________________
वाणी, व्यवहारात...
प्रतिक्रमण फक्त मोक्षाला जाण्यासाठीच नाही, पण हे तर वैर थांबवण्यासाठी भगवंताला लावलेला फोन आहे. प्रतिक्रमण करण्यात कमी पडलो तर वैर बांधले जाईल. चूक समजल्यावर ताबडतोब प्रतिक्रमण करून घ्यावे. त्यामुळे वैर बांधले जाणार नाही. समोरच्याला वैर बांधायचे असेल तरीही बांधले जाणार नाही. कारण आपण सरळ समोरच्याच्या आत्म्यालाच फोन लावतो. व्यवहार निरुपाय आहे. जर आपल्याला मोक्षालाच जायचे असेल तर प्रतिक्रमण करा. ज्याला स्वरुपज्ञान नसेल, आणि त्याला व्यवहाराला व्यवहार स्वरुपातच ठेवायचे असेल, तर समोरचा वाईट बोलला तेच करेक्ट आहे असेच मान्य करा. पण जर मोक्षाला जायचे असेल तर त्याचे प्रतिक्रमण करा, नाहीतर वैर बांधले जाईल.
वाटेत जाताना कोणी तुम्हाला म्हटले की 'तुम्ही नालायक आहात, चोर आहात, बदमाश आहात' अशी-तशी शिवी दिली आणि जर त्यावेळेस तुम्हाला वीतरागता राहिली तर समजावे की या बाबतीत तुम्ही भगवंत झालात. जितक्या बाबतीत तुम्ही जिंकलात तितक्या बाबतीत तुम्ही भगवंत झालात. आणि तुम्ही जगासोबत जिंकलात म्हणजे पूर्ण भगवंत होऊन गेलात, नंतर कोणासोबतही मतभेद पडणार नाहीत.
संघर्ष झाला म्हणजे आपण समजावे की 'असे काय मी बोलून गेलो की हा संघर्ष झाला!' म्हणजे झाले समाधान, मग कोडे सुटले. अन्यथा जोपर्यंत आपण 'समोरच्याची चूक आहे' असे शोधायला गेलो तोपर्यंत हे कोडे सुटणारच नाही. 'आपली चूक आहे' असे मानू तेव्हाच या जगापासून सुटका होईल. दुसरा कोणताही उपाय नाही. दुसरे सर्व उपाय गुंतवणारे आहेत. आणि उपाय करणे हा आपल्या आत दडलेला अहंकार आहे. उपाय कशासाठी शोधता? समोरचा आपली चूक काढत असेल तर आपण असे सांगावे की 'मी तर आधीपासूनच वाकडा आहे.'
प्रश्नकर्ता : 'आप्तवाणीत' असे लिहिले आहे की 'दादा चोर आहेत' असे जर कोणी म्हटले तर त्याचे महान उपकार मानावेत.
दादाश्री : त्याचे उपकार कशाबद्दल मानले पाहिजेत? कारण असे