________________
वाणी, व्यवहारात...
५३
झाला?' तर तो स्वत:हून कबूल करेल. असे सम्यक् बोलत नाही, आणि तुम्ही पाच शेर द्याल तर तो दहा शेर परत करेल.'
प्रश्नकर्ता : सांगता येत नसेल तर मग काय करावे? गप्प राहायचे?
दादाश्री : मौन राहायचे आणि पाहत राहायचे की ‘क्या होता है?' चित्रपटात मुलांना आपटतात, तेव्हा आपण काय करतो? सांगण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण क्लेश वाढणार नाही अशा प्रकारे सांगण्याचा अधिकार आहे, बाकी सांगितल्यामुळे जर भांडण वाढत असेल तर तो मूर्खपणाच आहे.
प्रश्नकर्ता : अबोला धरुन गोष्टीला टाळल्याने त्याचा निकाल होऊ शकेल?
दादाश्री : नाही होऊ शकणार. तो जर आपल्याला समोर भेटला तर कसे आहात? कसे नाही? अशी विचारपूस केली पाहिजे. त्याने जर आरडाओरडा केला तर आपण जरा शांत राहून 'समभावाने निकाल' करावा. कधी ना कधी तर त्याचा निकाल करावाच लागेल ना? अबोला धरल्याने काय त्याचा निकाल झाला? निकाल होत नाही, म्हणून तर अबोला धरतात. अबोला म्हणजे ओझे, ज्याचा निकाल झाला नाही त्याचे ओझे. आपण तर लगेच त्याला थांबवून सांगायचे 'थांबा ना जरा, माझी काही चूक झाली असेल तर मला सांगा, माझ्या खूप चुका होतात. तुम्ही तर खूप हुशार आहात, सुशिक्षीत आहात म्हणून तुमची चूक होत नाही पण मी कमी शिकलेला, म्हणून माझ्या तर खूप चुका होतात.' असे म्हटले की तो खुष होऊन जाईल.
प्रश्नकर्ता : असे म्हटल्यानेही तो नरम पडला नाही, तर काय करावे?
दादाश्री : नरम पडला नाही तर आपण काय करावे? आपण सांगून मोकळे व्हावे. मग दुसरा काय उपाय? कधी ना कधी तर नरम पडेल, ओरडून नरम करायला गेलो तर तो काही नरम होणार नाही. आज नरम दिसेल, पण तो मनात नोंद करून ठेवतो आणि जेव्हा आम्ही नरम