________________
वाणी, व्यवहारात...
दादाश्री : निंदा, ही विराधना गणली जाते. पण प्रतिक्रमण केले तर ती निघून जाते. ते अवर्णवादासारखे आहे. म्हणून तर आपण म्हणत असतो की कोणाची निंदा करू नका, तरीही लोक मागून निंदा करतात.
म्हणजे कोणाच्याही निंदेत पडू नये. कमाई केली नाही, किर्तन केले नाही तरी हरकत नाही, पण निंदेत मात्र पडू नका. मी म्हणतो की निंदा करण्यात आपला काय फायदा? त्यात तर भयंकर नुकसान आहे. या जगात जबरदस्त नुकसान जर कशात असेल तर ते निंदा करण्यात आहे.
कोणत्याही माणसाची निंदा करू नये. अरे, सहज सुद्धा काही बोलू नये. तसे केल्याने भयंकर दोष लागतो. आणि त्यातूनही इथे सत्संगात, परमहंसच्या सभेत तर कोणाबद्दलही अजिबात वाईट बोलू नये. एखाद्या वाईट कल्पनेमुळे सुद्धा ज्ञानावर खूप मोठे आवरण येते. तर मग या 'महात्म्यांची' टीका, निंदा केली तर कितीतरी मोठे आवरण येणार. दूधात साखर विरघळते त्याप्रमाणे सत्संगात मिसळून गेले पाहिजे. ही बुद्धिच आत ढवळाढवळ करते. आम्ही सर्वांचे सर्वकाही जाणतो, पण तरीसुद्धा कोणाबद्दलही एक अक्षर सुद्धा बोलत नाही. एक अक्षर जरी वाईट बोलले तरी ज्ञानावर मोठे आवरण येत असते.
प्रश्नकर्ता : अवर्णवाद हा जो शब्द आहे ना, त्याचा 'एक्जॅक्ट' (खरा) अर्थ काय आहे?
दादाश्री : कसेही करून जसे आहे तसे न सांगता, त्याहून उलटे चित्र रंगवून सांगणे, तोच अवर्णवाद! जसे आहे तसे तर नाही परंतु त्याहून अगदी उलटे. जसे आहे तसे वर्णन करणे म्हणजे वाईटास वाईट बोलणे आणि चांगल्यास चांगले बोलणे, त्यास अवर्णवाद म्हणत नाही. परंतु सर्वच वाईट बोलणे त्यास अवर्णवाद म्हणतात.
अवर्णवाद म्हणजे एखाद्या माणसाची बाहेर अब्रू चांगली असेल, प्रतिष्ठा असेल, किर्ती असेल त्यास आपण उलटे बोलून तोडून टाकणे, याला अवर्णवाद म्हणतात. हा अवर्णवाद तर निंदा करण्यापेक्षाही जास्त वाईट आहे. अवर्णवाद म्हणजे एखाद्या विषयी गाढ निंदा करणे. हे लोक