________________
तोडगा काढावा, तसेच स्वत:ची कटू वाणी, आघात करणारी वाणी असेल, तर त्यात कुठल्या प्रकारची समज वापरून बदल करावा? कोणाबद्दल अपशब्द, नकारात्मक शब्द बोललो, तर त्याच्या रिअॅक्शनमुळे स्वत:वर काय परिणाम होईल? वाणीमुळे झिडकारले जाते, तेव्हा ती वाणीच कशाप्रकारे फिरवायची की जेणे करून झिडकारल्यामुळे लागलेले घाव भरून निघतील. वाणीच्या अतिशय सूक्ष्म सिद्धांतिक स्पष्टीकरणासहित दैनंदिन व्यावहारिक जीवनात पति-पत्नीमध्ये, आई-वडील-मुलांमध्ये, मालक-नोकरामध्ये, जी वाणी बोलली जाते ती कशी सम्यक् प्रकारे असावी, त्याची पॅक्टिकल उदाहरणे देऊन सुंदर समाधान दादांनी 'वाणी व्यवहारात' या ग्रंथात केले आहे, ही उदाहरणे जणू काही आपल्याच जीवनाचा आरसा आहे असेच वाटते, हृदयात सामावून मुक्त करवते.
यथार्थ ज्ञानींना ओळखणे अतिशय कठीण आहे. जसे हिऱ्याला पारखण्यासाठी रत्नपारखीची दृष्टी पाहिजे, तसेच दादांना ओळखण्यासाठी खऱ्या मुमुक्षुची दृष्टी विकसित करणे गरजेचे आहे ! केवळ आत्मार्थासाठीच निघालेली अशी ज्ञानींची स्याद्वाद वाणी युगा-युगांपर्यंत मोक्षमार्गाला प्रकाशित करीतच राहील. अशी ही जबरदस्त वचनबळ असलेली, निश्चय-व्यवहार दोन्हींना प्रतिपादीत करणारी वाणी प्रवाहीत झाली आहे, ज्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यावर स्वरुपाची प्राप्ती नक्कीच होऊ शकते, एका तासातच!
- डॉ. नीरूबहन अमीन