________________
७४
वाणी, व्यवहारात...
वाणीसाठी सांगतो ना, की ही टेपरेकॉर्ड वाजत आहे, आम्ही पाहात राहतो. बस, हाच मोक्ष! या टेपरेकॉर्डला पाहणे, हाच मोक्ष!! ___म्हणून आपण प्रत्येक कार्य गलन होते वेळी शुद्धीकरण करून काढावे आणि त्याचा निकाल करावा. हो, समताभावे निकाल करायचा आहे. समजले तर गोष्ट अवघड नाही आणि नाही समजले तर याचा अंतच येणार नाही.
हे तर विज्ञान आहे. विज्ञानात कोणतेही परिवर्तन होत नसते. आणि शिवाय हे सिद्धांतिक आहे, ज्यात सर्वप्रकारे जरा सुद्धा विरोधाभास, कुठल्याही जागी, किंचित्मात्र मात्र नसतो आणि व्यवहारात फीट होते, निश्चयात फीट होते, सर्व ठिकाणी फीट होते. फक्त लोकांना फीट होत नाही. कारण लोक लोकभाषेत आहेत. लोकभाषेत आणि ज्ञानींच्या भाषेत खूप फरक असतो. ज्ञानींची भाषा कशी सुंदर आहे, काही अडचणच नाही ना! ज्ञानी विस्तारपूर्वक सर्व स्पष्टीकरण देतात, तेव्हा समाधान होते.
आपले हे 'अक्रम विज्ञान' जगात बाहेर पडले तर लोकांचे खूप कल्याण करेल. कारण असे विज्ञान कधी निघाले नाही. या व्यवहारात, व्यवहाराच्या तळापर्यंत कोणीही कोणत्याही प्रकारचे ज्ञान दिलेलेच नाही. व्यवहारात कोणी पडलेच नाही. निश्चयाच्याच सर्व गोष्टी केल्या. व्यवहारात निश्चय आला नाही. निश्चय निश्चयात राहीला आणि व्यवहार व्यवहारात राहीला. पण हे तर व्यवहारात निश्चयाला आणून ठेवले, ह्या अक्रम विज्ञानाने. आणि संपूर्ण नवीनच शास्त्र निर्माण केले आहे आणि तेही पुन्हा सायन्टिफिक. यात कोणत्याही जागी विरोधाभास असू शकत नाही. परंतु आता हे 'अक्रम विज्ञान' उजेडात कसे येईल? उजेडात आले तर जगाचे कल्याणच होईल!
प्रश्नकर्ता : त्याचा संयोग सुद्धा जुळून येईलच ना? दादाश्री : हो, येईल ना!
जय सच्चिदानंद