________________
वाणी, व्यवहारात...
प्रश्नकर्ता : आंतरिक स्थितीत, म्हणजे अंतर विज्ञानात हे बोलणे कशा प्रकारे बनते आणि बोलण्याचे बंद कशा प्रकारे होते?
दादाश्री : सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे हे सर्व. समोरच्याला जेवढे द्यायचे असेल तेवढे आपल्याकडून निघते. आणि जिथे द्यायचे नसेल, तिथे आपले बंद होऊन जाते. मुंबईमध्ये मी एका व्यक्तिला सांगितले होते. तो म्हणतो, 'दादाजींना बदनाम करून टाकीन,' असे म्हणत होता. तो आला तेव्हा मी त्याला म्हणालो, 'बोला ना काही.' पुन्हा मी म्हणालो, 'बोला ना काही.' तेव्हा त्याने स्पष्ट सांगितले 'घश्यापर्यंत येत आहे पण बोलले जात नाही.' घ्या बोला आता?! हे आले बोलणारे !! इथपर्यंत येते पण बोलले जात नाही, असे मला स्पष्ट सांगितले, म्हणून मग मी समजून गेलो. एक अक्षर सुद्धा बोलू शकत नाही, माझा हिशोब पूर्ण झाला आहे. मग तुझी काय बिशाद ?
6. वाणीचे संयोग, पर-पराधीन प्रश्नकर्ता : आपण असे सांगता की, 'स्थूल संयोग सूक्ष्म संयोग, वाणीचे संयोग पर आहेत आणि पराधीन आहेत.' तर हे समजवा.
दादाश्री : स्थूल संयोग म्हणजे तुम्हाला चालता-फिरता हवा मिळते, अमके मिळते, मामा भेटतात, काका भेटतात, साप भेटतो, हे सर्व स्थूल संयोग आहेत. कोणी मोठ-मोठ्या शिव्या देणारेही भेटतात. म्हणजे हे जे बाहेरचे संयोग जुळून येतात, ते सर्व स्थूल संयोग आहेत.
सूक्ष्म संयोग म्हणजे मनात विचार येतात, विचार वाकडे येतात, उलट-सुलट येतात, वाईट येतात, चांगले येतात किंवा असेही विचार येतात की 'आता एक्सिडेन्ट झाला तर काय होईल?' हे सर्व सूक्ष्म संयोग. आत मनात सर्व येतच राहतात.
आणि वाणीचे संयोग म्हणजे आपण बोलत राहतो किंवा कोणी बोलले आणि आपण ऐकतो, हे सर्व वाणीचे संयोग!
'स्थूल संयोग, सूक्ष्म संयोग आणि वाणीचे संयोग पर आहेत आणि पराधीन आहेत.' एवढेच वाक्य स्वत:च्या लक्षात येत असेल, स्वत:च्या