________________
वाणी, व्यवहारात...
बोलेन, मी तर पोपट आहे. हे तर तुमच्या दडपणामुळे पोपट होऊन बोलेन. बाकी, मी बोलत नाही.' नंतर पोपट बोलतो अशाप्रकारे बोला. तुम्ही स्वतः बोलूच नका, पोपट होऊन बोला. आपण म्हटले 'आया राम' तर पोपट म्हणेल, 'आया राम.' असे बोला.
मला 'ज्ञान' झाले नव्हते ना, तेव्हा एकदा कोर्टात जावे लागले होते. साक्ष द्यायची होती. तेव्हा वकील म्हणाला की, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे'. मी म्हटले, 'नाही, भाऊ. मला जेवढे माहित आहे तेवढे बोलेन. मी काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे बोलणार नाही.' तेव्हा तो वकील म्हणतो, 'मला काय हे तुमच्यासाठी उभे केले? असे तर मी खोटा ठरेन. माझी अब्रू जाईल. असे साक्षीदार मिळाले तर आमची संपूर्ण केसच उडून जाईल.' मी विचारले, मग 'यावर उपाय काय?' तेव्हा वकील म्हणाले की, 'आम्ही सांगतो तेवढे बोलायचे.' त्यावर मी सांगितले, 'उद्या विचार करून सांगेन.' नंतर रात्री मला आतून उत्तर मिळाले, की आपण पोपट होऊन जावे. वकीलाने सांगितल्यामुळे मी बोलतो, म्हणजे आत असा भाव राहिला पाहिजे, आणि नंतर बोला.
बाकी कोणासाठी चांगले काम करत असाल तर शक्य तोपर्यंत खोटे बोलू नका. कोणाच्या चांगल्यासाठी चोरी करायची नाही. कोणाच्या चांगल्यासाठी हिंसा करायची नाही. संपूर्ण जोखिमदारी आपलीच आहे.
खोटे बोलण्याची तुमची इच्छा आहे खरी आत? थोडीतरी? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : आणि तरीसुद्धा बोलले जाते ही हकीकत आहे ना! तर जेव्हा खोटे बोलले गेले आणि तुम्हाला माहित पडले की हे खोटे बोलले गेले की ताबडतोब 'दादां'जवळ माफी मागायची की, 'दादा, मला खोटे बोलायचे नाही, तरी खोटे बोलले गेले. मला माफ करा. आता पुन्हा खोटे बोलणार नाही.' आणि तरीही पुन्हा तसे घडले तर दुःखी होऊ नये. माफी मागतच राहायची. त्यामुळे त्या गुन्हाची तेथे नोंद राहणार नाही. माफी मागितली म्हणजे नोंद राहत नाही.