________________
वाणी, व्यवहारात...
ur
दादाश्री : अपव्यय म्हणजे वाणीचा चुकीचा वापर करणे आणि दुर्व्यय म्हणजे व्यय (वापर) न करण्यासारख्या जागेवर व्यय करणे. उगाचच बोंबलत राहणे, त्यास दुर्व्यय म्हणतात. तुम्ही पाहिलेत का? विनाकारण बोंबलत राहतात असे असतात ना लोक? त्यास दुर्व्यय म्हणतात.
जेथे जशी वाणी बोलली पाहिजे तिथे दुसरीच वाणी बोलणे, याला अपव्यय म्हणतात. जिथे जे योग्य बसत असेल, तसे ज्ञान न बोलता दुसऱ्याच प्रकारे बोललो, तर त्यास अपव्यय म्हणतात.
खोटे बोलणे, कावेबाजी करणे, हा सर्व वाणीचा अपव्यय म्हटला जातो. वाणीचा दुर्व्यय आणि अपव्यय या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. अपव्यय म्हणजे सर्व प्रकारे नालायक, सर्व प्रकारे दुरुपयोग करतो. वकील दोन रुपयांसाठी खोटे बोलतात की 'हो, याला मी ओळखतो.' त्यास अपव्यय म्हणतात.
आज तर लोक तुमची टीका सुद्धा करतात. स्वतः काय करत आहे त्याचे भान नाही बिचाऱ्याला, म्हणून असे करतो. दुःखी माणूसच दुसऱ्याची टीका करतो, दुःखीच दुसऱ्याला त्रास देतो. सुखी माणूस कोणाची टीका करत नाही.
'आपली टीका करण्याचा लोकांना अधिकार आहे. आपल्याला कोणाची टीका करण्याचा अधिकार नाही.' (आप्तसूत्र) तर निंदा आणि टीका यात फरक आहे?
टीका म्हणजे एखाद्याचे प्रत्यक्ष दिसणारे दोष उघड करणे, त्यास टीका म्हणतात, आणि निंदा म्हणजे दिसणारे-न दिसणारे सर्व दोष गात राहणे, सारखे त्याचे वाईटच बोलत राहणे, त्यास निंदा म्हणतात.
'कोणाची थोडीफार पण टीका करणे केवळज्ञानाला बाधक आहे, अरे, आत्मज्ञानालाही बाधक आहे, समकित होण्यासाठीही बाधक आहे.' (आप्तसूत्र)
प्रश्नकर्ता : कोणाची निंदा करणे, हे कशात गणले जाते?