________________
वाणी, व्यवहारात....
बोलायचे नाही. जे काही असेल ते निवांतपणे खाऊन घ्यायचे आणि निघून जावे आपापल्या कामावर, काम करीत राहायचे. बोलायचे वगैरे नाही. तू काही बोलत तर नाही ना मुलांना, नवऱ्याला ?
बोलायचे कमी केलेले चांगले. कुणाला काहीही सांगण्यासारखे नाही, सांगितल्याने जास्त बिघडते. त्याला सांगितले की, 'गाडीवर लवकर पोहोच, तर तो उशीरा जाणार आणि काही सांगितले नाही तर वेळेवर जाणार. आपण नसलो तरी सर्वकाही चालेल असे आहे. हा तर स्वत:चा खोटा अहंकार आहे. ज्या दिवसापासून तुम्ही मुलांसोबत कटकट करायची बंद कराल त्या दिवसापासून मुले सुधारतील. तुमचे शब्द चांगले निघत नाहीत, त्यामुळे समोरचा घुसमटतो. तुमचे बोल तो स्वीकारत नाही, उलट ते शब्द परत येतात. आपण तर मुलांना चांगले खायला, प्यायला सर्व बनवून द्यायचे आणि आपले कर्तव्य बजावायचे, दुसरे काही बोलण्यासारखे नाही. सांगण्यात फायदा नाही, असा निष्कर्ष तुम्ही काढला आहे ?
प्रश्नकर्ता : मुले त्यांची जबाबदारी समजून वागत नाहीत.
दादाश्री : जबाबदारी ' व्यवस्थित शक्ति'ची आहे, तो तर त्याची जबाबदारी समजूनच आहे. त्याच्याशी बोलणे तुम्हाला जमत नाही. त्यामुळे ढवळाढवळ होते. समोरचा ऐकेल तेव्हाच आपल्या सांगण्याला अर्थ आहे. हे तर आई-वडील वेड्यासारखे बोलतात, मग मुले पण वेडेपणा करतात.
प्रश्नकर्ता: मुले उद्धटपणे बोलतात.
दादाश्री : हो, पण हे तुम्ही कसे थांबविणार ? हे तर जेव्हा समोरासमोर बंद होईल तेव्हा सर्वांचे चांगले होईल.
एकदा जर का मनात विरोधी भाव निर्माण झाला की मग त्याची लिंक चालू होते, मनात मग त्याच्यासाठी ग्रह बांधला जातो की हा माणूस असाच आहे. तेव्हा आपण मौन राहून समोरच्याला विश्वासात घेतले पाहिजे. बोलत राहिल्याने कुणाचेही सुधारत नाही! सुधारायचे असेल तर 'ज्ञानी पुरुषा'च्या वाणीने सुधारेल. मुलांसाठी तर आई - वडिलांची जोखिमदारी आहे. आपण बोललो नाही तर चालणार नाही का ? चालेल.