________________
वाणी,
मी घेत नाही. म्हणून तुमचा माल तुम्ही घेऊन जा. तेव्हा मग ते शांत
झाले.
व्यवहारात...
३१
शब्द तर शांतीही देतात आणि पेटवूनही टाकतात. म्हणजे इफेक्टिव आहेत. आणि सर्व इफेक्टिव वस्तू निश्चेतन असतात. चेतन इफेक्टिव नसते. विनाशी वस्तू असेल, ती इफेक्टिव असते. आपले 'ज्ञान' मिळाल्यानंतर जरी वाटेल तशी वाणी निघत असली तरी ती इफेक्टिव नसते. तरीही अजून इफेक्ट होत आहे, त्याचे कारण काय ? पूर्वीची अवस्था विसरलेलो नाही. बाकी इफेक्ट होत आहे, त्यास तुम्ही जाणले की समोरच्याची वाणी आहे ती रेकॉर्डस्वरुप आहे आणि तो 'चंदुभाऊला ' बोलतो, 'तुम्हाला' बोलत नाही. म्हणून कुठल्याही प्रकारे तुमच्यावर परिणाम करणार नाही.
त्याने असे काही बोलायला नको, हे त्याच्या आवाक्यात नाही. त्याच्या वाटेल त्या शब्दांमुळे आपला संघर्ष होता कामा नये. हा धर्म आहे. हो, शब्द तर वाटेल तसे असू शकतात. यात शब्दांची अशी काही अट आहे का, की तो बोलला तर 'संघर्ष व्हायलाच पाहिजे ?'
आणि आपल्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल असे बोलणे, हा तर सर्वात मोठा गुन्हा आहे. उलट असे कोणी बोलले असेल तर ते दाबून टाकले पाहिजे, त्याला माणूस म्हणतात !
वाणी बोलण्यास हरकत नाही. ते तर कोडवर्ड आहेत. ते फुटतात आणि बोलत राहतो, आपण त्याचे रक्षण करू नये. वाणी बोलण्यास हरकत नाही, पण 'आम्ही खरे आहोत' असे त्याचे रक्षण करू नये. स्वतःच्या वाणीचे रक्षण करणे हीच सर्वात मोठी हिंसा आहे. मी सांगतो तेच खरे हे समोरच्याला ठसवणे हीच हिंसा आहे.
'आम्ही खरे आहोत,' यालाच रक्षण करणे असे म्हणतात आणि जर हे रक्षण नसले तर काहीच नाही. गोळे सर्व फुटून जातील आणि कोणालाही जास्त इजा होणार नाही. अहंकाराचे रक्षण करतात, त्यामुळे खूप इजा होते.