________________
वाणी, व्यवहारात...
आम्ही काय सांगू इच्छितो, की जे सर्व येते, तो तुमचा हिशोब आहे. तो चुकता होऊ द्या, आणि पुन्हा नव्याने रक्कम उधार देऊ नका. प्रश्नकर्ता : नवीन रक्कम उधार देणे कशास म्हणतात ?
२२
दादाश्री : कोणी तुमच्याशी वाईट बोलले तर तुम्हाला मनात असे वाटते की ‘हा मला वाईट का बोलतो ?' म्हणजेच तुम्ही त्याला नवीन रक्कम उधार दिली. तुमचा जो हिशोब होता, तो फेडताना तुम्ही पुन्हा नवीन हिशोबाचे वहीखाते चालू केले. अर्थात् एक शिवी जी तुम्ही उधार दिली होती, ती तो परत करायला आला, तेव्हा ती जमा करून घ्यायची होती, त्याऐवजी तुम्ही नवीन पाच शिव्या उधार दिल्या. ही एक शिवी तर सहन होत नाही, आणि दुसऱ्या पाच उधार दिल्या, म्हणजे तिथे परत नवीन उधारी करतो आणि मग गोंधळत राहतो. अशाप्रकारे नवीन गुंता निर्माण करतो. आता यात मनुष्याची बुद्धी कशी काय पोहोचेल ?
तुला जर हा व्यापार परवडत नसेल तर पुन्हा देऊ नकोस, नवीन उधारी करू नकोस, आणि हे जर परवडत असेल तर पुन्हा पाच दे.
प्रश्नकर्ता : एकदा जमा केले, दुसऱ्यांदा जमा केले, शंभर वेळा जमा केले, असे प्रत्येकवेळी जमाच करत राहायचे ?
दादाश्री : हो, पुन्हा उधार कराल तर पुन्हा वहीखाते चालूच राहील. त्यापेक्षा लाख वेळा तू जमा कर ना, आपण जमा करायचे. आणि त्याचा अंत येईलच. बघाच तुम्ही ! मी सांगितल्याप्रमाणे करा ना !
प्रश्नकर्ता : एवढी वर्षे गेली तरी अजून काही अंत आला नाही.
दादाश्री : दुसरा विचार करण्यापेक्षा मी सांगितल्याप्रमाणे करा ना, अंत येईल. आणि मी असे बरेच काही जमा केले आहे, अठ्ठावीस वर्षांपासून आम्ही नवीन उधार देत नाही. म्हणून तर वह्या किती चोख
झाल्या!
आपल्या शेजाऱ्याला सांगा की, 'सकाळच्या प्रहरी तू मला पाच शिव्या देत जा.' तेव्हा तो काय म्हणेल, 'मी काही रिकामा बसलो आहे ?'