________________
वाणी, व्यवहारात...
नाही' असे बोलल्याबरोबर लगेचच आत कितीतरी बदल होतो. म्हणून पॉजिटिव बोला.
वर्षानुवर्षे निघून गेली, पण माझे मन जरा सुद्धा नेगेटिव झाले नाही. कोणत्याही संयोगांमध्ये जरा सुद्धा नेगेटिव झाले नाही. लोकांचेही मन जर पॉजिटिव झाले, तर ते भगवंतच बनतील. म्हणून लोकांना मी काय सांगत असतो की, समभावाने निकाल करून, ही नेगेटिविटी सोडत जा, त्यानंतर पॉजिटिवनेस आपोआपच राहील. व्यवहारात पॉजिटिव, आणि निश्चयात पॉजिटिवही नाही आणि नेगेटिवही नाही!
2. वाणीने झिडकारणे-अंतराय प्रश्नकर्ता : कित्येक घरे अशी असतात की जिथे वाणीने वादविवाद होत असतात, पण त्यांचे मन आणि हृदय मात्र साफ असते.
दादाश्री : आता जर वाणीने क्लेश होत असेल, तर समोरच्या व्यक्तिच्या हृदयावर परिणाम होतो. परंतु ते जर वरकरणी असेल तर हरकत नाही. बाकी असे आहे, की बोलणारा जर हृदयाने आणि मनाने साफ असेल तर तो बोलू शकतो. पण ऐकणाऱ्याला तर ते दगड मारल्यासारखे वाटते, म्हणून मग क्लेश होतोच. जिथे बोल(शब्द) थोडे जरी खराब असतील, विचित्र असतील तिथे क्लेश होतो. ____ बोल तर लक्ष्मी आहे. ते तर मोजून-मापून द्यायला हवेत. लक्ष्मी कोणी मोजल्याशिवाय देतो का? शब्दाचे असे आहे की ते जर सांभाळले गेले तर तिथे सर्वच महाव्रत येऊन जातात.
आपल्याकडून कोणालाही जरासुद्धा झिडकारले जाणार नाही, असे आपले जीवन असायला हवे. झिडकारण्यास तुम्ही ओळखता की नाही? चांगलेच ओळखता ना? अगदी बरोबर? तुम्ही झिडकारता का कोणाला?
प्रश्नकर्ता : आतून सूक्ष्मरित्या झिडकारले जाते.
दादाश्री : सूक्ष्मात झिडकारले त्यास हरकत नाही. सूक्ष्मात झिडकारले, ते तर आपल्यासाठी नुकसानकारक आहे. तसे तर