________________
२८
वाणी, व्यवहारात...
वाणी जड आहे, रेकॉर्डच आहे. ही टेपरेकॉर्ड वाजते, त्यापूर्वी टेपमध्ये पट्टी भरते की नाही? त्याचप्रमाणे ह्या वाणीची सुद्धा पूर्ण पट्टी भरलेली आहे. आणि त्याला संयोग मिळताच, जशी पीन लागते आणि रेकॉर्ड सुरु होते, तशी वाणी सुरु होते.
पुष्कळदा असेही नाही का होत, की तुम्ही दृढ निश्चय केलेला असतो की सासू समोर किंवा नवऱ्या समोर बोलायचे नाही, तरी सुद्धा बोलले जाते की नाही? बोलले जाते. हे काय आहे ? आपली तर इच्छा नव्हती. तेव्हा काय नवऱ्याची इच्छा होती की बायकोने मला शिव्या द्याव्या? मग कोण बोलवतो? तर ही रेकॉर्ड बोलते आणि टेप झालेल्या रेकॉर्डला कोणी बापही बदलू शकत नाही.
__ पुष्कळदा कोणी मनात ठाम ठरवून आला असेल की आज तर त्याला असे ऐकवणार आणि तसे सुनवणार. आणि जेव्हा त्याच्याजवळ जातो आणि तिथे दुसऱ्या दोन-पाच जणांना पाहतो, तेव्हा एक अक्षरही न बोलता परत येतो की नाही? अरे, बोलायला जातो पण शब्दच फुटत नाहीत. असे घडते की नाही? वाणी जर तुझ्या सत्तेत असती, तर तू ठरवल्याप्रमाणे वाणी निघेल. पण असे घडते का? कसे घडणार? __ हे विज्ञान असे सुंदर आहे की कोणत्याच प्रकारे बाधक नाही आणि झटपट समाधान आणेल असे आहे. पण जर या विज्ञानाला लक्षात ठेवले की दादाजींनी सांगितले आहे की वाणी म्हणजे फक्त रेकॉर्डच आहे, मग कोणी वाटेल ते बोलत असेल किंवा फौजदार धमकावत असेल तरी पण त्याची वाणी ही रेकॉर्डच आहे, असे फीट होऊन जायला पाहिजे, मग फौजदार धमकावत असेल तरी त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही.
कोणताही माणूस खूप बडबड करत असेल तरी आपण समजून जावे की ही रेकॉर्ड बोलली. रेकॉर्डला रेकॉर्ड जाणले तर आपण गडबडून जाणार नाही. नाहीतर तन्मयाकार झालो तर काय होईल?
आपल्या ज्ञानात ही 'वाणी रेकॉर्ड आहे', ही एक चावी आहे आणि त्यात काही आपण थापा मारत नाही. ही आहेच रेकॉर्ड. आणि रेकॉर्ड मानून आजपासून आरंभ केला तर? मग आहे का काही दुःख? आपल्या