________________
वाणी, व्यवहारात...
3. शब्दांनी सर्जित अध्यवसन... ही जी तार वाजते ना, तर एकच तार छेडल्यावर आत किती आवाज उत्पन्न होतात?
प्रश्नकर्ता : खूप वाजतात.
दादाश्री : एक जरी छेडली तरीही? अशाच प्रकारे हा एकच शब्द जरी बोलायचा झाला, तरी त्यामुळे कितीतरी शब्द मनात उभे राहतात. याला भगवंतांनी अध्यवसन असे म्हटले आहे. अध्यवसन म्हणजे बोलायचे नसेल, तरीही ते सर्व उभे राहते. स्वत:ला बोलण्याचा भाव झाला ना, म्हणजे ते शब्द आपोआपच बोलले जातात. जेवढी शक्ति असेल तेवढी सर्व जागृत होते, इच्छा नसली तरीही! अध्यवसन इतके सारे उभे राहतात की ते कधीही मोक्षाला जाऊ देत नाहीत. त्यामुळेच तर आम्ही अक्रम विज्ञान दिले आहे, किती सुंदर अक्रम विज्ञान आहे! कोणताही बुद्धिमान माणूस या कोड्याचा अंत आणू शकेल, असे हे विज्ञान आहे.
'तुम्ही नालायक आहात' असे बोललो, तर हा शब्द ऐकून त्याला तर दःख झालेच, पण त्याचे जे पर्याय उभे होतील, ते तुम्हाला खूप दुःख देतील आणि जर तुम्ही म्हणाल, की तुम्ही खूप चांगले आहात, सज्जन आहात, तर ते शब्द तुम्हाला आत शांती देतील. तुमच्या अशा बोलण्याने त्यालाही शांती वाटते आणि तुम्हालाही शांती. म्हणजे इथेच सावध होण्याची गरज आहे ना!
तुम्ही एक शब्द बोलला की 'हा नालायक आहे,' तर 'लायक'चे वजन एक किलो असते आणि 'नालायक'चे वजन चाळीस किलो असते. म्हणून 'लायक' बोलाल तर त्याची स्पंदने खूप कमी होतील आणि 'नालायक' बोललात तर चाळीस किलो स्पंदने निर्माण होतील, हे बोल बोलण्याचे परिणाम!
प्रश्नकर्ता : म्हणजे चाळीस किलोचे पेमेन्ट उभे राहिले.
दादाश्री : सुटकाच नाही ना!