठे त्यांची परवानगी घेत बसणार ? दादाश्री : प्रत्येक वेळी तशी गरज भासतच नाही ना ! जेव्हा अशी चिकट (वाकडी) फाईल समोर आली तेव्हाच गरज पडते. चिकट फाईलसोबत काही बोलायचे असेल त्यावेळी, सर्वात आधी त्याच्या शुद्धात्म्याला पाहून घ्यायचे, नंतर मनात विधि बोलायची की, (1) हे दादा भगवान... (फाईलचे नाव) च्यासोबत त्याच्या मनाचे समाधान होईल अशी वाणी बोलण्याची शक्ति द्या. (2) नंतर आपल्या मनात बोलावे लागते की, 'हे चंदुभाऊ (फाईलचे नाव) च्या मनाचे समाधान होईल अशी वाणी बोला. ' आणि (3) नंतर बोलायचे की, 'हे पद्मावती देवी (फाईलचे नाव) च्या मनाचे समाधान होवो, त्यात येणारी सर्व विघ्ने दूर करा. ' प्रश्नकर्ता : कित्येक वेळा असे नाही का घडत की आपल्याला समोरच्याचा व्हयू पॉइंटच चुकीचा वाटत असतो, त्यामुळे आपली वाणी कर्कश निघते ? दादाश्री : तसे दिसते म्हणूनच बिनसते ना ! हे पूर्वग्रह वगैरे सर्व नडतात. ‘खराब आहे, खराब आहे' असा पूर्वग्रह झालेला आहे म्हणून मग जी वाणी निघते ती तशी खराबच निघेल ना ! ज्याला मोक्षाला जायचे असेल, त्याला 'असे केले पाहिजे आणि असे नाही केले पाहिजे' असे सर्व नसते. कसेही करून, वाटल्यास तडजोड करूनही चालायला लागायचे. मोक्षाला जाणारा धरुन ठेवत नाही. कसेही करून निकाल लावतो. Page #81 -------------------------------------------------------------------------- ________________ ७० वाणी, व्यवहारात... एका माणसाला स्वत:ची वाणी सुधारायची होती. तसा तर तो क्षत्रिय होता आणि बांगड्यांचा व्यापार करत होता. तो त्या बांगड्या इथून बाहेरगावी घेऊन जायचा. कशातून? तर टोपलीतून घेऊन जायचा. टोपली डोक्यावर ठेवून नाही, पण एक गाढवीण होती ना, तिच्या पाठीवर ते टोपले बांधून बाहेरगावी नेत असे. त्या गावात सर्वांना बांगड्या विकून झाल्यावर उरलेल्या बांगड्या तो रात्री परत आणायचा. तो वेळोवेळी त्या गाढवीणीला म्हणायचा 'चल गाढवीण, चल लवकर.' असे बोलत बोलत हाकलत घेऊन जात असे. तेव्हा एका माणसाने त्याला समजावले की, 'भाऊ, तू तेथे गावात क्षत्रिणींना बांगड्या भरतोस. तेव्हा इथे जर तुला ही सवय लागली आणि तिथेही जर कधी गाढवीण बोलशील तर लोक मारुन-मारुन तुझे तेल काढून टाकतील.' तेव्हा तो म्हणाला, 'गोष्ट तर खरी आहे. एकदा मी असे बोललो होतो आणि मला पस्तावण्याची वेळ आलेली.' त्यावर त्या माणसाने सांगितले, 'म्हणून तू ही सवयच बदलून टाक.' त्याने विचारले कशी बदलू? तेव्हा तो माणूस म्हणाला, 'गाढवीणीला तू म्हणायचेस की चल ताई, चल ताई, ताई चला.' नंतर त्याने अशी सवय लावून घेतली त्यामुळे तेथे सुद्धा त्याने 'या ताई, या ताई' असे बदलून टाकले. पण मग 'या ताई, या ताई' असे म्हटल्यामुळे गाढवीण काय त्याच्यावर खुष होणार आहे ? पण ती सुद्धा समजून जाते की याचे भाव चांगले आहेत. गाढवीणीला सुद्धा हे सर्व समजते. ही जनावरे सर्व समजतात, पण बोलू शकत नाहीत बिचारी. ___म्हणजे असे परिवर्तन घडते! असा काही प्रयोग केला तर वाणी बदलते. आपण ओळखले की यात फायदा आहे आणि याच्याने नुकसान होईल असे आहे, तेव्हा मग ते बदलते. आपण निश्चय केला की 'कोणालाही दुःख होणार नाही अशी वाणी बोलायची आहे. कोणत्याही धर्माला अडचण होणार नाही, कोणत्याही धर्माचे प्रमाण दुभावले जाणार नाही, अशी वाणी बोलली पाहिजे.' तेव्हा ती वाणी चांगली निघेल. 