________________
१४
वाणी, व्यवहारात...
तर यास दखल केली असे म्हटले जाईल का? की मग ते आपले डिस्चार्ज आहे?
दादाश्री : दखल केल्यामुळेच ढवळाढवळ होत असते. प्रश्नकर्ता : दखल केल्यामुळे म्हणजे नक्की कशा प्रकारे होते?
दादाश्री : ती व्यक्ति जर आपल्याला म्हणाली की, 'तू का मधेच बोललास?' तेव्हा जर आपण म्हणू की, 'आता बोलणार नाही.' तर ती ढवळाढवळ नाही, पण त्याऐवजी आपण असे म्हणालो की 'मी बोललो नाही तर ही गाडी चालणारच नाही, बिघडेल सर्व.' यास ढवळाढवळ केली असे म्हणतात, मधेच बोलले जाते, यास ढवळाढवळ म्हणतात. पण ही ढवळाढवळ सुद्धा डिस्चार्ज आहे. आता या डिस्चार्ज दखलमध्ये सुद्धा नवीन दखल होऊन जाते.
ढवळाढवळ करणे, हस्तक्षेप करणे हेच अंतराय आहेत. तुम्ही परमात्मा आहात, आणि परमात्म्याला अंतराय कसे असू शकतात? पण तू तर ढवळाढवळ करतोस की, 'हे असे का केले? असे कर.' अरे, पण तुम्ही असे का करता?
कोणाला चुकीचे म्हटले, ते स्वत:च्या आत्म्यावर धूळ टाकल्यासारखे आहे.
आपल्याला जसे आवडते तसेच बोलावे. प्रॉजेक्ट असे करा की जे तुम्हाला आवडेल. हे सर्व तुमचेच प्रॉजेक्शन आहे. यात भगवंतांनी हस्तक्षेप केलेला नाही. कोणावर टाकलेली वाणी, ती सर्व शेवटी तुमच्यावरच पडते असते. म्हणून अशी शुद्ध वाणी बोला की ती शुद्ध वाणीच तुमच्यावर पडेल.
आम्ही कोणालाही 'तू खोटा आहेस, तुझे चुकीचे आहे' असे म्हणत नाही. चोराला ही खोटे म्हणत नाही. कारण त्याच्या व्हयू पॉइंट ने (दृष्टीकोनाने) तो खरा आहे. हो, आम्ही त्याला चोरी केल्याचे फळ काय मिळेल, ते 'जसे आहे तसे' समजावून सांगतो.