________________ असे प्रोजेक्ट करा की जे तुम्हाला आवडेल हे जे शब्द निघतात ना, त्या शब्दांमुळेच तर हा संसार उभा राहिला आहे. जेव्हा शब्द बंद होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने हे सारे संपुष्टात येईल. आजवर ज्या काही लढाया झाल्या, त्या सर्व शब्दांमुळेच झाल्या आहेत! शब्द तर कसे गोड असावेत आणि ते जर गोड नसतील तर आपण न बोललेच बरे. आपल्याला जसे आवडते तसेच आपण दुसऱ्यांशी बोलावे. म्हणजे तुम्ही असे प्रोजेक्ट करा की जे तुम्हाला आवडेल. हे सर्व तुमचेच प्रोजेक्शन आहे. यात देवाची किंचितही दखल नाही. कोणावरही टाकलेली वाणी, ती सर्व शेवटी तुमच्यावरच येते. तेव्हा अशी शुद्ध वाणी बोला की तशी शुद्ध वाणीच तुमच्यावर पडेल. - दादाश्री ISBN 978-93-84321-356 9-789386-321736 Printed in India Price 25 dadabhagwan.org