Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 7
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir प्रस्तावना लोकांचं अज्ञान नाहींसें होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षीनीं महाभारत ग्रंथ निर्माण केला. यामध्यें चतुर्विध पुरुषार्थांचें प्रतिपादन पूर्णपणें केलें असून आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना कर्तव्याचा मार्ग स्पष्टपणे दाखविला आहे, त्याप्रमाणेंच या ग्रंथामध्यें आर्यसंस्कृतिही सांठविली आहे. एक लक्ष लोकांचा एवढा मोठा विस्तृत ग्रंथ संस्कृत भाषेवांचून इतर कोणत्याही भाषेंत नाहीं. महाभारताची भाषा समजण्याळा सोपी असून संस्कृत भाषेचें उत्तम जिवंत स्वरूप या ग्रंथामध्ये चांगल्या प्रकारचें आढळतें. या महाभारतांतील, सर्व लोकांना उपयोगी पडणारी, सुबोध, निवडक १०३२ संस्कृत सुभाषित वचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतलीं आहेत. हीं ओजस्वी वचनें विद्यार्थ्यांनी तोंडपाठ केल्यास त्यांचें संस्कृत भाषेचें ज्ञान वाढून त्यांना चांगले स्फूर्तिदायक विचार समजतील आणि पुढील आयुष्यांत व्यवहारांतील अनेक प्रसंगी योग्य रीतीनें वागण्यास ते समर्थ होतील. श्रोत्यांच्या मनावर महाभारतांतील वचनांचा ठसा अधिक उमटतो यासाठीं प्रतिपादनाचे वेळी हरिदास, पुराणिक यांना या सिद्धान्तरूप वचनांचा विशेष उपयोग होईल. वक्ते व लेखक यांनाही हीं मार्मिक वचनें For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 ... 463