________________
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : कशा प्रकारे टोकायचे?
दादाश्री : त्याला बसवावे. मग म्हणावे, आपण हिंदस्तानातील लोक, आर्य प्रजा आहे आपली, आपण अनाडी नाही आहोत, आपण असे वागू नये. असे तसे सर्व समजावून प्रेमाने सांगायचे, तेव्हा मग तो मार्गावर येईल. नाहीतर तुम्ही मारपीट करून, लेफ्ट एन्ड राइट, लेफ्ट एन्ड राइट घ्याल, तर ते चालेल का?
प्रश्नकर्ता : येथील मुले वादविवाद खूप करतात. आर्युमेन्ट खूप करतात. हे तुम्ही कसले लेक्चर देत आहात, असे म्हणतात?
दादाश्री : वादविवाद खूप करतात, पण तरीही प्रेमाने शिकवाल तर वादविवाद कमी होत जातील. वादविवाद हे तुमचे रिअॅक्शन आहे. आतापर्यंत तुम्ही त्याला तुमच्या धाकात ठेवले आहे ना, ते अजून त्याच्या डोक्यातून जात नाही, पुसलेच जात नाही. म्हणून तो असा वादविवाद करतो. माझ्यासोबत एकही मुलगा वादविवाद करत नाही. कारण मी खऱ्या प्रेमाने तुम्हा सर्वांसोबत बोलत असतो.
___ माझा आवाज सत्तावादी नसतो. म्हणजे सत्ता नसावी. मुलांना जेव्हा तुम्ही काही सांगता तेव्हा सत्तावादी आवाज नसावा.
म्हणून तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे थोडा प्रयोग करा ना. प्रश्नकर्ता : कसा करावा? दादाश्री : प्रेमाने बोला ना.. प्रश्नकर्ता : त्याला माहितच आहे की माझे त्याच्यावर प्रेम आहे.
दादाश्री : असे प्रेम कामाचे नाही. कारण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा कलेक्टर सारखे बोलता. 'तुम्ही असे करा, तुमच्यात अक्कल नाही, असे-तसे.' असेही म्हणता ना?
नेहमी, प्रेमानेच जग सुधारते. त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. जर धाकाने सुधारत असेल, तर हे सरकार लोकशाही उडवून टाकेल आणि जो कुणी गुन्हा करेल त्याला तुरुंगात टाकून फाशी देईल.