'स्याद्वाद वाणी बोलायची आहे' असा भाव पकडला तर स्याद्वाद वाणी उत्पन्न होईल. Page #82 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात. प्रश्नकर्ता : पण या जन्मात सतत असे बोलत राहिल्याने की 'बस, स्याद्वाद वाणीच हवी आहे' तर तशी वाणी होईल का? दादाश्री : पण हे 'स्याद्वाद' समजून बोलेल तरच. तो स्वतः समजतच नसेल आणि बोलत राहिला किंवा गात राहिला तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कोणाची वाणी चांगली निघते? की जो उपयोगपूर्वक बोलत असेल त्याची. उपयोगवाले कोण असतात? तर ज्ञानी असतात. त्यांच्याशिवाय कोणीही उपयोगवाले नसतात. हे जे मी 'ज्ञान' दिले आहे, ज्यांना हे 'ज्ञान' असेल, त्यांची वाणी उपयोगपूर्वक निघू शकते. त्याने जर पुरुषार्थ केला तर उपयोगपूर्वक होऊ शकते. कारण की 'पुरुष' झाल्यानंतरचा हा पुरुषार्थ आहे. 'पुरुष' होण्यापूर्वी पुरुषार्थ नसतो. प्रश्नकर्ता : या जन्माची समजूत वाणी सुधारण्यासाठी कशा प्रकारे मदत करते. हे जरा उदाहरण देऊन समजावून सांगा. दादाश्री : आता जर कोणी तुला एक शिवी दिली, तर त्याचा आत परिणाम होतो. मनातल्या मनात तू थोडेफार बोलतो सुद्धा की 'तुम्ही नालायक आहात.' पण त्यात तू नसतोस. वेगळा झालास म्हणून तू त्यात नसतोस. आत्मा वेगळा झाला आहे म्हणून तो एकाकार होत नाही. म्हणजे एखाद्या आजारी माणसासारखे तू बोलतोस. प्रश्नकर्ता : तर आता ज्याचा अहंकार गेला नाही, आत्मा वेगळा झाला नाही, त्याला त्याची समजूत मदत करते का? दादाश्री : हो. आधी तो जसे आहे तसे बोलतो आणि मग बोलल्यानंतर पश्चाताप करतो. वाणी सुधारायची असेल तर लोकांना न आवडणारी वाणी बंद करा. आणि मग कोणाची चूक काढली नाही, संघर्ष केला नाही, तरीही वाणी सुधारते. प्रश्नकर्ता : वाणीत सुधार आणायचा असेल तर त्यासाठी काय करावे? Page #83 -------------------------------------------------------------------------- ________________ ५५ वाणी, व्यवहारात... दादाश्री : वाणी आपोआप सुधारु शकत नाही, ती टेपरेकॉर्ड झालेली आहे. प्रश्नकर्ता : हो, म्हणूनच ना! म्हणजे व्यवस्थित झालेले आहे. दादाश्री : व्यवस्थित झालेले आहे, ते जर आता येथे 'ज्ञानी पुरुषां'ची कृपा उतरली तर त्यात परिवर्तन होते. कृपा उतरणे हे कठीण आहे. ___ ज्ञानींच्या आज्ञेमुळे सर्वकाही सुधारु शकते. कारण की भवामध्ये (संसारात) दाखल होण्यासाठी ती कुंपणासारखी आहे. भवाच्या आत दाखल होऊ देत नाही. प्रश्नकर्ता : भवाच्या आत म्हणजे काय? दादाश्री : भवामध्ये घुसू देत नाही. भवामध्ये म्हणजे संसारात आपल्याला शिरू देत नाही. मालकी नसलेली वाणी जगात असू शकत नाही. अशी वाणी सर्व आवरणे तोडून टाकते, पण त्याला ज्ञानींना खुष करता आले पाहिजे, राजी करता आले पाहिजे. ज्ञानी सर्वकाही (पापं) भस्मीभूत करून टाकतात. जर एका तासातच एवढे सारे, लाखो जन्मांचे भस्मीभूत होते, तर मग दुसरे काय नाही करू शकणार? कर्ताभावच नाही. अशी मालकी नसलेली वाणी असूच शकत नाही आणि मालकी नसलेल्या वाणीत कोणीही अशी ढवळाढवळ करू नये की 'असे होऊ शकत नाही'. खरेतर हा अपवाद नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. नंतर हिशोब काढायचा असेल तर तेही व्यवस्थित, तेही व्यवस्थित, तेही व्यवस्थित, तेही व्यवस्थित काढून मग निघेल. पण मग त्याचा हवा तसा लाभ मिळू शकणार नाही. प्रश्नकर्ता : दादाजी, पुढच्या जन्मात हे सर्व आमच्या आठवणीत आणा. दादाश्री : हो. तुम्ही निश्चय करा की मला दादा