________________
वाणी, व्यवहारात...
कित्येक भगिनी मला सांगतात, 'माझ्या नवऱ्याने मला असे म्हटले होते की ज्यामुळे माझ्या हृदयाला घाव लागला आहे. तो मी पंचवीस वर्षे झाली तरीही विसरु शकत नाही.' म्हणजे त्यावेळी वाणीने कसा दगड मारला असेल?! ते घाव मग भरु शकत नाहीत, म्हणून असे घाव देऊ
नयेत.
आपले लोक घरात काठीने मारतात? काठीने किंवा हाताने नाही मारत? खालच्या जातीत हाताने किंवा काठीने मारामारी करतात. उच्च जातीत काठीने मारत नाहीत, परंतु शब्दांचे बाण, वचनबाणच मारत राहतात.
एखाद्यास काही शब्द बोललो आणि त्याला आपल्या बोलण्याने जर वाईट वाटले, तर त्या शब्दास अपशब्द म्हणतात. असेच, सहजच जरी अपशब्द बोलला असाल ना, तरी त्यात जोखिम आहे. आणि चांगले शब्द जरी सहज, विनाकारण बोलत असाल तरीही ते हितकारी आहे. पण वाईट शब्द, अपशब्द जर विनाकारण बोलत असाल, तरी ते अहितकारी आहे. कारण कोणत्या शब्दांना अपशब्द म्हटले जाते? दुसऱ्यांना काही बोललात, आणि त्याला दुःख झाले त्या सर्व शब्दांनाच अपशब्द म्हटले जाते. बाहेर पोलिसांना तर कोणी काही बोलत नाही पण घरात मात्र बोलतात ना! पोलिसांना अपशब्द बोलणारा असा बहादुर(!) मी पाहिला नाही. पोलिस तर आपल्याला चांगलाच धडा शिकवतात. घरात कोण धडा शिकवणार? आपण नवीन धडा तर शिकायला हवा ना?!
प्रश्नकर्ता : व्यापार करत असताना समोर जो कोणी व्यापारी असेल, त्याला समजत नसल्यामुळे आपल्याकडून क्रोध केला जातो, तर तेव्हा काय करावे?
दादाश्री : व्यापाऱ्यासोबत तर समजा व्यापारासाठी आहे, तेथे तर बोलावे लागते. तसे तर तिथे सुद्धा 'न' बोलण्याची कला आहे. तिथे न बोलता सर्व कामे होतील असे आहे. पण ही कला लवकर अवगत होईल अशी नाही, ही कला फार उच्च आहे. म्हणून मग तेथे भांडा, आणि नंतर जो फायदा(!) होईल तो बघून घ्यायचा, तो मग जमा करून टाकावा, भांडल्यानंतर जो फायदा(!) होईल ना, तो वहीखात्यात जमा करून