________________
वाणी, व्यवहारात...
निंदा कशी करतात? तर साधारण निंदा करतात. पण गाढ निंदा करणे याला अवर्णवाद म्हणतात.
प्रश्नकर्ता : 'हे दादा भगवान !' मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा, प्रत्यक्ष किंवा परोक्ष, जिवंत किंवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचित्मात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा का प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या.' ।
दादाश्री : आपले कोणी नातेवाईक वारले असतील आणि लोक त्यांची निंदा करत असतील, तर आपण त्यात पडू नये, आणि जर त्यात पडले असू तर नंतर पश्चाताप केला पाहिजे की असे पुन्हा घडू नये. मेलेल्या व्यक्तिची निंदा करणे हा भयंकर मोठा गुन्हा आहे. मेलेल्यालाही सोडत नाहीत, लोक. असे करतात की नाही? असे वागायला नको, एवढेच मी सांगू इच्छितो. यात जोखिम आहे. खूपच मोठी जोखिम आहे.
आता रावणाचे वाईट बोलू नये. कारण की अजूनही ते देहधारी आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत 'फोन' पोहोचतो. 'रावण असा होता आणि तसा होता' असे बोललो, तर ते त्याला पोहोचते.
त्यावेळी पूर्वीच्या 'ओपिनियन' (अभिप्राया) मुळे असे बोलले जाते. म्हणून ही कलम बोलत जा, त्यामुळे जरी असे बोलले गेले तरी दोष लागणार नाही.
एकपण शब्द कडू बोलू नये. कडू बोलल्यामुळेच तर सर्व भांडणं होतात. एकच शब्द 'आंधळ्याचा आंधळा' या शब्दाने तर संपूर्ण महाभारत उभे राहिले. दसरे तर काही विशेष कारण नव्हते. हेच मुख्य कारण होते! द्रौपदीने म्हटले होते ना? टोमणे मारले होते ना? आता त्याचे फळ त्या द्रौपदीला मिळाले. कायमच, एक जरी शब्द कडू बोलला गेला तर त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार का?
प्रश्नकर्ता : वाणीतून कठोरता कशी निघेल?