भगवानांसारखीच वाणी पाहिजे. आताची माझी ही वाणी मला आवडत नाही. म्हणजे मग त्यानुसार होईल. तुमच्या निश्चयावर अवलंबून आहे. Page #84 -------------------------------------------------------------------------- ________________ वाणी, व्यवहारात.... तुम्हाला जशी वाणी, जसे आचार हवे असतील ते टेन्डर भरतेवेळी नक्की करा, मग त्या टेन्डरवरुन तुमचे सर्व डिसीजन (निर्णय) येतील. ७३ प्रश्नकर्ता : कित्येकांची वाणी इतकी गोड असते. लोक त्यांच्या वाणीने मुग्ध होऊन जातात. तर ते काय म्हटले जाईल ? दादाश्री : ती शुद्ध माणसं असतात आणि खूप पुण्य जोडलेले असते तेव्हा असे घडते, स्वतःसाठी पैसे घेत नाहीत. परक्यांसाठी जीवन व्यतीत करतात. त्यांना शुद्ध मनुष्य म्हटले जाते. म्हणजे ते चांगले आहे ! मनुष्य तर कसा असला पाहिजे की त्याची वाणी मनोहर असावी, आपले मन हरण करेल अशी वाणी असावी, त्याचे वर्तन मनोहर असावे आणि विनय सुद्धा मनोहर असावा. हे तर असे बोलतात की त्यावेळी आपल्याला कान बंद करून घ्यावे लागतात! वाणी अशी बोलतात की समोरचा चहा देत असेल तरीही देणार नाही. 'तुम्हाला नाही देणार', असे म्हणेल. वाणीत मधुरता आली की मग गाडी चालली, ती मधुर होत-होत शेवटच्या जन्मात इतकी मधुर होणार की त्या वाणीशी कोणत्याही फळाची तुलना करता येणार नाही, इतकी गोड असेल! आणि कित्येक तर बोलतात तेव्हा वाटते की रेडे हंबरत आहेत. ही सुद्धा वाणी आहे आणि तीर्थंकर साहेबांची ती सुद्धा वाणी आहे !!! ज्याच्या वाणीने कोणालाही किंचित्मात्र दुःख होत नाही, ज्याच्या वर्तनाने कोणालाही किंचित्मात्र दुःख होत नाही, ज्याच्या मनात खराब भाव नाहीत, तो शीलवान आहे. शीलवान झाल्याशिवाय वचनबळ उत्पन्न होत नाही. जेव्हा, स्वत:ची वाणी स्वतः ऐकत राहील तेव्हा मोक्ष होईल. आणि हो, वाणी बंद झाल्याने काही संपन्न होत नाही. वाणी बंद झाल्याने मोक्ष होत नाही. कारण की असे बंद करायला गेलो तर परत दुसरी शक्ति उभी राहील. सर्व शक्तिनां जसेच्या तसे चालू द्यायचे. ही सर्व प्राकृत शक्ति आहे. प्राकृत शक्तिमध्ये हस्तक्षेप करण्यासारखे नाही. म्हणून तर आमच्या Page #85 -------------------------------------------------------------------------- ________________ ७४ वाणी, व्यवहारात... वाणीसाठी सांगतो ना, की ही टेपरेकॉर्ड वाजत आहे, आम्ही पाहात राहतो. बस, हाच मोक्ष! या टेपरेकॉर्डला पाहणे, हाच मोक्ष!! ___म्हणून आपण प्रत्येक कार्य गलन होते वेळी शुद्धीकरण करून काढावे आणि त्याचा निकाल करावा. हो, समताभावे निकाल करायचा आहे. समजले तर गोष्ट अवघड नाही आणि नाही समजले तर याचा अंतच येणार नाही. हे तर विज्ञान आहे. विज्ञानात कोणतेही परिवर्तन होत नसते. आणि शिवाय हे सिद्धांतिक आहे, ज्यात सर्वप्रकारे जरा सुद्धा विरोधाभास, कुठल्याही जागी, किंचित्मात्र मात्र नसतो आणि व्यवहारात फीट होते, निश्चयात फीट होते, सर्व ठिकाणी फीट होते. फक्त लोकांना फीट होत नाही. कारण लोक लोकभाषेत आहेत. लोकभाषेत आणि ज्ञानींच्या भाषेत खूप फरक असतो. ज्ञानींची भाषा कशी सुंदर आहे, काही अडचणच नाही ना! ज्ञानी विस्तारपूर्वक सर्व स्पष्टीकरण देतात, तेव्हा समाधान होते. आपले हे 'अक्रम विज्ञान' जगात बाहेर पडले तर लोकांचे खूप कल्याण करेल. कारण असे विज्ञान कधी निघाले नाही. या व्यवहारात, व्यवहाराच्या तळापर्यंत कोणीही कोणत्याही प्रकारचे ज्ञान दिलेलेच