________________
वाणी, व्यवहारात...
म्हणजे तुम्ही ज्यांच्याशी खोटे बोलले असाल, ते लोक बाहेर तुमची बदनामी करतील की, 'काय हे चंदुभाऊ, चांगला शिकलेला माणूस, चक्क खोटे बोलला?! हीच काय त्याची लायकी?' अर्थात् बदनामीचे फळही भोगावेच लागेल, जरी पश्चाताप केला असेल तरीही. आणि जर पहिल्यापासूनच ते पाणी बंद केले असेल, 'कॉजेस'च बंद करण्यात आले, तर मग 'कॉजेस'चे फळ आणि त्याचेही पुन्हा फळ, हे येणार नाही.
म्हणून मी काय सांगत असतो? जरी खोटे बोलले गेले पण 'असे बोलायला नको' असा तुझा विरोध आहे ना? हो, तर हे खोटे तुला आवडत नाही, हे नक्की झाले, असे म्हटले जाईल. खोटे बोलण्याचा तुझा अभिप्राय नाही ना, मग तुझी जबाबदारी संपली.
प्रश्नकर्ता : पण ज्याला खोटे बोलण्याची सवयच असेल, त्याने काय करावे?
दादाश्री : त्याने मग त्याचबरोबर प्रतिक्रमण करण्याची सवयही करून घ्यावी लागेल. आणि त्याने जर प्रतिक्रमण केले, तर मग जबाबदारी आमची आहे.
म्हणून अभिप्राय बदला! खोटे बोलणे म्हणजे जीवनाचा अंत आणण्यासारखे आहे, जीवनाचा अंत आणणे आणि खोटे बोलणे हे दोन्ही एक समान आहेत, असे 'डिसाइड' (निश्चित) करावे लागते. आणि पुन्हा सत्याचे शेपूट धरुनही बसू नका.
प्रश्नकर्ता : बोलण्यात जन्मापासूनच त्रास आहे.
दादाश्री : मागच्या जन्मी जीभेने लढाई केली होती ना! जिथे-तिथे सर्वांना शिव्या दिल्या, त्यामुळे मग त्याची जीभ (वाचा) जाते. मग काय होईल? बोलण्यात काही बाकी ठेवतो का? कर्म कमी असतील तर पुन्हा वाचा फुटेलही. असे काही नाही, पाच-सात वर्षानंतरही वाचा फुटेल.
चुकीची वाणी बोलल्यामुळेच तर जीभ गेली होती ना! जीभेचा जेवढा दुरुपयोग कराल तितकी जीभ जाते.