________________
वाणी, व्यवहारात...
___४३
प्रश्नकर्ता : माझा स्वभाव, माझी वाणी कठोर आहे. कोणाच्याही मनाला लागेल, दु:ख वाटेल अशी आहे. माझ्या मनात असे नसते की मी त्याला दुःख देण्यासाठी बोलत आहे.
दादाश्री : कोणाला दु:ख होईल असे बोलू नये. कोणत्याही जीवाला दु:ख होईल, अशी वाणी बोलणे, हा खूप मोठा अपराध आहे.
प्रश्नकर्ता : अशी वाणी असण्याचे कारण काय? दादाश्री : रुबाब दाखवण्यासाठी! दुसऱ्यांवर रुबाब पडावा यासाठी.
प्रश्नकर्ता : आम्ही रुबाब दाखवण्यासाठी कडक बोलतो आणि समोरचा मनुष्य ते सहन करून घेतो. तर तो कशामुळे सहन करतो?
दादाश्री : एक तर, त्याला गरज असते, गरजू सहन करतो, आणि दुसरे, क्लेश होऊ नये म्हणून सहन करतो. तिसरे, अब्रू जाऊ नये म्हणून सहन करतो. कुत्रा भुंकेल पण आपण भुंकायचे नाही, अशा कोणत्यातरी कारणामुळे लोक चालवून घेतात, निभावून घेतात.
8. दुःखदायी वाणीचे करावे प्रतिक्रमण भगवंताकडे सत्य आणि असत्य, ह्या दोन्ही गोष्टी नसतातच. ही तर समाज व्यवस्था आहे. हिंदुचे सत्य, ते मुस्लिमांसाठी असत्य ठरते आणि मुसलमानांचे सत्य, ते हिंदुसाठी असत्य ठरते. ही सर्व समाज व्यवस्था आहे. भगवंतांजवळ_खरे-खोटे असे काहीच नसते. भगवंत तर इतकेच सांगतात की, 'कोणालाही दुःख झाले तर आपण प्रतिक्रमण करावे. आपल्याकडून दुःख व्हायला नको. तुम्ही 'चंदुभाऊ' होते, ते इथे ह्या जगात सत्य आहे. बाकी, भगवंतांच्या येथे तर तो 'चंदुभाऊ'च नाही. हे सत्य भगवंताकडे असत्य आहे.
संसार चालेल, संसार स्पर्शणार नाही, नडणार नाही आणि (मोक्षाचे) काम होईल, असे आहे. फक्त आमच्या आज्ञेचे आराधन करायचे आहे. 'चंदुभाऊ' खोटे बोलेल, त्याचीही आपल्याकडे अडचण नाही. खोटे बोललात त्यामुळे समोरच्याचे नुकसान झाले. म्हणून आपण