नाही. व्यवहारात कोणी पडलेच नाही. निश्चयाच्याच सर्व गोष्टी केल्या. व्यवहारात निश्चय आला नाही. निश्चय निश्चयात राहीला आणि व्यवहार व्यवहारात राहीला. पण हे तर व्यवहारात निश्चयाला आणून ठेवले, ह्या अक्रम विज्ञानाने. आणि संपूर्ण नवीनच शास्त्र निर्माण केले आहे आणि तेही पुन्हा सायन्टिफिक. यात कोणत्याही जागी विरोधाभास असू शकत नाही. परंतु आता हे 'अक्रम विज्ञान' उजेडात कसे येईल? उजेडात आले तर जगाचे कल्याणच होईल! प्रश्नकर्ता : त्याचा संयोग सुद्धा जुळून येईलच ना? दादाश्री : हो, येईल ना! जय सच्चिदानंद Page #86 -------------------------------------------------------------------------- ________________ नऊ कलमे ( दररोज तीन वेळा बोलायची) १. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार (दुखावणार) नाही, दुभाविला जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार नाही अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. २. हे दादा भगवान ! मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावणार नाही, दुभावले जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावले जाणार नाही, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. ३. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी किंवा आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या. ४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति किंचितमात्र पण अभाव, तिरस्कार कधीही केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. ५. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याशी कधीही कठोर भाषा, तंतीली ( टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची किंवा बोलण्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. Page #87 -------------------------------------------------------------------------- ________________ कोणी कठोर भाषा, तंतीली भाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या. ६. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति स्त्री पुरुष किंवा नपुंसक, कोणताही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचितमात्र पण विषयविकार संबंधी दोष, इच्छा, चेष्टा-चाळे किंवा विचार संबंधी दोष न करण्याची, न करविण्याची किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या. ७. हे दादा भगवान ! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची ___ अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. ८. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा प्रत्यक्ष किंवा परोक्ष, जिवंत किंवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचितमात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. ९. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. (एवढेच तुम्ही दादा भगवान यांच्याजवळ मागायचे. ही दररोज मिकेनिकली (यंत्रवत्) वाचण्याची वस्तु नाही, अंतरात ठेवण्याची वस्तु आहे. ही दररोज उपयोगपूर्वक भावना करण्याची वस्तु आहे. एवढ्या पाठात सर्व शास्त्रांचे सार येऊन जाते.) Page #88 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ** दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्ति द्या ___ ** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे. सामायिक