________________
वाणी, व्यवहारात...
कसेही करा,
दादाश्री : नाही. मनानेच. मनाने करा, बोलून करा,
की माझा त्याच्या प्रति जो दोष झाला आहे, त्याची क्षमा मागतो. हे मनात बोलले तरी चालेल. मानसिक अॅटॅक झाला म्हणून त्याचे प्रतिक्रमण करायचे, बस.
४८
प्रश्नकर्ता : एखादा वाईट प्रसंग आला असेल, समोरची व्यक्ति तुमच्यासाठी वाईट बोलत असेल किंवा वाईट करत असेल, तर त्याच्या रिॲक्शनने मनात आम्हाला जो राग येतो, त्यामुळे जीभेने शब्द बाहेर निघतात, पण मन आतून सांगत असते की, हे चुकीचे होत आहे. तर हे जे बोलले जाते त्याचा दोष अधिक आहे की मनाने केलेल्याचा दोष अधिक आहे ?
दादाश्री : जीभेने करतो ना, ते भांडण तिथल्या तिथे, लगेचच हिशोब फेडून पूर्ण होतो आणि मनाने केलेले भांडण पुढे चालत राहते. जीभेने भांडतो, ते तर आपण समोरच्याला सुनावले, म्हणजे तो लगेच आपल्याला परत करतो. ताबडतोब त्याचे फळ मिळून जाते. आणि मनाने केले त्याचे फळ नंतर परिपक्व होईल. हे आत्ता त्याचे बीज पेरले गेले. म्हणजे त्यास कॉजेस म्हणतात. म्हणूनच कॉजेस पडणार नाहीत, यासाठी मनाने होऊन गेले असेल तर मनाने प्रतिक्रमण करायला पाहिजे.
9. विग्रह, पति - पत्नीमधील
मनुष्य होऊन प्राप्त संसारात दखल ( ढवळाढवळ) केली नाही, तर संसार अगदी सरळ आणि सुरळीत चालत राहील. पण हा तर प्राप्त संसारात दखलच करीत असतो. उठल्यापासून नुसती दखल.
आणि बायको सुद्धा उठल्यापासून दखलच करत राहते, की या बाळाला जरा झोका पण देत नाहीत, बघा तरी, हा केव्हाचा रडत आहे ! त्यावर परत नवरा म्हणेल, 'तुझ्या पोटात होता तेव्हा काय मी झोका द्यायला आलो होतो! तुझ्या पोटातून बाहेर निघाला तर आता तूच सांभाळ. ' असे म्हणतो. ती सरळ वागत नसेल तर काय करेल ?
प्रश्नकर्ता: दखल करू नका असे सांगितले ना तुम्ही, तर हे