________________
वाणी, व्यवहारात...
त्याला रागवत होतो. तेव्हा लोक तर मला टोकणारच ना, की अशा भर बाजारात तुमच्याकडून भांडण कसे होऊ शकते? म्हणून मी तर थंड पडलो की माझी काय चूक झाली? तो तिरसटपणे बोलला म्हणून मी रागावलो यात काय मोठी चूक झाली? मग मी त्यांना सांगितले की हा वाईट बोलत होता त्यामुळे मला थोडे रागवावे लागले. त्यावर ते म्हणाले की तो जरी वाईट बोलला तरी सुद्धा तुम्ही रागवायला नको. ह्या संडासातून दुर्गंध येत असेल म्हणून संडासाच्या दरवाज्याला लाथा मारत राहिल्याने ते कधी सुगंधी बनेल का? यात कोणाचे नुकसान झाले? त्याचा स्वभावच दुर्गंध पसरवण्याचा आहे. त्या दिवशी मला ज्ञान झालेले नव्हते. त्या भाऊने मला असे सांगितले, तेव्हा मी तर कानच पकडले. मला छान उदाहरण दिले की संडास कधी सुधारेल का?
__ 11. थट्टा-मस्करीची जोखिमदारी... प्रश्नकर्ता : वचनबळ कशा प्रकारे उत्पन्न होते?
दादाश्री : एक पण शब्द थट्टा-मस्करीसाठी वापरला नसेल, एक शब्द पण खोट्या स्वार्थासाठी किंवा हिसकावून घेण्यासाठी वापरलेला नसेल, शब्दाचा दुरुपयोग केला नसेल, स्वतःचा मान वाढेल यासाठी वाणी वापरली नसेल, तेव्हा वचनबळ उत्पन्न होते.
___प्रश्नकर्ता : स्वत:च्या मानासाठी आणि स्वार्थासाठी हे बरोबर आहे परंतु थट्टा-मस्करी केली, तर त्यात काय हरकत आहे?
दादाश्री : थट्टा-मस्करी करणे खूप चुकीचे आहे. त्या ऐवजी त्याला मान दिलेला चांगला! मस्करी तर भगवंताची झाली असे म्हटले जाईल! तुम्हाला असे वाटते की हा माणूस गाढवासारखा आहे 'आफ्टर ऑल' तो काय आहे, याचा शोध घ्या!! 'आफ्टर ऑल' तर तो भगवंतच आहे ना!
मला मस्करीची खूप सवय होती. मस्करी म्हणजे कशी की जास्त नुकसान करणारी नाही, पण तरी समोरच्या व्यक्तिच्या मनावर परिणाम तर होतोच ना! आपली बुद्धी जास्त वाढलेली असेल, त्याचा दुरुपयोग