________________
वाणी, व्यवहारात...
नाही आणि मीच समजतो.' त्यामुळे ज्ञानांतराय आणि दर्शनांतराय पडतात. किंवा जर कोणी आत्मज्ञान प्राप्त करत असेल, त्यात विघ्न घातले तर त्याला ज्ञानाचा अंतराय पडतो. कोणी म्हणेल की, 'ज्ञानी पुरुष' आले आहेत, तुम्हालाही यायचे असेल तर चला.' तेव्हा जर तुम्ही असे म्हणालात की, 'असे 'ज्ञानीपुरुष' तर पुष्कळ बघितले.' हा पाडला अंतराय! आता मनुष्य आहे, म्हणून बोलल्याशिवाय तर राहणारच नाही ना! तुम्हाला तिथे जाता येत नसेल पण तेव्हा जर तुमच्या मनात असे भाव आले की 'ज्ञानीपुरुष' आले आहेत, पण मी जाऊ शकत नाही, तर त्यामुळे अंतराय तुटतात. अंतराय पाडणारा स्वतःच्या अज्ञानतेमुळे अंतराय पाडत असतो. त्याला त्याची जाणीवच नसते.
कितीतरी अंतराय पाडलेले आहेत या जीवाने! हे ज्ञानी पुरुष आहेत, हातात मोक्ष देतात. चिंतारहित स्थिती बनवतात, तरीसुद्धा अंतराय किती आहेत की त्याला 'वस्तू'ची प्राप्तीच होत नाही!
कित्येक म्हणतात की, 'असे अक्रम ज्ञान असते का कुठे ? तासाभरात मोक्ष होतो का कधी कुठे?' असे बोलतात म्हणजे त्यांना पडले अंतराय. या जगात काय घडू शकत नाही, हे सांगताच येत नाही. म्हणून बुद्धिने मापण्यासारखे हे जग नाही. कारण की हे घडलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. 'आत्मविज्ञानासाठी' तर हमखास अंतराय पाडलेले असतात. हे सर्वात अंतिम स्टेशन आहे.
प्रश्नकर्ता : संसार ही वस्तूच अशी आहे की, जिथे नुसते अंतरायच आहेत.
दादाश्री : तुम्ही स्वतःच परमात्मा आहात, पण या पदाचा लाभ मिळत नाही. कारण कितीतरी अंतराय आहेत. 'मी चंदुभाऊ आहे' बोलल्याबरोबर अंतराय पडतात. कारण भगवंत सांगतात की, 'तू मला चंदु म्हणतोस?' हे जरी अज्ञानतेने बोललास तरीसुद्धा अंतराय पडतात. चुकून जरी विस्तवावर हात पडला तरी विस्तव सोडतो का?
प्रश्नकर्ता : दोघे जण बोलत असतील आणि आपण मधेच बोललो,