________________
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : खुष, खुष!
दादाश्री : खुष, खुष होऊन जाईल. पण असे तर बोलतच नाहीत. जणू काही वाणी विकत आणावी लागते व असे वागतात! वाणी विकत आणावी लागते का?
प्रश्नकर्ता : नाही, पण मग नवरेपणा राहणार नाही ना तिथे.
दादाश्री : म्हणे नवरेपणा राहणार नाही, नवरेपणा!! ओहोहो! मोठा नवरा होऊन बसलाय!! आणि तेही परत अनसर्टिफाईड नवरा, सर्टिफीकेट घेऊन आला असता तर ठीक आहे !!
___ पत्नी आणि तिचा पती, दोघेही जेव्हा शेजाऱ्यांशी भांडतात तेव्हा कसे अभेद होऊन भांडतात? दोघे मिळून असे हात करून भांडतात की, 'तुम्ही असे आणि तुम्ही तसे.' दोघे एक होऊन असे असे हात करतात. तेव्हा तर आपल्याला वाटते की ओहोहो! या दोघांमध्ये केवढी एकता!! हे कॉर्पोरेशन तर अभेद आहे, असे वाटते. आणि नंतर जेव्हा घरात शिरल्यावर दोघे भांडतात तेव्हा काय म्हणतील? घरी ते भांडतात की नाही भांडत? कधीतरी तर भांडतात ना? हे कॉर्पोरेशन आपसात जेव्हा भांडतात ना, 'तू अशी आणि तुम्ही असे, तू अशी आणि तुम्ही असे....' मग घरात भांडण जुंपते तेव्हा म्हणतो, 'तू जा इथून, माहेरी जा, मला तू नकोच.' असे म्हणेल! आता ही चुकीची समज नाही का? तुम्हाला काय वाटते? ते दोघेही अभेद होते ती अभेदता तुटली आणि भेद उत्पन्न झाला म्हणून पत्नीसोबतही 'माझे-तुझे' होऊन जाते 'तू अशी आहेस आणि तू तशी आहेस!' तेव्हा तीही म्हणेल, 'तुम्ही तरी कुठे सरळ आहात?' म्हणजे घरात सुद्धा 'मी आणि तू' असे होत असते.
कुटुंबातील सदस्याचा जर असा हात लागला तर आपण त्यांच्याशी भांडतो का? नाही. एक फॅमिली प्रमाणे राहावे. बनावट करायची नाही. हे तर बनावट करतात लोक. असे करू नये. एक फॅमिली... तुझ्याशिवाय मला करमत नाही असे सांगावे, ती जरी आपल्यावर रागावली ना तरी सुद्धा, नंतर थोड्यावेळाने तिला सांगावे 'तू वाटेल तेवढी रागावलीस पण