________________
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : मग त्यावर आम्ही ब्रेक कसा लावायचा? त्यावर उपाय काय?
दादाश्री : 'ही वाणी चुकीची आहे' असे जेव्हा वाटेल तेव्हापासून तुमच्यात दिवसेंदिवस परिवर्तन होत जाईल.
एका व्यक्तिला तुम्ही म्हणालात की, 'तुम्ही खोटारडे आहात.' आता 'खोटारडे' म्हटल्याबरोबर आत एवढे सारे सायन्स घेरून टाकते, त्यामुळे इतके पर्याय उत्पन्न होतात की तुम्हाला दोन तासांपर्यंत त्याच्यावर प्रेमच उत्पन्न होत नाही. म्हणून असे शब्द न बोलणे हेच उत्तम आणि जर बोलले गेले तर प्रतिक्रमण करा.
मन-वचन-कायेचे सर्व लेपायमान भाव, म्हणजे काय? तर ते चेतन भाव नाहीत. ते सर्व प्राकृतिक भाव, जड भाव आहेत. लेपायमान भाव म्हणजे आपल्याला लेपित व्हायचे नसेल तरी लेपायमान करून टाकतात. म्हणून तर आम्ही सांगत असतो ना, की 'मन-वचन-कायेच्या तमाम लेपायमान भावांपासून मी सर्वथा निर्लेपच आहे' या लेपायमान भावांनी संपूर्ण जगाला लेपायमान केले आहे आणि हे लेपायमान भाव फक्त प्रतिध्वनीच आहेत, शिवाय ते निर्जिवही आहेत. म्हणून तुम्ही त्यांचे एकू
नका.
परंतु ते आपोआप जातील असेही नाहीत. ते बोंबाबोब करीतच राहतील. तेव्हा मग कोणता उपाय कराल? अध्यवसन बंद करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? तर 'ते तर माझे उपकारी आहेत' असे काहीतरी बोलावे लागेल. तुम्ही असे बोलाल तेव्हा ते सर्व वाईट भाव बंद होतील, की हा तर पुन्हा काहीतरी नवीनच, 'उपकारी' आहे असे बोलतोय. म्हणून मग शांत होतील!
तुम्ही म्हणालात, की 'येथे नुकसान होईल असे आहे.' असे म्हटल्याबरोबर सर्व लेपायमान भाव तेहेत-हेने बोंबा मारु लागतात, 'असे होऊन जाईल आणि तसे होऊन जाईल.' अरे पण भाऊ, तुम्ही बाहेरच बसा ना आता, मी तर सहजच असे बोललो, पण तुम्ही का बोंबाबोंब