________________
वाणी, व्यवहारात...
१९
कारखान्यात गेले असेल, परंतु जोपर्यंत बर्फ तयार झालेला नाही तोपर्यंत हरकत नाही. बर्फ झाल्यानंतर मात्र हातात काही उरत नाही.
प्रश्नकर्ता : वाणी बोलतेवेळी असलेले भाव आणि जागृतीनुसार टेपिंग होत असते का?
दादाश्री : नाही. हे टेपिंग वाणी बोलते वेळी होत नाही. मुळात तर हे आधीच टेप झालेले आहे. आणि मग आज काय होते? तर छापल्या प्रमाणेच वाजते.
प्रश्नकर्ता : पण आज जेव्हा बोलतो, त्यावेळी जागृती ठेवली तर?
दादाश्री : समजा आता तुम्ही एखाद्याला धमकावले, त्यानंतर मनात जर असे वाटले की 'याला धमकावले, ते बरोबरच आहे.' म्हणून पुन्हा तशाच हिशोबाचा कोडवर्ड तयार झाला आणि 'याला धमकावले, ते चुकीचे घडले. असा भाव झाला, तर तुमचा कोडवर्ड नवीन प्रकारचा तयार झाला. 'धमकावले, हेच बरोबर आहे' असे मानले की पुन्हा तसाच कोड तयार झाला आणि त्यामुळे ते जास्त वजनदार होईल आणि 'हे खूप चुकीचे घडले, मी असे बोलायला नको. असे का होते?' असे वाटले तर कोड छोटा झाला.
प्रश्नकर्ता : तीर्थंकरांच्या वाणीचे कोड कसे असतात?
दादाश्री : त्यांनी कोड असा ठरवलेला असतो की माझ्या वाणीने कोणत्याही जीवाला किंचित्मात्र पण दु:ख होऊ नये. दुःख तर होऊच नये, पण कोणत्याही जीवाचे किंचित्मात्र प्रमाणही दुखावले जाऊ नये. झाडाचेही प्रमाण दुखावले जाऊ नये. असा कोड फक्त तीर्थंकरांचाच बनलेला असतो.
प्रश्नकर्ता : ज्याला टेपच करायचे नसेल, त्याच्यासाठी कोणता उपाय आहे?
दादाश्री : कोणतेही स्पंदन उभे करू नये. सर्व पाहतच राहायचे. पण हे शक्य नाही ना! हे सुद्धा मशीन आहे आणि पुन्हा पराधीन आहे.