________________
वाणी, व्यवहारात...
दादाश्री : ते तर आपण वाणीला जशी वळवू तशी वळते. परंतु आतापर्यंत आपणच वाणीला कठोर बनविली होती, लोकांना धमकावण्यासाठी, घाबरवण्यासाठी.
समोरचा कठोर बोलत असेल तरी आपण मृदु बोलले पाहिजे. कारण आपल्याला सुटायचे आहे.
हे दादा, कंठात विराजमान व्हा, असे म्हटल्याने वाणी सुधारेल, येथे गळ्यात दादांचे निदिध्यासन केले तरीही वाणी सुधारेल.
प्रश्नकर्ता : तंतीली भाषा म्हणजे काय?
दादाश्री : रात्री बायकोसोबत भांडण झाले असेल, तर सकाळी चहा देताना ती चहाचा कप असे आपटून ठेवते. तेव्हा आपण समजून जावे की, 'अरेच्या, रात्री झालेले भांडण अजूनही विसरली नाही!' यालाच तांता म्हणतात. आता कोणीतरी येऊन म्हणेल, 'तुम्ही सगळे बिनअकलेचे येथे येऊन बसले आहात? चला, उठा जेवायला.' तेव्हा बसलेले सर्व लोक म्हणतील, 'अरे, झाले आमचे जेवण! हे जे आत्ता तू खाऊ घातलेस, ते काय कमी आहे ?!' याला दुःस्वर म्हणतात.
कित्येक जण तर खिचडी खाऊ घालतात, पण ते असे गोड बोलतात की, 'भाऊ, या जेवायला, तुमचे स्वागत आहे.' असे ऐकल्यावर आपल्याला खिचडी कशी छान लागते. मग जरी फक्त खिचडीच असेल, पण हे सुस्वर आहेत.
एका भाऊंनी मला विचारले की, 'तुमच्यासारखी गोड वाणी माझी केव्हा होईल?' तेव्हा मी सांगितले की, 'हे जे सर्व नेगेटिव शब्द आहेत ते जेव्हा बोलण्याचे बंद होतील तेव्हा.' कारण प्रत्येक शब्द हा त्याच्या गुण-पर्यायासोबत असतो.
नेहमी पॉजिटिव बोला. आत आत्मा आहे, आत्म्याची हजेरी आहे. त्यासाठी पॉजिटिव बोला. पॉजिटिवमध्ये नेगेटिव बोलू नये. पॉजिटिव झाले, यात नेगेटिव(नकारात्मक) बोलणे हा गुन्हा आहे आणि पॉजिटिवमध्ये नेगेटिव बोलता, म्हणून ह्या सर्व समस्या उभ्या राहतात. 'काहीच बिघडलेले