________________
३०
वाणी, व्यवहारात...
तुम्हाला समजलेले आहे. बोलायचे नसेल तरीही बोलले जाते, म्हणून 'ही टेपरेकॉर्डच आहे' हे ज्ञान फीट करून घ्या.
__ प्रश्नकर्ता : समजा की, समोरच्याची रेकॉर्ड वाजत असेल त्यावेळी आपण म्हटले की ही रेकॉर्ड वाजत आहे. पण तरीही आत 'हा सांगतो ते खोटे आहे, हे बरोबर नाही, असे का बोलतो?' अशी रिअॅक्शन होत असते.
दादाश्री : नाही, पण असे का व्हायला पाहिजे? जर ही रेकॉर्डच वाजत आहे, तुम्ही जर हे जाणून घेतलेले आहे की ही रेकॉर्डच बोलत आहे, तेव्हा मग त्याचा परिणामच होणार नाही ना?!
प्रश्नकर्ता : पण स्वतः निश्चितपणे मानतो, शंभर टक्के मानतो की ही रेकॉर्डच आहे, तरीसुद्धा रिअॅक्शन का येते?
दादाश्री : असे आहे की ही रेकॉर्डच आहे, रेकॉर्ड आहे असे तुम्ही नक्की सुद्धा केले आहे, पण 'रेकॉर्डच आहे', असे एक्जेक्ट ज्ञान त्यावेळी हजर राहिले पाहिजे. पण तरी ते एकदम रेकॉर्डच आहे असे राहू शकत नाही. कारण आपला अहंकार त्यावेळी उड्या मारतो. म्हणून मग 'त्याला' 'आपण' समजवयाचे की 'भाऊ, ही रेकॉर्ड वाजत आहे, तू कशाला आरडाओरड करतो?' असे आपण म्हटले की मग आत सर्व शांत होते.
मी पंचवीस वर्षाचा होतो, तेव्हाची ही गोष्ट आहे. माझ्या घरी एक जण आला होता. त्यावेळी मला रेकॉर्ड विषयी माहित नव्हते. तो मला खूपच वाईट शब्द बोलून गेला. तसा तर तो नातेवाईक होता. नातेवाईकासोबत भांडण करून कसे चालेल? म्हणून मी त्याला सांगितले, 'बसा तुम्ही, बसा ना आता, ती चूक तर झाली असेल. कधीतरी चूक होते ना आपली.' नंतर चहा पाजून त्यांना शांत केले. मग तो मला म्हणाला 'मी निघतो आता.' तेव्हा मी म्हटले, 'तुमचे ते गाठोडे सोबत घेऊन जा. हा जो तुम्ही मला प्रसाद दिला होता, तो मी चाखला नाही. कारण की तो तोललेला नव्हता, त्यामुळे ते माझ्याकडून घेतले जाणार नाही. मला तर तोललेला माल असेल तरच कामाचा. बिनतोललेला माल