________________
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : तरीसुद्धा मुले उद्धटपणे वागत असतील तर काय करावे?
दादाश्री : मुले चुकीच्या मार्गावर गेली, तरीही आपण त्यांना पाहात राहायचे आणि जाणत राहायचे. आणि मनात भाव नक्की करावा, आणि परमेश्वराला प्रार्थना करावी की याच्यावर कृपा करा. ____ 'रिलेटिव' समजून औपचारिक राहायचे! मुलांना तर नऊ महिने पोटात ठेवायचे. नंतर चालवायचे, फिरवायचे, लहान असतील तोपर्यंत. नंतर सोडून द्यायचे. ह्या गायी-म्हशी सुद्धा सोडूनच देतात ना? मुलाला पाच वर्षापर्यंत टोकावे लागते, नंतर टोकायचेही नाही आणि वीस वर्षानंतर तर त्याची बायकोच त्याला सुधारेल. आपण सुधारायचे नसते.
प्रश्नकर्ता : मुलांना काही सांगण्यासारखे वाटले तर मी त्यांच्यावर रागावतो, त्यामुळे त्यांना दु:ख पण होते तर काय करावे?
दादाश्री : नंतर आपण मनात माफी मागून घ्यावी. ह्या मुलीला काही जास्तीचे बोलले गेले असेल आणि तिला दु:ख झाले असेल तर तुम्ही तिला म्हणायचे की, मी माफी मागतो. आणि जर असे सांगण्यासारखे नसेल तर अतिक्रमण केले म्हणजे आतून तुम्ही प्रतिक्रमण करा.
प्रश्नकर्ता : मुलांबरोबर मुल होऊन जायचे आणि त्याप्रमाणे वागायचे तर ते कशा प्रकारे?
दादाश्री : सध्या तुम्ही मुलांबरोबर मुलांसारखे वागता का? आपण मोठे असू तर त्याला त्याची भीती वाटत राहते. तेव्हा भीती वाटणार नाही अशा प्रकारे आपण वागायला हवे. आपण त्याला समजावून त्याचा दोष काढला पाहिजे, भीती दाखवून दोष काढायचा नाही. भीती दाखवल्याने काम होत नाही. तुम्ही वयाने मोठे, तो वयाने लहान, घाबरुन जातो बिचारा! पण त्यामुळे दोष काही जात नाही, दोष तर आत वाढतच राहतो. पण जर तो दोष समजावून काढला तर जातो, अन्यथा जातच नाही.
प्रश्नकर्ता : असेच घडते, हा तर माझा स्वत:चाच अनुभव आहे