________________
३४
वाणी, व्यवहारात...
आम्हा 'ज्ञानी'चा प्रयोग कसा असतो की प्रत्येक क्रियेला 'आम्ही' 'पाहतो.' म्हणूनच मी या वाणीला रेकॉर्ड म्हणतो ना! ही रकॉर्ड बोलत
आहे, आम्ही ती पाहात असतो की 'रेकॉर्ड कशी वाजत आहे आणि कशी नाही'! आणि जगातील लोक तन्मयाकार होतात. संपूर्ण निर्तन्मयाकार राहिले, त्यास केवळज्ञान म्हटले आहे.
जगातील लोक पाहतात तसेच ज्ञानी पण पाहत असतात, परंतु जगातील लोकांचे पाहिलेले उपयोगी पडत नाही. कारण त्यांचा 'बेसमेन्ट'(पाया) अहंकार आहे. मी 'चंदुभाऊ' आहे, हा त्यांचा 'बेसमेन्ट' आहे आणि 'आपला' 'बेसमेन्ट' मी 'शुद्धात्मा आहे' हा आहे. म्हणून आपले पाहिलेले केवळज्ञानाच्या अंशात जाते. जितक्या अंशाने आपण पाहिले, जितक्या अंशाने आपण स्वत:ला वेगळे पाहिले, वाणीला वेगळे पाहिले, हा 'चंदुभाऊ' काय करत आहे ते पाहिले, तितक्या अंशाने केवळज्ञान उत्पन्न झाले.
मला जर कोणी शिवी दिली तर ते माझ्या ज्ञानातच असते, 'ही रेकॉर्ड काय बोलते' तेही माझ्या ज्ञानातच असते. रेकॉर्ड चुकीचे बोलली असेल तरी ते माझ्या ज्ञानातच असते. आम्हाला संपूर्ण जागृती राहते. आणि संपूर्ण जागृती हे केवळज्ञान आहे. व्यवहारात लोकांना व्यवहारिक जागृती राहते, ती अहंकारामुळे राहते. पण ही तर शुद्धात्मा झाल्यानंतरची जागृती आहे. ही आंशिक केवळज्ञानाची जागृती आहे आणि तेव्हापासूनच कल्याणकारी आहे.
___ आतल्या मशीनरीला मोकळी सोडायची नाही. आपण तिच्यावर देखरेख ठेवायची की कुठे-कुठे घासली जात आहे, काय होत आहे, कोणाबरोबर कडक वाणी निघाली. बोलले गेले त्याची अडचण नाही, आपण 'पाहत' राहायचे की, 'ओहोहो, चंदुभाऊ कडक बोलले!'
प्रश्नकर्ता : परंतु जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत चांगलेच ना?
दादाश्री : ‘बोलायचे, किंवा बोलायचे नाही' हे आता आपल्या हातात राहिले नाही.