________________
वाणी, व्यवहारात....
कुठेतरी चांगली वाणी बोलत असाल ना ? की नाही बोलत ? कोठे बोलत असाल? तर ज्यांना बॉस (मालक) मानता, त्या बॉसबरोबर चांगली वाणी बोलता आणि अन्डरहॅन्डला ( नोकराला) झिडकारता. दिवसभर 'तू असे केले, तू तसे केले', असेच ओरडत राहता. तर यात वाणी संपूर्णपणे बिघडून जाते. अहंकार आहे त्याच्या मागे. या जगात काहीच बोलण्यासारखे नाही. आपण जे बोलत असतो, तो अहंकार आहे. संपूर्ण जग नियंत्रणवाले आहे.
५९
10. वाढवा 'रोपटी' अशाप्रकारे बागेत.....
एका बँकेचे मॅनेजर मला सांगत होते, दादाजी, मी तर कधीही बायकोला, मुलाला किंवा मुलीला एक अक्षरही बोललो नाही. वाटेल त्या चुका केल्या असतील, वाटेल तसे वागत असतील तरीही मी त्यांना काहीच बोलत नाही.
त्याला असे वाटले की दादाजी मला छान पगडी घालतील! तो काय आशा ठेवत होता, हे तुम्हाला समजले ना ?! पण मला तर त्याच्यावर खूप राग आला की तुम्हाला कोणी बँकेचे मॅनेजर बनवले? तुम्हाला मुलांना सांभाळता येत नाही आणि बायकोलाही सांभाळता येत नाही ! तो तर घाबरुनच गेला बिचारा. मी त्याला सांगितले, 'तुम्ही अगदीच टोकाचे बेकार माणूस आहात. या जगात तुम्ही काहीच कामाचे नाहीत.' त्या माणसाला तर असे वाटलेले की असे सांगितल्यावर 'दादा' मला मोठे बक्षीस देतील. अरे! वेड्या, याचे बक्षीस असते का ? मुलगा चुकीचे वागत असेल, तेव्हा त्याला आपण 'का असे केले ? आता असे करू नकोस.' असे नाटकीय बोलावे. नाहीतर मुलगा असेच समजेल की तो जे काही करत आहे ते ‘करेक्टच' आहे. कारण की बापाने 'एक्सेप्ट' (मान्य) केले आहे.
पुष्कळ लोक मुलांना म्हणतात, 'मी सांगितलेले तू ऐकत नाहीस.' मी म्हटले, 'त्याला तुमची वाणी आवडत नाही. आवडली असती तर त्याचा परिणाम झालाच असता.' आणि तो बाप म्हणतो, 'तू माझे सांगितलेले ऐकत नाहीस.' अरे मूर्खा, तुला बाप होता आले नाही. या