________________
वाणी, व्यवहारात...
टाकावा. बाकी, घरात मात्र बिलकूल रागवायचे नाही. घरातली माणसे तर आपलीच असतात.
_ 'न बोलण्याची' कला, ही सर्वांनाच जमेल अशी नाही. खूपच अवघड आहे ही कला.
ह्या कलेत तर काय करावे लागेल? तर 'ती व्यक्ति समोर येईल, त्या आधिच त्याच्या शुद्धात्म्याशी आपले बोलणे झाले पाहिजे, आणि त्याला शांत केले पाहिजे, आणि त्यानंतर आपण काहीही बोलायचे नाही. त्यामुळे आपले सर्व काम होऊन जाईल.' हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगत आहे. बाकी खूपच सूक्ष्म आहे ही कला.
कोणाला कडक शब्दांत सुनावले तर, त्याचे फळ म्हणून बऱ्याच वेळेपर्यंत तुम्हाला त्यांच्या स्पंदनांचा परिणाम होत राहतो. एकही अपशब्द आपल्या तोंडून निघता कामा नये. सुशब्द असावेत. पण अपशब्द मात्र असू नयेत. आणि जर चुकीचा शब्द निघाला म्हणजे स्वत:च्या आत भावहिंसा झाली, हीच आत्महिंसा मानली जाते. आता लोक इथेच चुकत असतात आणि दिवसभर क्लेश करत राहतात.
हे जे शब्द निघतात ना, ते शब्द दोन प्रकारचे असतात, या जगात शब्द जे आहेत त्यांची क्वॉलिटी (गुणवत्ता) दोन प्रकारची आहे. चांगले शब्द शरीरास निरोगी बनवतात आणि खराब शब्द शरीरास रोगी बनवतात. म्हणून एक सुद्धा वाईट शब्द निघायला नको. 'एय...नालायका.' आता यात 'एय' शब्द नुकसान करणारा नाही. पण 'नालायक' शब्द खूपच नुकसान करणारा आहे.
'तुला अक्कल नाही' असे बायकोला बोललात, तर हा शब्द समोरच्याला दुःख देणारा आहे आणि स्वत:मध्ये रोग उत्पन्न करणारा आहे. त्यावर ती म्हणते 'तुमच्यात तरी कुठे बरकत आहे !' म्हणून मग दोघांमध्ये रोग उत्पन्न होतो. हे तर ती त्याची बरकत शोधते आणि हा तिची अक्कल शोधतो. अशीच सर्व दशा आहे !
म्हणून आपण स्त्रियांशी भांडण करू नये. आणि स्त्रियांनी पुरुषांशी