करण्यापूर्वीची विधि हे दादा भगवान ! हे श्री सीमंधर स्वामी प्रभू! मला शुद्ध उपयोगपूर्वक, संपूर्ण आयुष्यात झालेल्या ** दोषांचे, सामायिक, प्रतिक्रमण करण्याची शक्ति द्या. मी मन-वचन-काया, माझ्या नावाची सर्व माया, भावकर्म-द्रव्यकर्मनोकर्म, आपण प्रकट परमात्मा स्वरूप प्रभूच्या श्रीचरणात समर्पित करीत आहे. मी मन-वचन-काया, माझ्या नावाची सर्व माया, भावकर्म-द्रव्यकर्मनोकर्मांपासून मुक्त असा शुद्धात्मा आहे. मी शुद्धात्मा आहे. (3) मी विशुद्धात्मा आहे. (3) मी परमज्योती स्वरूप सिध्द भगवंत आहे. (3) मी अनंत ज्ञानवाला आहे. (3) मी अनंत दर्शनवाला आहे. (3) मी अनंत शक्तिवाला आहे. (3) मी अनंत सुखाचा धाम आहे. (3) मी शुद्धात्मा आहे. (3) आता आपल्या आतमध्ये खोलवर उतरायचे. ** ज्या दोषांसंबंधी सामायिक करायची असेल, उदाहरणार्थ विषयविकार संबंधी दोष, क्रोध संबंधी दोष, लोभ संबंधी दोष इत्यादि.. -दादाश्री Page #89 -------------------------------------------------------------------------- ________________ संपर्क सूत्र दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सिनोग्रा पाटीया जवळ, सिनोग्रा गाँव, ता-अंजार. फोन : 9924346622 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, ता-मोरबी, जि-राजकोट, फोन : (02822) 297097 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9879232877 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा, (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : त्रिमंदिर, बाबरिया कोलेज जवळ, वडोदरा-सुरत हाई-वे NH-8, वरणामा गाँव. फोन : 9574001557 अहमदाबाद : दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, 17, मामानी पोळ-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230 चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173 जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433 भिलाई : 9827481336 पटना : 7352723132 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 : 9422660497 जालंधर : 9814063043 U.S.A. : (D.B.V.I.) +1877-505-DADA (3232) U.K. : +44 330-111-DADA (3232) UAE : +971557316937 Kenya : +254 722 722 063 Singapore : +6581129229 Australia: +61 421127947 New Zealand: +64210376434 Website : www.dadabhagwan.org Page #90 -------------------------------------------------------------------------- ________________ असे प्रोजेक्ट करा की जे तुम्हाला आवडेल हे जे शब्द निघतात ना, त्या शब्दांमुळेच तर हा संसार उभा राहिला आहे. जेव्हा शब्द बंद होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने हे सारे संपुष्टात येईल. आजवर ज्या काही लढाया झाल्या, त्या सर्व शब्दांमुळेच झाल्या आहेत! शब्द तर कसे गोड असावेत आणि ते जर गोड नसतील तर आपण न बोललेच बरे. आपल्याला जसे आवडते तसेच आपण दुसऱ्यांशी बोलावे. म्हणजे तुम्ही असे प्रोजेक्ट करा की जे तुम्हाला आवडेल. हे सर्व तुमचेच प्रोजेक्शन आहे. यात देवाची किंचितही दखल नाही. कोणावरही टाकलेली वाणी, ती सर्व शेवटी तुमच्यावरच येते. तेव्हा अशी शुद्ध वाणी बोला की तशी शुद्ध वाणीच तुमच्यावर पडेल. - दादाश्री ISBN 978-93-84321-356 9-789386-321736 Printed in India Price 25 dadabhagwan.org