________________
वाणी, व्यवहारात....
६१
लोकांसोबत! मुलांनी त्या दिवसापासून नियाणां - (स्वतःचे सर्व पुण्य लावून एखाद्या वस्तुची कामना करणे) केलेला असतो की मोठा झाल्यावर मी बापाला मारेन ! माझे सर्वस्व जावो पण हे कार्य व्हावे, यास म्हणतात नियाणां. हेही समजण्यासारखे आहे ना ?
प्रश्नकर्ता : म्हणजे सर्व दोष बापाचाच ?
दादाश्री : बापाचाच! बापाचाच दोष आहे. बापात बाप व्हायची लायकी नसेल तेव्हा बायको त्याच्या विरुद्ध होते. बापात लायकी नसेल तेव्हाच तर असे घडते ना ! मारुन - ठोकून गाडी खेचतो. कुठपर्यंत समाजाला
घाबरत राहणार.
ही मुले आरसा आहेत. मुलांवरुन कळते की आपल्यात किती चुका आहेत !
प्रश्नकर्ता : मौनव्रत घेतले तर कसे ? मौन धारण केले तर, बोलायचेच नाही.
दादाश्री : पण ते मौन आपल्या हातची गोष्ट नाही ना. मौन राहणे आपल्या आवाक्यात नाही. मौन राहिले तर चांगलीच गोष्ट आहे.
प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुकीचे वागत असेल तर त्याला टोकावे लागते. ज्यामुळे त्याला दु:खही होते. तर त्याचा निकाल कसा करावा ?
दादाश्री : टोकण्यास हरकत नाही, पण ते आपल्याला जमले पाहिजे. सांगता तर आले पाहिजे ना, काय ?
प्रश्नकर्ता : ते कशा प्रकारे ?
दादाश्री : मुलाला म्हटले, की 'तुला अक्कल नाही, गाढव आहेस.' असे बोलले तर काय होईल ! त्यालाही अहंकार तर असतो की नाही ? तुम्हालाच तुमच्या बॉसने म्हटले की 'तुम्हाला अक्क्ल नाही, गाढव आहात तुम्ही.' असे म्हटले तर काय होईल ? असे म्हणू नये. टोकता आले पाहिजे.