________________
वाणी, व्यवहारात...
हितकारीच बोलतो, तरीही मी जर जास्त बोललो ना, तर तुम्ही म्हणाल की 'काका आता बंद करा, आता मला जेवायला जाऊ द्या ना.' म्हणजे ते मित पाहिजे, योग्य प्रमाणात असले पाहिजे. हा काही रेडिओ नाही की बोलतच राहील, काय? म्हणजे असे सत्य-प्रिय-हितकारी आणि मितचा, चारींचा गुणाकार झाला तरच सत्य म्हटले जाईल. नाहीतर केवळ नग्न सत्य बोलले, तर त्याला असत्य म्हटले जाते.
वाणी कशी असायला हवी? हित-मित-प्रिय आणि सत्य, या चारींचा गुणाकार असलेली वाणी पाहिजे. इतर सर्व असत्य आहे. व्यवहार वाणीत हा नियम लागू पडतो. यात तर ज्ञानींचेच काम. चारींचा गुणाकार असलेली वाणी फक्त 'ज्ञानीपुरुषां'चीच असते, आणि ते समोरच्याच्या हितासाठीच असते, त्यांची वाणी जरा सुद्धा स्वत:च्या हितासाठी नसते. 'ज्ञानीं'ना पोतापणु-(मी आहे आणि माझे आहे, असे आरोपण, मी पणा.) नसतेच, जर 'पोतापणु' असेल तर ते ज्ञानी नाहीच.
सत्य कोणास म्हणतात? कोणत्याही जीवाला वाणीमुळे दुःख होत नसेल, वर्तनाने दु:ख होत नसेल आणि मनाने सुद्धा त्याच्यासाठी वाईट विचार केला जात नसेल. हेच सर्वात मोठे सत्य आहे. सर्वात मोठा सिद्धांत आहे. हे रियल सत्य नाही. हे अंतिम व्यवहार सत्य आहे.
प्रश्नकर्ता : माणूस खोटे का बोलतो?
दादाश्री : माझ्याशी कोणी खोटे बोलत नाही. माझ्याजवळ तर इथपर्यंतचे बोलतात की, दहा-बारा वर्षाची मुलगी असेल आणि ती आता पन्नास वर्षाची झाली असेल, तर तिने बारा वर्षांपासून ते पन्नास वर्षांपर्यंत काय काय केले ते सर्व मला अगदी स्पष्ट लिहून देते. नाहीतर या जगात असे कधी घडलेच नाही. कोणतीही स्त्री स्वत:चे असे जाहीर करेल असे घडले नाही. अशा हजारो स्त्रिया माझ्याकडे येतात आणि मी त्यांचे पाप धुऊन देतो.
प्रश्नकर्ता : विनाकारण मनुष्य खोटे बोलण्यासाठी प्रेरित होतो. त्या मागे कोणते कारण असेल?