________________
वाणी, व्यवहारात...
करतात. प्रकृती जिवंत आहे, तिचा अपमान कराल तर त्याचा परिणाम होईल.
२१
4. दुःखदायी वाणीच्यावेळी, समाधान!
प्रश्नकर्ता : कोणी काही सुनावून गेला तर तेव्हा आपण समाधान कसे ठेवावे ? समभाव कशा प्रकारे ठेवावा ?
दादाश्री : आपले ज्ञान काय सांगते ? तुमच्यात कोणीही हस्तक्षेप करू शकेल असे नाहीच. जगात असा कोणी जन्मलाच नाही की जो तुमच्यात दखल करू शकेल. कोणी कोणामध्ये दखल करू शकेल असे नाहीच. तरीपण ही दखल का येते ? तुमच्यात जो दखल करतो, तो तुमच्यासाठी निमित्त आहे. पण यात मूळ हिशोब तुमचाच आहे. कोणी उलट करेल की सुलट करेल, पण यात हिशोब तुमचाच आहे आणि तो मात्र निमित्त बनत असतो. तो हिशोब पूर्ण झाला की मग पुन्हा कोणी दखल करणार नाही.
म्हणून निमित्तासोबत भांडण करणे हे व्यर्थच आहे. निमित्ताचा चावा घेतल्याने पुन्हा नवीन गुन्हा उभा होईल. म्हणजे यात करण्यासारखे काही उरत नाही. हे विज्ञान आहे, हे सर्व समजून घेण्याची गरज आहे.
प्रश्नकर्ता : कोणी आपल्याला काही ऐकवून जातो, हे पण नैमित्तिकच आहे ना ? आपली चूक नसली तरीही बोलला तर ?
दादाश्री : जर तुमचा दोष नसेल तर या जगात कोणालाही असे बोलण्याचा अधिकार नाही. तो बोलत आहे, तर तुमची जी चूक आहे, त्याचा हा मोबदला देत आहे. हो, तुमची मागील जन्माची जी चूक आहे, त्या चुकीचा मोबदला तो माणूस तुम्हाला देत आहे. तो निमित्त आहे आणि चूक तुमची आहे. म्हणूनच तो बोलत आहे.
आपली चूक आहे, म्हणूनच तो बोलतो. तो तर आपल्याला त्या चुकीतून मुक्त करत आहे. तेव्हा त्याच्यासाठी भाव बिघडवू नये. आणि आपण काय म्हणायला पाहिजे की, हे प्रभु, त्याला सद्बुद्धी द्या. इतकेच म्हणावे, कारण तो निमित्त आहे.