________________
६०
वाणी, व्यवहारात...
कलियुगात हाल तर बघा लोकांचे! नाहीतर सत्युगात तर कसे आई-वडील होते!
एक माणूस मला एकोणीसशे बावन्नपासून असे सांगत होता की 'हे गवर्मेन्ट खराब आहे आणि ते जायलाच पाहिजे.' असे एकोणीसशे बावन्नपासून ते बासष्ठपर्यंत बोलत राहिला. मग एकदा मी त्यांना सांगितले की, 'रोज तुम्ही मला ही गोष्ट सांगता, पण तेथे काही बदल होतो का? हे तुमचे बोललेले तेथे काही फळते का? तेव्हा तो म्हणतो, 'नाही. फळले तर नाही.' तेव्हा मी सांगितले, 'मग कशासाठी बोलत राहता? तुमच्यापेक्षा तर रेडिओ बरा.'
आपण बोललेले फळत नसेल तर आपण गप्प राहायला पाहिजे. आपणच मूर्ख आहोत, आपल्याला बोलता येत नाही, म्हणून गप्प बसायला पाहिजे. आपले बोललेले फळत नाही आणि उलट आपले मन बिघडते, आपला आत्मा बिघडतो. असे कोण करेल?
प्रश्नकर्ता : मुलगा वडिलांचे ऐकत नसेल तर काय करावे?
दादाश्री : 'आपली चूक आहे' असे समजून सोडून द्यायचे! आपली चूक असेल तेव्हाच ऐकत नाही ना! ज्याला बाप होता आले, त्याचा मुलगा त्याचे ऐकणार नाही असे कधी होईल का?! पण बाप होता येतच नाही ना!
प्रश्नकर्ता : एकदा बाप झाल्यानंतर पिल्ले त्याला सोडतील का?
दादाश्री : सोडतील का? पिल्लं तर आयुष्यभर डॉग आणि डॉगिनला, (कुत्रा आणि कुत्रीला) दोघांना बघतच राहतात, की हा भुंकत राहतो आणि ही चावा घेत राहते. कुत्रा भुंकल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी दोष तर त्या कुत्र्याचाच निघतो. मुले तर आईचीच बाजू घेतात. म्हणून मी एका माणसाला सांगितले होते, 'ही मुले मोठी झाल्यावर तुला मारतील. म्हणून तू बायकोशी नीट वाग!' ही मुले तर त्यावेळी बघतच राहतात, जोपर्यंत त्यांचे पाय पोहचत नाहीत तोपर्यंत, आणि एकदा का त्यांचे पाय पोहोचले की मग खोलीत कोंडून मारतील. असे घडलेही आहे