________________
वाणी, व्यवहारात....
तुम्हाला जशी वाणी, जसे आचार हवे असतील ते टेन्डर भरतेवेळी नक्की करा, मग त्या टेन्डरवरुन तुमचे सर्व डिसीजन (निर्णय) येतील.
७३
प्रश्नकर्ता : कित्येकांची वाणी इतकी गोड असते. लोक त्यांच्या वाणीने मुग्ध होऊन जातात. तर ते काय म्हटले जाईल ?
दादाश्री : ती शुद्ध माणसं असतात आणि खूप पुण्य जोडलेले असते तेव्हा असे घडते, स्वतःसाठी पैसे घेत नाहीत. परक्यांसाठी जीवन व्यतीत करतात. त्यांना शुद्ध मनुष्य म्हटले जाते. म्हणजे ते चांगले आहे !
मनुष्य तर कसा असला पाहिजे की त्याची वाणी मनोहर असावी, आपले मन हरण करेल अशी वाणी असावी, त्याचे वर्तन मनोहर असावे आणि विनय सुद्धा मनोहर असावा. हे तर असे बोलतात की त्यावेळी आपल्याला कान बंद करून घ्यावे लागतात! वाणी अशी बोलतात की समोरचा चहा देत असेल तरीही देणार नाही. 'तुम्हाला नाही देणार', असे म्हणेल.
वाणीत मधुरता आली की मग गाडी चालली, ती मधुर होत-होत शेवटच्या जन्मात इतकी मधुर होणार की त्या वाणीशी कोणत्याही फळाची तुलना करता येणार नाही, इतकी गोड असेल! आणि कित्येक तर बोलतात तेव्हा वाटते की रेडे हंबरत आहेत. ही सुद्धा वाणी आहे आणि तीर्थंकर साहेबांची ती सुद्धा वाणी आहे !!!
ज्याच्या वाणीने कोणालाही किंचित्मात्र दुःख होत नाही, ज्याच्या वर्तनाने कोणालाही किंचित्मात्र दुःख होत नाही, ज्याच्या मनात खराब भाव नाहीत, तो शीलवान आहे. शीलवान झाल्याशिवाय वचनबळ उत्पन्न होत नाही.
जेव्हा, स्वत:ची वाणी स्वतः ऐकत राहील तेव्हा मोक्ष होईल. आणि हो, वाणी बंद झाल्याने काही संपन्न होत नाही. वाणी बंद झाल्याने मोक्ष होत नाही. कारण की असे बंद करायला गेलो तर परत दुसरी शक्ति उभी राहील. सर्व शक्तिनां जसेच्या तसे चालू द्यायचे. ही सर्व प्राकृत शक्ति आहे. प्राकृत शक्तिमध्ये हस्तक्षेप करण्यासारखे नाही. म्हणून तर आमच्या