________________
७०
वाणी, व्यवहारात...
एका माणसाला स्वत:ची वाणी सुधारायची होती. तसा तर तो क्षत्रिय होता आणि बांगड्यांचा व्यापार करत होता. तो त्या बांगड्या इथून बाहेरगावी घेऊन जायचा. कशातून? तर टोपलीतून घेऊन जायचा. टोपली डोक्यावर ठेवून नाही, पण एक गाढवीण होती ना, तिच्या पाठीवर ते टोपले बांधून बाहेरगावी नेत असे. त्या गावात सर्वांना बांगड्या विकून झाल्यावर उरलेल्या बांगड्या तो रात्री परत आणायचा. तो वेळोवेळी त्या गाढवीणीला म्हणायचा 'चल गाढवीण, चल लवकर.' असे बोलत बोलत हाकलत घेऊन जात असे. तेव्हा एका माणसाने त्याला समजावले की, 'भाऊ, तू तेथे गावात क्षत्रिणींना बांगड्या भरतोस. तेव्हा इथे जर तुला ही सवय लागली आणि तिथेही जर कधी गाढवीण बोलशील तर लोक मारुन-मारुन तुझे तेल काढून टाकतील.' तेव्हा तो म्हणाला, 'गोष्ट तर खरी आहे. एकदा मी असे बोललो होतो आणि मला पस्तावण्याची वेळ आलेली.' त्यावर त्या माणसाने सांगितले, 'म्हणून तू ही सवयच बदलून टाक.' त्याने विचारले कशी बदलू? तेव्हा तो माणूस म्हणाला, 'गाढवीणीला तू म्हणायचेस की चल ताई, चल ताई, ताई चला.' नंतर त्याने अशी सवय लावून घेतली त्यामुळे तेथे सुद्धा त्याने 'या ताई, या ताई' असे बदलून टाकले. पण मग 'या ताई, या ताई' असे म्हटल्यामुळे गाढवीण काय त्याच्यावर खुष होणार आहे ? पण ती सुद्धा समजून जाते की याचे भाव चांगले आहेत. गाढवीणीला सुद्धा हे सर्व समजते. ही जनावरे सर्व समजतात, पण बोलू शकत नाहीत बिचारी. ___म्हणजे असे परिवर्तन घडते! असा काही प्रयोग केला तर वाणी बदलते. आपण ओळखले की यात फायदा आहे आणि याच्याने नुकसान होईल असे आहे, तेव्हा मग ते बदलते.
आपण निश्चय केला की 'कोणालाही दुःख होणार नाही अशी वाणी बोलायची आहे. कोणत्याही धर्माला अडचण होणार नाही, कोणत्याही धर्माचे प्रमाण दुभावले जाणार नाही, अशी वाणी बोलली पाहिजे.' तेव्हा ती वाणी चांगली निघेल. 'स्याद्वाद वाणी बोलायची आहे' असा भाव पकडला तर स्याद्वाद वाणी उत्पन्न होईल.