________________
६४
वाणी, व्यवहारात...
तोच मी सांगतो, माझा जो प्रश्न आहे तीच ही गोष्ट आहे. हा माझा स्वतःचाच प्रश्न आहे आणि पुन्हा पुन्हा माझ्याकडून असेच घडते.
दादाश्री : हो, म्हणूनच मी हे उदाहरण देतो की, तुमचा मुलगा बारा वर्षाचा असेल, तुम्ही त्याच्याशी सर्वकाही बोलता, पण त्या सर्व बोलण्यात काही गोष्टी त्याला समजतील आणि काही गोष्टी समजणार नाहीत. तुम्ही काय सांगू इच्छिता ते त्याला समजत नाही. तुमचा व्हयू पॉइंट (दृष्टीकोन) काय आहे ते त्याला समजत नाही, म्हणून तुम्ही शांतपणे हळूवार सांगायचे की, माझा हेतू असा आहे, माझा व्हयू पॉइंट असा आहे. मी असे सांगू इच्छितो. हे तुला समजले की नाही ते तू मला सांग. आणि जर तुझी गोष्ट मला नाही समजली, तर मी ते समजण्याचा प्रयत्न करीन, असे त्याला सांगावे.
म्हणून तर आपल्या लोकांनी सांगितले, की भाऊ, काही वर्षांनंतर, सोळा वर्षांनंतर मुलांना मित्र म्हणून स्वीकारा, असे सांगितले आहे, नाही का? फ्रेंडली टोनमध्ये असेल तर आपला टोन चांगला निघतो. नाहीतर रोज बाप व्हायला गेलो, तर काही भलं होत नाही. मुलगा चाळीस वर्षांचा झाला असेल आणि आपण बाप बनून फिरलो, तर काय होईल?
प्रश्नकर्ता : मुलगा वाईट शब्द बोलला असेल, आपल्या समोर ताठ झाला असेल, ते जर मनात नोंदून ठेवले, तर त्या अभिप्रायामुळे लौकिक वर्तनात गाठ पडते. तर त्यामुळे सामान्य व्यवहारात गुंतागुंत नाही का होणार?
दादाश्री : नोंदच या दुनियेत व्यर्थ आहे. नोंदीमुळेच या जगात नुकसान होते. आपल्याला कोणी खूप मान दिला त्याची नोंद ठेवायची नाही आणि कोणी शिव्या दिल्या, की 'तुम्ही नालायक आहात, अनफीट आहात.' असे ऐकल्यावर सुद्धा नोंद ठेवायची नाही. त्यांना नोंद ठेवायची असेल तर ठेवू द्या. पण आपण हा मनस्ताप का करून घ्यावा? वही-खाते बनवून परत नोंदी ठेवत राहतो!!
सुनेला वाटते की सासरे दुसऱ्या खोलीत बसले आहेत. म्हणून सून