________________
४६
वाणी, व्यवहारात...
प्रतिक्रमण तर अगदी अंतिम सायन्स आहे. म्हणून जर माझ्याकडून तुम्हाला कडक बोलले गेले असेल, तुम्हाला जरी त्याचे जास्त दु:ख झाले नसेल तरी मला हे समजले पाहिजे की मी असे कडक बोलायलाच नको होते. या ज्ञानामुळे स्वतःची चूक लक्षात येते. म्हणून मला तुमच्या नावाचे प्रतिक्रमण करावे लागते.
प्रश्नकर्ता : म्हणजे वाणी बोलतेवेळी, आपल्याला आपला व्हयू पॉइंट करेक्ट वाटत असेल, पण समोरच्याला त्याच्या व्हयू पॉइंटने करेक्ट वाटत नसेल तर?
दादाश्री : ती सर्व वाणी अगदी चुकीची आहे. समोरच्याला फीट (अनुकूल) झाली, तीच करेक्ट वाणी! समोरच्याला फीट होईल अशी वाणी आपण बोलली पाहिजे.
प्रश्नकर्ता : आम्ही समोरच्याला काही सांगितले, आमच्या मनात तर तसे काही नसते, पण तरी आम्ही सांगितल्यावर त्याला असे वाटते की 'हा बरोबर बोलत नाही, चुकीचे आहे.' तर त्यास अतिक्रमण म्हटले जाते का?
दादाश्री : त्याला दुःख वाटत असेल तर आपण प्रतिक्रमण करून घ्यावे. त्यात काय आपल्याला कष्ट पडणार आहेत? कोणाला दु:ख देऊन आपण सुखी होऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुकीचे करत असेल, तर त्याला टोकावे लागते. तर ते करायचे की नाही?
दादाश्री : व्यवहारात टोकावे लागते, पण ते अहंकारासहित होत असते. म्हणून त्याचे प्रतिक्रमण केले पाहिजे.
प्रश्नकर्ता : टोकले नाही तर तो डोक्यावर चढतो?
दादाश्री : टोकावे तर लागते, पण सांगता आले पाहिजे, सांगता येत नाही, व्यवहार येत नाही, त्यामुळे अहंकारासहित टोकले जाते. म्हणून टोकल्यानंतर त्याचे प्रतिक्रमण करून घ्यायचे. तुम्ही समोरच्याला टोकले